Nashik MNGL Gas: नाशिककरांना पीएनजी गॅससाठी अजून किती वाट पाहावी लागणार? 8 वर्षांत केवळ 36 हजार जोडण्या

१ लाख घरांपर्यंत पाईपलाईन पोहोचूनही प्रत्यक्ष जोडणी संथ गतीने; परराज्यातील प्लंबरच्या तुटवड्यामुळे दररोज ६०० ऐवजी केवळ १५० जोडण्या पूर्ण, ३० जूनची शासकीय डेडलाईन हुकली
Nashik City, nmc, Kumbh
Nashik City, nmc, KumbhTendernama
Published on

नाशिक (Nashik): नाशिक: नाशिक शहरात घरोघरी पाईपलाईनद्वारे सुरक्षित आणि स्वस्त गॅसपुरवठा (पीएनजी) करण्यासाठी महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) कंपनीला दिलेले उद्दिष्ट गेल्या आठ वर्षांत पूर्ण करण्यात कंपनीला अपयश आले आहे. १० वर्षांत ९ लाख जोडण्या देण्याच्या करारातील उद्दिष्टाच्या तुलनेत ८ वर्षे उलटूनही केवळ ३६ हजार स्वयंपाकघरांपर्यंतच गॅस पोहोचू शकला आहे. पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या गॅसटंचाईच्या पार्श्वभूमीवर, सरकारने नाशिकमधील घरगुती जोडण्या वाढवण्याचे तातडीचे आदेश दिले होते. मात्र, कंपनीचा अत्यंत संथ कारभार आणि कुशल प्लंबरच्या तुटवड्यामुळे नाशिक शहरातील पीएनजी गॅसचे उद्दिष्ट पूर्णपणे हवेत विरल्याचे चित्र आहे.

Nashik City, nmc, Kumbh
Dharavi Redevelopment: सिंगापूर-हाँगकाँगच्या धर्तीवर बदलणार धारावीचा चेहरा; 2028 पर्यंत मिळणार 10 हजार घरे

शहरात पारंपारिक एलपीजी सिलिंडरऐवजी पाईपलाईनद्वारे थेट घरगुती गॅसपुरवठा करण्यासाठी 'महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड' (एमएनजीएल) या कंपनीला काम देण्यात आले आहे. या कामासाठी नाशिक महानगरपालिकेने आडगाव ट्रक टर्मिनल, मालेगाव स्टँड, पाथर्डी फाटा आणि विल्होळी नाका अशा चार प्रमुख ठिकाणी स्टेशन उभारणीसाठी १५ वर्षांच्या कराराने जागा उपलब्ध करून दिली आहे. एमएनजीएल कंपनीने २०१८ मध्ये प्रत्यक्ष पीएनजी गॅस लाईन टाकण्याच्या कामाला सुरुवात केली. मात्र, आठ वर्षांचा प्रदीर्घ कालावधी उलटूनही नाशिकमधील गॅस जोडणीची गती कमालीची संथ आहे.

उद्दिष्टाचा आणि प्रत्यक्ष कामाचा ताळेबंद
२०१८ मध्ये काम सुरू करताना कंपनीला १० वर्षांत ९ लाख एकूण जोडण्या आणि प्रामुख्याने घरगुती गॅस जोडणीसाठी २ लाख ३५ हजार ग्राहकांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. मात्र, कामातील ढिसाळपणामुळे ८ वर्षांत केवळ ३६ हजार पीएनजी जोडण्या प्रत्यक्ष कार्यान्वित झाल्या आहेत.
गेल्या वर्षी म्हणजे २०२५ मध्ये २० हजार जोडण्यांचे उद्दिष्ट ठेवले गेले होते, त्यापैकी केवळ १४ हजार जोडण्या पूर्ण होऊ शकल्या. सध्याची सद्यस्थिती अशी आहे की, शहरातील सुमारे १ लाख घरांच्या दारापर्यंत मुख्य पाईपलाईन पोहोचली आहे, पण प्रत्यक्ष स्वयंपाकघरात गॅस कनेक्शन देण्याच्या कामाला कमालीचा विलंब होत आहे.

Nashik City, nmc, Kumbh
मुंबईतील आणखी 2 महत्त्वाकांक्षी पुनर्विकास प्रकल्प अदानी समूहाकडे

प्लंबरचा तुटवडा आणि वारंवार बदललेली उद्दिष्टे
पश्चिम आशियातील युद्धाच्या संकटामुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम झाल्याने घरगुती पातळीवर पाईपलाईन गॅसचा वापर वाढवण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले होते. गेल्या वर्षी दिवाळीच्या काळात तीन महिन्यांत ५० हजार जोडण्या देण्याचे मोठे उद्दिष्ट एमएनजीएलला देण्यात आले होते, मात्र ते पूर्ण झाले नाही.

त्यानंतर १ एप्रिल २०२६ पासून दररोज ३०० जोडण्या आणि मे २०२६ मध्ये हे उद्दिष्ट वाढवून दररोज ६०० जोडण्यांचे करण्यात आले. मात्र, अंतर्गत जोडणी करण्यासाठी आवश्यक असणारे प्लंबरच उपलब्ध नसल्याने हे उद्दिष्ट कागदावरच राहिले आहे. सध्या नाशिक शहरात दररोज जेमतेम १५० जोडण्या केल्या जात आहेत. या कामासाठी प्रामुख्याने पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश येथील कुशल प्लंबरवर अवलंबून राहावे लागते. मात्र, सद्यस्थितीत हे कामगार उपलब्ध नसल्याने संपूर्ण कामाची गती मंदावली आहे.

Nashik City, nmc, Kumbh
Thane Cluster Scheme: ठाणे क्लस्टर प्रकल्पांना 'व्हायटल PUBLIC HOUSING'चा दर्जा; महाप्रीतकडून एमएसआरडीसीकडे हस्तांतरण

३० जूनची शासकीय डेडलाईन हुकणार
केंद्र आणि राज्य शासनाने पीएनजी जोडण्यांना गती देण्यासाठी सर्व महापालिकांना पाईपलाईन टाकण्याच्या कामांना २४ तासांच्या आत तात्काळ परवानगी देण्याचे आदेश दिले होते. तसेच संपूर्ण नाशिक शहरात ३० जून २०२६ पर्यंत १०० टक्के पीएनजी जोडणी पूर्ण करण्याचे कडक निर्देश दिले होते. मात्र, जून महिना संपत आला तरी केवळ ३६ हजार जोडण्या झाल्या आहेत.

सद्यस्थितीत शहरात दररोज सरासरी दीड किलोमीटरचे खोदकाम करून पाईपलाईन टाकण्याचे काम केले जात असले, तरी प्रत्यक्ष ग्राहकांच्या घरात गॅस पोहोचवण्यासाठी एमएनजीएलला आणखी कित्येक वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. या संथ कारभारासाठी कंपनीवर दंडात्मक कारवाई होणार का, असा प्रश्न आता नाशिककर उपस्थित करत आहेत.

Nashik City, nmc, Kumbh
Palghar Maritime Complex: जागतिक जहाजबांधणीचे केंद्र आता महाराष्ट्रात! वाढवण बंदराजवळ 500 दशलक्ष डॉलर्सचा मेगा प्रोजेक्ट

Key Points Summary

  • एमएनजीएल (MNGL) कंपनीला १० वर्षांत ९ लाख जोडण्यांचे दिलेले उद्दिष्ट ८ वर्षांनंतरही अपूर्ण.

  • निश्चित केलेल्या २ लाख ३५ हजार घरगुती जोडण्यांपैकी आतापर्यंत केवळ ३६ हजार घरांमध्ये गॅस पोहोचला.

  • शहरात १ लाख घरांपर्यंत मुख्य पाईपलाईन पोहोचली, पण अंतर्गत कनेक्शन देण्याचे काम रखडले.

  • दररोज ६०० पीएनजी जोडण्यांचे सरकारी उद्दिष्ट; प्रत्यक्षात प्लंबरच्या तुटवड्यामुळे रोज केवळ १५० जोडण्या.

  • पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशातील कामगार उपलब्ध न झाल्याने अंतर्गत फिटिंगची कामे रेंगाळली.

  • केंद्र व राज्य सरकारच्या निर्देशानुसार ३० जून २०२६ ची १००% जोडणीची डेडलाईन पूर्णपणे हुकली.

  • शहरात आतापर्यंत १८० किमी स्टील पाईपलाईन आणि ६०० किमी प्लास्टिक पाईपलाईनचे काम पूर्ण.

Tendernama
www.tendernama.com