Nashik : ऑगस्टपर्यंत 'नमामी गोदा'चा डीपीआर तयार होणार

Nashik
NashikTendernama

नाशिक (Nashik) : येथे २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी व उपनद्यांच्या प्रदूषणमुक्तीसाठीच्या १७०० कोटी रुपयांच्या 'नमामि गोदा' योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. हा अहवाल पूर्ण झाल्यानंतर ऑगस्ट महिन्याअखेर राज्य शासनाच्या मान्यतेसाठी सादर केला जाणार असल्याची माहिती महापालिकेतर्फे देण्यात आली.

Nashik
Mumbai-Goa Highway : 'इंदापूर ते झाराप रस्त्याची कामे लवकर करा'

वाराणसी येथील गंगा नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी नमामि गंगा प्रकल्प राबवण्यात आला आहे. त्याच धर्तीवर' नाशिक शहरात गोदावरी प्रदूषित झाल्याने नमामि गोदा' प्रकल्प राबवला जाणार आहे. प्रकल्प राबविण्यासाठी गोदावरी व उपनद्यांच्या काठावरील मलवाहिकांची क्षमतावाढ व सुधारणा करणे, नदीमध्ये मिसळणारे मलजल अडवून मलनिस्सारण केंद्रांकडे वळविणे, मखमलाबाद व कामटवाडे येथे नवीन मलजल प्रक्रिया केंद्राची उभारणी करणे, नव्याने विकसित होत असलेल्या रहिवासी भागात मलवाहिकांचे जाळे निर्माण करणे, नदीघाटाचे सुशोभीकरण तसेच संवर्धन, नूतनीकरण करणे, मलजलप्रक्रिया केंद्रातील प्रक्रियायुक्त पाण्याचा पुनर्वापर करणे आदी महत्त्वाच्या कामांचा 'नमामि गोदा' प्रकल्पात समावेश करण्यात येणार आहे.

Nashik
Nashik : मेडिकल कॉलेजसाठी म्हसरूळमध्ये 35 एकर जागा

केंद्र सरकारने हा प्रकल्प राबवण्यास तत्त्वता मान्यता दिली असून त्यानुसार महापालिकेने प्रकल्पाचा सविस्तर अहवाल तयार करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून निधी मिळणार आहे. 'नमामि गोदा' प्रकल्पाची अंमलबजावणी करताना सिवेज ऑडिट देखील केले जाणार आहे. याअंतर्गत पाणीपुरवठा, मलजल, मलनिस्सारण केंद्रांमध्ये प्रक्रिया होणारे मलजलाचा अभ्यास या माध्यमातून केला जाणार आहे. प्रकल्प अहवाल ऑगस्ट अखेर अंतिम करून सरकारच्या मान्यतेसाठी सादर केला जाणार आहे. नमामी गोदा प्रकल्पात गोदावरी या प्रमुख नदीसह वरुणा  (वाघाडी), नंदिनी, वालदेवी, कपिला या नद्यांच्या पुनरुज्जीवनाचा समावेश करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com