Nashik: त्र्यंबकेश्वरमध्ये आणखी 108 कोटींची सिंहस्थ विकासकामे मंजूर

आखाडे, वाहनतळ, नवीन प्रशासकीय इमारतीसाठी निधी मंजूर
Kumbh Mela
Kumbh MelaTendernama
Published on

नाशिक (Nashik): नाशिक - त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाच्या बैठकीत त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळ्याशी निगडित १०८ कोटी २७ लाख रुपये खर्चाच्या विविध विकास कामांना अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम यांनी मंजुरी दिली आहे. यावेळी सिंहस्थ कुंभमेळ्याशी संबंधित विकास कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी संबंधित प्रशासकीय विभागांनी लवकरात लवकर ना हरकतीचे दाखले देण्याची प्रक्रिया पूर्ण करावी, असे निर्देश प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिले. या मंजुरीमुळे त्र्यंबकेश्वर येथील १० आखाडे, वाहनतळ, त्र्यंबकेश्वर येथील नवीन प्रशासकीय इमारत यांना निधी उपलब्ध होणार आहे.

Kumbh Mela
Nashik: झेडपीची कोट्यवधींची विकासकामे का रखडली? कोणी काढला फतवा?

नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाशी संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांशी डॉ. गेडाम यांनी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांच्यासह इतर सर्व विभागांचे वरीष्ठ अधिकारी सहभागी झाले होते.

या बैठकीत त्र्यंबकेश्वर येथे नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकामास प्रशासकीय मंजुरी देणे, खेरवाडी, सुकेणे, ओढा, देवळाली या रेल्वे स्थानकांवर पाणीपुरवठा विषयक कामांना प्रशासकीय मंजुरी देणे, त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेंतर्गत भूसंपादित व अधिग्रहित जागांचे सर्वेक्षण व अनुषंगिक कामांसाठी सर्वेक्षण सल्लागार नेमणुकीसाठी प्रशासकीय मंजुरी देणे, सिंहस्थ कुंभमेळा आराखडा योजनेंतर्गत त्र्यंबकेश्वर येथील विविध दहा आखाड्यांमध्ये टॉयलेट ब्लॉक, अंतर्गत रस्त्यांच्या कामांसह अनुषंगिक कामांना प्रशासकीय मंजुरी देणे, त्र्यंबकेश्वर परिसरातील वीज पुरवठा यंत्रणेच्या बळकटीकरणासाठी आवश्यक कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली.

Kumbh Mela
नाशिक ते चेन्नई ग्रीनफिल्ड एक्सप्रेस-वेबाबत आली मोठी बातमी

सप्तश्रृंग गड येथे नवीन बसस्थानकाचे बांधकाम करण्यासाठी प्रशासकीय मंजुरी दिली आहे. या सर्व कामांमुळे त्र्यंबकेश्वर व वणी परिसरातील पायाभूत सोयीसुविधा बळकट होऊन येणाऱ्या भाविकांना विविध सोयी सुविधा प्राप्त होणार आहेत. 

कुंभमेळा आयुक्त सिंह यांनी त्र्यंबकेश्वर येथे सोयीसुविधांसाठी आवश्यक कामांची माहिती दिली. मनपा आयुक्त श्रीमती खत्री यांनी कामांसाठी ना हरकत दाखले देण्यासाठी करण्यात येत असलेल्या कार्यवाहीची तर जिल्हाधिकारी प्रसाद यांनी प्रशासकीय इमारतीस आवश्यक जागा, भूसंपादन व अधिग्रहित जमीनीबाबतची माहिती बैठकीत दिली.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com