Nashik : शहरातील दिशादर्शक कमानींचे होणार स्ट्रक्चरल ऑडिट

Nashik Municipal Corporation
Nashik Municipal CorporationTendernama

नाशिक (Nashik) : शहरातील दोनशेहून अधिक दिशादर्शक कमानी मजबुतीचे स्ट्रक्चरल ऑडिट लवकरच करण्यात येणार आहे. यासाठी नुकतीच टेंडर प्रक्रिया राबवली असता सरकारी मान्यता प्राप्त सिव्हिल टेक, मविप्रचे स्व. बाबुराव ठाकरे या संस्थानी सहभाग घेतला असून, नववर्षाच्या पहिल्या आठवड्यात टेंडरचा तांत्रिक लिफाफा उघडला जाणार आहे. यानंतर पात्र संस्थेच्या माध्यमातून दिशादर्शक फलकाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार आहेत.

Nashik Municipal Corporation
एमटीएचएलचे 98 टक्के काम पूर्ण; प्रकल्प खर्चात 2 हजार कोटींची वाढ

नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ पर्वणी असते. तसेच दक्षिण काशी म्हणून नाशिकचे महत्व असल्यने देशभरातून भाविक नाशिकला येत असतात. या भाविकांना नाशिकमध्ये आल्यानंतर मार्गांची योग्य माहिती मिळावी म्हणून नाशिक शहरात २०१५ च्या सिंहस्थ कुंभमेळ्यात दिशादर्शक कमानींची उभारणी केली होती. या कमानी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या उभारण्यात आल्या आहेत. नाशिक  शहरात अशा लहान मोठ्या जवळपास दोनशेहून अधिक कमानी आहेत. या कमानी उभारल्यानंतर त्यांचे एकदाही स्ट्रक्चरल ऑडिट झालेले नाही. पुणे व इतर काही मेट्रो शहरांमध्ये या दिशादर्शक कमानी कोसळून मोठे अपघात झाले आहेत. त्यामध्ये काही जणांना त्यांचा जीवही गमवावा लागलेला आहे. शहरात महत्वाच्या व नेहमी वर्दळ असलेल्या रस्त्यांवर मोठमोठे लोखंडी साचा असलेल्या कमानी उभ्या आहेत.

Nashik Municipal Corporation
Nashik ZP : ग्रामीण भागातील शिक्षण, आरोग्य, बालके, रस्त्यांच्या निधीत दरवर्षी होतेय घट; काय आहे कारण?

रस्त्याच्या दुतर्फा व दुभाजकांमध्ये दिशादर्शक कमानी आहेत. हा धोका ओळखून महापालिका बांधकाम विभागाने शहरातील दिशादर्शक कमानींचे सुरक्षा ऑडिट करणार आहेत. त्यासाठी शासन मान्यताप्राप्त सिव्हिल टेक, मविप्रचे स्व. बाबुराव ठाकरे व संदीप फाउंडेशन यांच्याकडून दर मागवले आहेत. त्यात संदीप फाउंडेशन वगळता दोन्ही संस्थांनी दर दिले आहेत. दर कमी असलेल्या संस्थांना स्ट्रक्चरल ऑडिटचे काम दिले जाणार आहे. या संस्थांना ऑडिटसाठी तीन महिन्यांचा कालावधी दिला जाईल. या संस्तांनी दिलेल्या अहवालानुसार या कमानींच्या सुरक्षिततेबाबत कार्यवाही केली जाणार असल्याचे बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले. नाशिक शहराचा विकास चौफेर होत असून, शहराची हद्द वीस किलोमीटरपर्यंत विस्तारली आहे. मागील दोन कुंभमेळ्यामुळे शहरात अंतर्गत व बाह्य रिंगरोडचे जाळे विस्तारले आहे. नववसाहतीतही वाढ होत आहे. शहरातील नागरिकांसह बाहेरुन येणारी वाहने, पर्यटक यांच्यासाठी दिशादर्शक कमानी गाईडचे काम करतात. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com