Nashik : दुहेरी फायरसेसच्या विळख्यातून उद्योजकांची सुटका

Nashik Municipal Corporation
Nashik Municipal CorporationTendernama

नाशिक (Nashik) : नाशिक महापालिका हद्दीतील औद्योगिक वसाहतींकडून उद्योग विभाग व नाशिक महापालिका, दुहेरी फायरसेस आकारणी करतात. याबाबत उद्योगमंत्र्यांनी दोन महिन्यांपूर्वी सूचना देऊनही एमआयडीसीने त्याची अंमलबजावणी करण्याची तयारी दर्शवली नाही. यामुळे उद्योजकांनी दुहेरी फायरसेस भरण्यास विरोध केला. त्याची तातडीने दखल घेत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नाशिकच्या अधिकाऱ्यांची मुंबईत बैठक घेत फायरसेसमधून उद्योजकांना दिलासा दिला आहे.

Nashik Municipal Corporation
Mumbai : बापरे! 252 कोटींचा फ्लॅट अन् 15 कोटींची स्टॅम्प ड्युटी

नाशिक महापालिकेने एप्रिलपर्यंत आवश्यक मंजुरी प्राप्त करून एमआयडीसीच्या ताब्यातील अग्निशमन केंद्र (फायर स्टेशन) ताब्यात घेण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यास अंबड औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांची दुहेरी फायर सेसमधून सुटका होईल, असा विश्वास उद्योगमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. उद्योगमंत्री उदय सामंत नाशिक दौऱ्यावर आले असताना अंबड औद्योगिक वसाहतीमधील उद्योजकांनी अंबड औद्योगिक वसाहत व नाशिक महापालिका या दोन्ही संस्था उद्योजकांकडून फायर सेस वसूल करीत असल्याचा मुद्दा त्यांच्या नजरेस आणून दिला होता. त्यावेळी उद्योगमंत्र्यांनी अंबड औद्योगिक वसाहतीने फायरसेसची आकारणी करू नये, असे आदेश दिले होते. त्यामुळे उद्योजकही निश्‍चिंत होते.

Nashik Municipal Corporation
Nashik: गुड न्यूज; अक्राळे MIDCमध्ये वर्षात 5700 कोटींची गुंतवणूक

दरम्यान, अंबड औद्योगिक वसाहतीच्या कार्यालयाने सर्व उद्योगांना या वर्षाचा फायरसेसची रक्कम ३१ मार्चपर्यंत भरणा करण्यासाठी देयके पाठवली. यावेळी उद्योजकांनी पुढील वर्षापासून तुम्ही फायरसेसची आकारणी करणार आहात कि नाही, याबाबत विचारणा केली. त्याबाबत समाधानकारक उत्तर न मिळाल्याने या उद्योजकांनी या वर्षाचाही फायरसेस भरणार नसल्याची भूमिका जाहीर केली. याची दखल घेत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी अंबड औद्योगिक वसाहतीमधील अग्निशमन केंद्र महापालिकेकडे हस्तांतरित करण्यासाठी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या वेळी एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपिन शर्मा, उद्योग विभागाचे विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह, उद्योग विभागाचे सहसचिव संजय देगावकर, उपसचिव श्रीकांत पुलकुंडवार, मुख्य अग्निशमन अधिकारी संतोष वारिके, एमआयडीसीचे मुख्य अभियंता सुभाष तुपे व नाशिक एमआयडीसी व महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी एमआयडीसीच्या अग्निशमन केंद्राची किंमत वसूल करून ते महापालिकेला हस्तांतरित करण्याची प्रक्रिया महापालिकेने तत्काळ सुरू करण्याबाबत बैठकीत सूचना करण्यात आल्या. त्यानुसार महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी १ एप्रिलपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्याची ग्वाही या वेळी दिली.

Nashik Municipal Corporation
Nashik ZP: जलजीवनच्या कामांना वन, जलसंपदा विभागाने का घातला खोडा?

आयटी पार्कची जागा होणार निश्चित

नाशिक शहरात १०० एकर जागेवर आयटी पार्क प्रस्तावित करण्यात आला आहे. मात्र, या आयटीपार्कची जागा अद्याप निश्‍चित करण्यात आलेली नाही. याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली. यावर पुढील चार ते पाच दिवसांत जागा निश्चित करण्यात येणार असल्याचे उद्योगमंत्री सामंत यांनी म्हटले आहे. तसेच अंबड एमआयडीसीलगत बंद टोल नाक्याजवळ नाशिक महापालिकेने ट्रक टर्मिनल्स विकसित करावे, एमआयडीसीदेखील आठ हजार चौरस मीटर भूखंडावर स्वतंत्र असे ट्रक टर्मिनल विकसित करेल, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com