Nashik : पाणीपट्टीची दरवाढ 1 डिसेंबर नाही, तर 1 एप्रिलपासून लागू होणार

Nashik Municipal Corporation
Nashik Municipal CorporationTendernama

नाशिक (Nashik) : महापालिकेच्या स्थायी समितीने पाणीपट्टीत  अडीचपट वाढ करण्याच्या प्रस्तावाला मान्यता देताना ही दरवाढ लागू  करण्याचा कालावधी १ डिसेंबर २०२३ ऐवजी एक एप्रिल २०२४ असा केला आहे. महापालिकेला कोणतही करवाढ नवीन आर्थिक वर्षात लागू करता येते व त्यासाठ आधीच्या आर्थिक वर्षात परवानगी घेणे आवश्यक असते. यामुळे डिसेंबरपासून पाणीपट्टीत वाढ करणे वादात सापडले असते. यामुळे १ एप्रिलपासून शहरातील नागरिकांना एक एप्रिलपासून हजार लिटरपाण्यासाठी पाच रुपयांऐवजी बारा रुपये मोजावे लागणार आहे.

Nashik Municipal Corporation
Mumbai : राज्याच्या नव्या गृहनिर्माण धोरणाबाबत काय म्हणाले मंत्री अतुल सावे?

महापालिका आयुक्त अशोक करंजकर यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि. २४) स्थायी समिती सभा झाली. या सभेत पाणीपट्टीच्या दरात वाढ करण्याच्या तसेच मलजल उपभोक्ता शुल्क आकरण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. पाणीपुरवठा व मलनिस्सारण विभागाचे अधीक्षक अभियंता संजय अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार महापालिकेचा पाणीपुरवठा विभागा पुढील चार वर्षांत पाणीपट्टीत दुप्पट ते तिप्पट दरवाढ केली जाणार आहे. तसेच मलजलाच्या व्यवस्थापनासाठीही कर आकारण्याचा निर्णय घेण्यात आला असून आता नागरिकांना १ एप्रिल २०२४ पासून मलजल उपभोक्ता शुल्क म्हणून हजार लिटर पाण्यामागे तीन रुपये मोजावे लागणार आहे. महापालिकेला मलजल व्यवस्थापनासाठी हजार लिटर पाण्यासाठी सध्या २.७७ रुपये खर्च येतो. यामुळे १ एप्रिलपासून महापालिका मलजल उपभोक्ता शुल्क म्हणून हजार लिटरपाण्यासाठी तीन रुपये आकारणी करणार आहे. तसेच पुढील चार वर्षे दरवर्षी हजार लिटरमागे ५० पैशांची वाढ केली जाणार आहे.

Nashik Municipal Corporation
Nashik : झिरवळ यांनी का बोलावली मंगळवारी मंत्रालयात बैठक? काय आहे तक्रार?

महापालिकेचा पाणीपुरवठ्यावर वार्षिक १३० कोटी रुपयांचा खर्च होत असताना पाणीपट्टीद्वारे केवळ ६४ कोटी रुपये महसूल मिळतो. यामुळे दरवर्षी महापालिकेला पाणीपुरवठा व्यवस्थापनातून ६६.५४ कोटी रुपयांचा तोटा होत आहे. प्रस्तावित दरवाढ १ एप्रिल २०२४ पासून लागू झाल्यास २०२४-२५ या आर्थिक वर्षात महापालिकेला १४५ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त होईल.


१ एप्रिल २०२४ पासूनची पाणीपट्टी दरवाढ (हजार लिटरसाठी)
२०२४-२५ : १२ रुपये
२०२५-२६ : १३ रुपये
२०२६-२७ :१४ रुपये

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com