Nashik : 4 वर्षांत 817 कोटींचा खर्च; तरीही नाशकातील रस्त्यांच्या नशिबी केवळ पॅचेसच

road patches
road patchesTendernama
Published on

नाशिक (Nashik) : नाशिक महापालिकेने मागील चार वर्षांत शहरातील नवीन रस्ते तयार करणे व आधीच्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी तब्बल ८१७ कोटी रुपये खर्च केला आहे. यात ६६२ कोटींचे नवीन रस्ते तयार केले आहेत, तर १५५ कोटी रुपये शहरातील रस्ते दुरुस्तीवर खर्च केले आहेत. एवढ्या मोठ्याप्रमाणावर खर्च करूनही शहरातील फारच थोडे रस्ते चांगल्या स्थितीत असून बहुतांश रस्त्यांवर रस्ते दुरुस्तीच्या नावाखाली डांबरीकरणाची थिगळे (पॅचेस) लावलेली दिसत आहेत. महापालिकेने एवढा खर्च करूनही रस्त्यांची दुरवस्था असल्याने हा निधी गेला कोठे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

road patches
Nashik : रोजगार हमीत उजळमाथ्याने ठेकेदारीला प्रवेश; आमदारांची दीड हजार कोटींची...

नाशिक महापालिकेत गेले दोन वर्षांपासून ऑप्टिकल फायबर, महानगर गॅस लिमिटेडकडून टाकली जाणारी गॅसवाहिनी यासाठी मोठ्या प्रमाणावर रस्ते खोदले गेले. महापालिकेने पहिल्या वर्षी या रस्ते खोदकामाचे पावसाळ्यात काय परिणाम होऊ शकतात, याचा विचार केला नाही. परिणामी पावसाळ्यापूर्वी या खोदलेल्या रस्त्यांची दुरुस्ती केली नाही. यामुळे पावसाळ्यात रस्त्यांवर प्रचंड प्रमाणात खड्डे पडून नागरिकांचे खूप हाल झाले.

शहरातील सर्व रस्त्यांची अक्षरश: चाळणी झाली होती. यामुळे गॅसवाहिनी अथवा ऑप्टिकल फायबरसाठी रस्ते खोदकामासाठी एप्रिल अखेरपर्यंतच परवानगी दिली जाईल व पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्तीकेली जाईल, असे तत्कालीन आयुक्तांनी जाहीर केले होते. प्रत्यक्षात या घोषणेची अंमलबजावणी होण्याच्या आत त्यांची बदली झाली व पुन्हा पावसाळ्यात रस्त्यांची दुरवस्था जैसे थे  झाली.

नाशिक शहरातील रस्त्यांची दरवर्षी पावसाळ्यात दुरवस्था होते व पाऊस उघडल्यानंतर नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये रस्ते दुरुस्ती करण्याचा जणू शिरस्ता पडला आहे. यामुळे प्रत्येक पावसाळ्यात होत असलेल्या रस्त्यांवरील खडड्यांमुळे नागरिकांची टीका सहन करण्याची जणू महापालिकेला सवय पडली आहे.

road patches
पुणेकरांच्या सोईसाठी वाघोली ते शिरुरपर्यंतच्या उड्डाणपूलाची लांबी वाढणार 4 किमी

पावसाळा उघडल्यानंतर रस्ते दुरुस्तीची हमी देणारा हमापालिकेचा बांधकाम विभाग प्रत्यक्षात रस्त्यांवर डांबरीकरणाचे थिगळ जोडणे याला दुरुस्ती समजत असल्याने शहातील सर्व रस्त्यांवर मागील तीन-चार वर्षांचे असे थिगळे (पॅच) दिसून येतात. त्यामुळे शहरातील रस्ते असे थिगळांनी (पॅचेस) जोडले असल्याने शहरात पूर्णपणे सपाट, उंचसखलपणा नसलेला रस्ता शोधूनही सापडत नसल्याचे चित्र आहे.

नवीन रस्ते करण्यासाठी महापालिकेकडे निधी नसल्याने केवळ दुरुस्तीवर भागवले जात असल्याचे महापालिकेने चित्र उभे केले असले, तरी प्रत्यक्षात मागील चार वर्षांमध्ये महापालिकेने नवीन रस्ते तयार करणे व नादुरुस्त रस्त्यांची दुरुस्ती करणे यासाठी तब्बल ८१७ कोटी रुपये खर्च केले आहेत. मात्र, या रस्त्यांची कामे दर्जाहिन असल्यामुळे एकदा काम केल्यानंतर पहिल्याच पावसाळ्यात त्यांची दुरवस्था होते व महापालिकेकडून त्याचे खापर पावसावर फोडले जाते. यामुळे दरवर्षी खर्च होतो, पण नागरिकांना चांगले रस्ते मिळत नाहीत. यामुळे नाशिक शहरातील रस्त्यांची दुरवस्था हा केवळ पावसाळ्यातील नाही, तर वर्षभराचा प्रश्न बनला आहे.

road patches
Pune : पुण्यातील 'ते' 5 रस्ते लवकरच होणार 'आदर्श'?

रस्ते दुरुस्तीवरील वर्षनिहाय खर्च
२०२०-२१  : ३० कोटी
२०२१-२२ : २० कोटी
२०२२-२३ : २६ कोटी
२०२३-२४ : ७७ कोटी.

रस्ते विकासावरील वर्षनिहाय खर्च
२०२०-२१ : १३९ कोटी
२०२१-२२   :  १२५ कोटी
२०२२-२३   : १३५ कोटी
२०२३-२४  : १६२ कोटी.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com