नाशिक परिसरात वर्षाला 40.69 लाख टन गौणखनिज उपलब्ध; सिंहस्थासाठी टंचाई नसल्याचे प्रशासनाचे स्पष्टीकरण

नाशिक शहरापासून ३० किमी त्रिज्येत ३३ कार्यरत खाणपट्टे; जिल्ह्यातील ११६ खाणपट्ट्यांची एकत्रित वार्षिक उत्पादन क्षमता ९१.३४ लाख टन
mining
miningTendernama
Published on

नाशिक (Nashik): अनधिकृत गौणखनिज उत्खननावरील कारवाईमुळे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पायाभूत सुविधा कामांसाठी खनिजाचा पुरवठा कमी होत असल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नाशिक परिसरात गौणखनिजाची पुरेशी उपलब्धता असल्याचे स्पष्ट केले आहे. नाशिक शहरापासून ३० किलोमीटरच्या त्रिज्येत ३३ कार्यरत खाणपट्टे असून त्यांची एकत्रित वार्षिक उत्पादन क्षमता ४० लाख ६९ हजार १०० टन आहे. जिल्ह्यातील ११६ कार्यरत खाणपट्ट्यांची एकत्रित वार्षिक उत्पादन क्षमता ९१ लाख ३४ हजार ५०५ टन असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

mining
Dahisar Transport Hub: 1,481 कोटींच्या दहिसर मल्टिमोडल हबचे काम तात्पुरते स्थगित; रहिवाशांच्या तक्रारींनंतर सरकार ॲक्शन मोडमध्ये

गेले काही महिन्यांपासून नाशिक येथील अनधिकृत गौणखनिज उत्खनन व त्यावरील कारवाई यामुळे सिंहस्थ कामांसाठी आवश्यक असलेल्या गौणखनिज पुरवठ्यावर परिणाम होत असल्याचे आरोप होत होते. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात ११६ कार्यरत खाणपट्टे असून, त्यांची एकत्रित वार्षिक उत्पादन क्षमता ९१ लाख ३४ हजार ५०५ टन आहे. तसेच नाशिक शहरापासून ३० किलोमीटरच्या परिघात ३३ खाणपट्टे असून, त्यांची वार्षिक उत्पादन क्षमता ४० लाख ६९ हजार १०० टन असल्याचे स्पष्ट करीत नाशिक परिसरात गौणखनिजाची कमतरता नसल्याचे स्पष्ट केले आहे.

mining
BMC: टेंडर न काढता एकाच कंपनीला जवळपास ₹70 लाखांची 8 कामे? स्थायी समितीत सर्वपक्षीय हल्लाबोल

नाशिक तालुक्यातील सारूळ परिसरात अनेक ठिकाणी बेकायदेशीरपणे गोणखनिज उत्खननाविरोधात जिल्हा प्रशासनाने कारवाई केली होती. या कारवाईमुळे सिंहस्थ कुंभमेळा कामांना गौणखनिज पुरवण्यावर परिणाम होत असल्याची ओरड केली जात होती. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकृत खाणपट्टाधारक, स्टोन क्रशरधारक आणि कंत्राटदारांची बैठक झाली. या वेळी जिल्हाधिकारी प्रसाद यांनी मार्गदर्शन केले. जिल्हा खनिकर्म अधिकारी दीपक चव्हाण यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने सुरू असलेल्या पायाभूत सुविधा कामांसाठी गौणखनिजाचा पुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी जिल्हा प्रशासनाने परवाना प्रक्रिया गतिमान केली आहे. गौणखनिजाची उपलब्धता आणि पुरवठा यासाठी कंत्राटदार व खाणपट्टाधारकांनी परस्पर समन्वय ठेवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले.

mining
Nashik Kumbh Mela: ₹34,732 कोटींच्या कामांना गती द्या; कंत्राटदारांना मुख्यमंत्र्यांचा इशारा

यावेळी बैठकीत जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील खाणपट्टे, त्यांची उत्पादन यांची सविस्तर माहिती दिली. त्यानुसार नाशिक जिल्ह्यात १ एप्रिल २०२५ पासून नवे अथवा नूतनीकरण झालेले ३१ खाणपट्टे कार्यरत असून, त्यांची वार्षिक उत्पादन क्षमता २७ लाख ३० हजार ५०० टन आहे. सध्या जिल्ह्यात एकूण ११६ कार्यरत खाणपट्टे असून, त्यांची एकत्रित वार्षिक उत्पादन क्षमता ९१ लाख ३४ हजार ५०५ टन आहे. त्यापैकी नाशिक शहरापासून ३० किलोमीटरच्या त्रिज्येत ३३ खाणपट्टे असून, त्यांची वार्षिक उत्पादन क्षमता ४० लाख ६९ हजार १०० टन आहे. याशिवाय जिल्हा खाणकाम योजनेंतर्गतही मोठ्या प्रमाणावर गौणखनिज साठा उपलब्ध आहे.

१ एप्रिल २०२५ पासून १७६ गटांमध्ये ६४ लाख ८७ हजार ६३२ ब्रास गौणखनिजाचा साठा अल्प मुदत परवानगीसाठी उपलब्ध आहे. तसेच २०१४ ते ३० मार्च २०२५ या कालावधीत दीर्घकालीन समावेश असलेल्या १,६९५ गटांमध्ये १४ कोटी ८८ लाख ५७ हजार ३५० ब्रास गौणखनिज साठा उपलब्ध असल्याची माहिती प्रशासनाने दिली. यामुळे परवानगी घेऊन गौणखनिज वाहतूक करणा-यांना खनिजाची टंचाई भासणार नाही, ही बाब प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आली. बैठकीस ७८ खाणपट्टाधारक आणि ४८ कंत्राटदार उपस्थित होते.

mining
Purandar Airport: भूसंपादनासाठी HUDCOच्या 6 हजार कोटींच्या कर्जाला मंजुरी

नियमांचे पालन आवश्यक
गौणखनिजाची उचल नियमानुसार करावी आणि वाहतुकीसाठी वाहतूक पासचा वापर करावा, असे प्रशासनाने स्पष्ट केले. यापूर्वी कारवाई झालेल्यांनी नियमानुसार अपील दाखल करावे, असेही सांगण्यात आले. सिंहस्थाच्या पायाभूत सुविधांच्या कामांना गौणखनिजाची कमतरता भासू नये, यासाठी उपलब्ध साठा, परवाना प्रक्रिया आणि पुरवठा साखळी यांचा समन्वय साधण्यात येत आहे. ज्या कंत्राटदारांना स्वतंत्र परवानगी घेणे आवश्यक आहे, त्यांनी तातडीने अर्ज करावेत. ऑक्टोबरमध्ये गौणखनिजाची मोठ्या प्रमाणावर मागणी वाढण्याची शक्यता असल्याने त्यादृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

Tendernama
www.tendernama.com