Nashik : छगन भुजबळांनी करून दाखवलं! 'तो' रस्ता होणार चौपदरी; 134 कोटी मंजूर

Road Work (File)
Road Work (File) Tendernama

नाशिक (Nashik) : निफाड तालुक्यातील लासलगाव ते विंचुर चौपदरी रस्ता आणि मधारणगांव सारोळे ते खेडलेझुंगे या रस्त्याचे कॉंक्रिटीकरणासाठी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी मंजुरी मिळवली आहे.

यासाठी १३४ कोटी १८ लक्ष रुपये निधी मंजूर झाला आहे. लासलगाव विंचूर हा महत्वाचा रस्ता असून त्यावरून लासलगाव बाजारसमितीला जाणाऱ्या वाहनांची मोठी वर्दळ असल्याने तो कायम नादुरुस्त होत असतो. यामुळे त्याचे काँक्रिटिकरण करण्यात येणार आहे.

Road Work (File)
Nashik : दादा भुसे, छगन भुजबळांनी मिळवलेला 'तो' 61 कोटींचा निधी अडकला आचारसंहिंतेत

येवला विधानसभा मतदारसंघात सार्वजनिक बांधकाम विभाग नाशिक अंतर्गत निफाड तालुक्यातील लासलगाव-विंचूर राज्यमार्ग ७ या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. हा रस्ता विंचूर येथे राज्यमार्ग क्रमांक २ या चौपदरी रस्त्याला मिळतो. लासलगाव येथे आशिया खंडातील कांद्याची सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ आहे.

या रस्त्यावर दळणवळण अधिक असल्यामुळे सतत अपघात होत असतात. त्यामुळे चांदवड हद्द- लासलगाव ते विंचुर चौपदरी रस्ता आणि म्हसोबा माथा धारणगांव सारोळे ते खेडलेझुंगे या रस्त्याचे कॉंक्रिटीकरण करण्यासाठी छगन भुजबळ यांचे प्रयत्न होते.

महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळाच्या माध्यमातून चांदवड हद्द- लासलगाव ते विंचुर हा ९.६०० किलोमीटर चौपदरी रस्ता आणि म्हसोबा माथा धारणगांव सारोळे ते खेडलेझुंगे या १४.१०० कि.मी. लांबीच्या रस्त्याचे कॉंक्रिटीकरण करण्यासाठी शासनाची मंजुरी मिळाली आहे. या कामासाठी १३४ कोटी १८ लक्ष रुपये खर्च येणार आहे.

Road Work (File)
Mumbai SRA News : तब्बल 15 वर्षे रखडलेला मुंबईतील 'तो' एसआरए प्रकल्प अखेर रुळावर

लासलगाव विंचूर हा अतिशय वर्दळीचा रस्ता असून या रस्त्याचे चौपदरीकरण झाल्याने येथील रस्त्यावरून येणारे वाहतुकीचे अडथळे कमी होणार आहे. तसेच या रस्त्यावरील अपघातांना देखील आळा बसणार आहे. त्याचबरोबर लासलगाव येथून सिन्नर व शिर्डीकडे जाणारा बोकडदरा खेडलेझुंगे रस्त्याची रुंदी ५.५ मीटर वरुन ७ मीटर होणार असल्याने या रस्त्यावरील दळणवळण अधिक सुलभ होणार आहे.

महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेल्या या रस्त्यांच्या कामाची आचारसंहिता काळात टेंडर प्रक्रिया पूर्ण होऊन लोकसभा निवडणुकीनंतर लगेच कामाला सुरुवात होणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com