Nashik: सिंहस्थातील 6 हजार 162 कोटींच्या कामांना मंत्रिमंडळ समितीची मंजुरी

Mantralaya
MantralayaTendernama
Published on

नाशिक (Nashik): नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणने प्रशासकीय मान्यता दिलेल्या २५ कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या ६८  कामांना मंत्रिमंडळ समितीने मंजुरी दिली आहे. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने अर्थसंकल्पात मंजूर केलेले रस्ते, रिंगरोड आदी महत्वाच्या प्रकल्पांव्यतिरिक्त प्राधिकरणाच्या पातळीवर प्रशासकीय मान्यता देण्यात आलेल्या ६ हजार १६२ कोटी रुपयांच्या कामांना राज्य सरकारचीही मान्यता मिळाली आहे. यामुळे या कामांना निधी मंजूर होण्याचाही मार्ग मोकळा झाला आहे.

Mantralaya
Raigad District: रायगडमधील पर्यटनस्थळांना भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी चांगली बातमी

नाशिक कुंभमेळा प्राधिकरणची मागील वर्षी स्थापना करण्यात आल्यानंतर सप्टेंबरपासून सिंहस्थाशी संबंधित कामांना प्रशासकीय मान्यता दिल्या आहेत. त्यातील जवळपास ५६०० कोटींच्या कामांना ऑक्टोबरपर्यंत प्रसासकीय मान्यता दिल्यानंतर नोव्हेंबरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते या कामांचे प्रतिकात्मक भूमिपूजन करण्यात आले होते. त्यानंतर कुंभमेळा प्राधिकरणच्या बैठकित विविध कार्यान्वयीन यंत्रणांनी सादर केलेल्या प्रस्तांवमधील अनेक लहान मोठ्या कामांना मंजुरी देऊन प्रशासकीय मान्यता दिलेल्या आहेत.

राज्य सरकारने मागील वर्षी पायाभूत सुविधा उपसमितीचा पुनर्रचना केली असून त्यानुसार आता तिचे नामकरण मंत्रीमंडळ समिती, असे करण्यात आले आहे. या समितीचे अध्यक्ष मुख्यमंत्री आहेत. राज्यातील कोणत्याही शासकीय विभागाने अथवा निमशासकीय विभागाने पायाभूत सुविधांसंबंधी २५ कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता दिल्यानंतर त्याला मंत्रिमंडळ समितीची मान्यता घेणे अनिवार्य असते.

Mantralaya
Kumbh Mela Infra: वेळेचे गणित हुकणार? अवघे 10 महिने शिल्लक! कुंभमेळा प्राधिकरणाच्या कामांचा वेग मंदावलाय का?

त्यानुसार कुंभमेळा प्राधिकरणने सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त प्रशासकीय मान्यता दिलेल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना मंजुरी मिळावी, यासाठी फेब्रुवारीमध्ये मंत्रीमंडळ समितीकडे प्रस्ताव पाठवले होते. त्यानंतर एप्रिलमध्ये आणखी एका प्रकल्पाचा समावेश करून या सर्व प्रकल्पांना मंत्रीमंडळ समितीची मान्यता मिळण्यासाठी स्मरणपत्र पाठवले होते. त्यानुसार मंत्रीमंडळ समितीने ६ हजार १६२ कोटी रुपयांच्या ६८ प्रकल्पांना मंजुरी दिली आहे.

या ६८ प्रकल्पांमधील ४४ प्रकल्प हे परिशिष्टमधील असून त्यातील कामे प्रामुख्याने सिहस्थानिमित्ताने रस्ते, घाट, उपसासिंचन, सीसीटीव्ही, मुकणे धरणातून पाणीपुरवठा योजना आदी आहेत. या ४४ कामांसाठी ३५९२ कोटी रुपयांच्या खर्चास मंत्रीमंडळ समितीने मंजुरी दिली आहे.

Mantralaya
Nashik: सिंहस्थ कुंभमेळ्यातील हजारो कोटींची कामे आचारसंहितेच्या कचाट्यात

परिशिष्ठ ब मध्ये १६ कामांचा समावेश असून त्यात प्रामुख्याने त्र्यंबकेश्वर येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, त्र्यंबकेश्वर येथील दर्शन पथ टप्पा दोन, गोदावरी- नंदिनी संगमावरील रबर बंधारा, ओझर येथील विमानतळ टर्मिनल विकसित करणे आदींचा समावेश आहे. मंत्रीमंडळ समितीने या १६ कामांसाठी १५०७ कोटी रुपयांच्या कामास मंजुरी दिली आहे.

परिशिष्ठ क मध्ये कावनई, बेझे, टाकेद येथील कामे, नाशिक महापालिका वाहनतळ, पाणी पुरवठा विभाग, आरोग्य विभाग, विद्युत विभाग, घनकचरा विभाग, वाहनतळ आदी ८ कामांच्या १०६३ कोटी रुपयांच्या कामांचा समावेश असून मंत्रीमंडळ समितीने या कामांना मंजुरी दिली आहे.

Tendernama
www.tendernama.com