Nashik : सिन्नरच्या मुसळगाव-माळेगाव एमआयडीसीना रिंगरोडने जोडणार

Ring Road
Ring RoadTendernama

नाशिक (Nashik) : सिन्नर शहराजवळील माळेगाव व मुसळगाव या दोन औद्योगिक वसाहतींना जोडण्यासाठी सात किलोमीटरचा रिंगरोड अर्थात बाह्यवळण रस्ता उभारण्यात येणार आहे. एमआयडीसीने या रस्त्यासाठी आवश्यक ३१ हेक्टरच्या भूसंपादनाची नोटीस प्रसिध्द केली असून, भूसंपादनाची प्रक्रियाही सुरू झाली आहे. या बाह्यवळण रस्त्यामुळे सिन्नर शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न तर सुटेलच याशिवाय शहराच्या विकासाला चालनाही मिळणार आहे. आमदार माणिकराव कोकाटे यांच्या प्रस्तावानंतर महाराष्ट्र औद्योगिक वसाहत हा बाह्यवळण मार्ग उभारणार आहे. 

Ring Road
धारावी पुर्नविकासाचे 'या' प्रख्यात जागतिक कंपन्या करणार नियोजन; सिंगापूरच्या तज्ज्ञांचाही सहभाग

सिन्नर शहराच्या पश्चिम व पूर्व बाजूस माळेगाव, मुसळगाव या औद्योगिक वसाहती आहेत. तसेच मुसळगाव येथील सहकारी औद्योगिक वसाहतीला लागून इंडिया बुल्स विशेष आर्थिक क्षेत्र (सेझ) आहे. या औद्योगिक वसाहतींमुळे सिन्नरच्या विकासाला गती मिळाली आहे. नवीन उद्योगांमुळे रोजगार वाढला तसा शहराचा विस्तारही होत आहे. सिन्नर शहरातून जात असलेल्या नाशिक पुणे महामार्ग व घोटी सिन्नर मार्ग यामुळे वर्षानुवर्षे वाहतूक कोंडीवर बाह्य वळण मार्गाद्वारे उपाय शोधला आहे. तसेच घोटी सिन्नर मार्गही सिन्नर बाहेरून गुरेवाडीमार्गे वळवण्यात आला आहे. यामुळे सिन्नरमधील वाहतूक कोंडी सुटली आहे.

Ring Road
Nashik : जिल्हा परिषदेचे जलजीवनची हजार कामे पूर्ण करण्याचे लक्ष्य

दरम्यान सिन्नरच्या या दोन्ही औद्योगिक वसाहतीना जोडणारा स्वतंत्र मार्ग नसल्याने ही वाहतूक सिन्नर शहरातून होत असते. तसेच सिन्नरच्या उत्तर भागातल्या नव वसाहतींमधील रहिवाशांना या औद्योगिक वसाहतीमध्ये रोजगारासाठी जाताना सिन्नर शहरातून जावे लागत असते. त्यामुळे महार्गावरील वाहतूक कोंडी सुटली असली तरी सिन्नर शहरातील वाहतूक कोंडी कायम आहे. यावर उपाय शोधण्यासाठी सिन्नरच्या उत्तर बाजूने माळेगाव ते मुसळगाव असा सात किलोमीटर लांबीचा बाह्यवळण रस्ता एमआयडीसीने प्रस्तावित केला आहे. हा बाह्यवळण रस्ता माळेगावजवळ नाशिक-पुणे महामार्गापासून सुरू होऊन सिन्नर शिर्डी मार्गाला मुसळगाब येथे जोडला जाणार आहे. या सात किलोमीटर बाह्यवळण मार्गामुळे नाशिकहुनशिर्डीला जाणाऱ्या वाहनांना सिन्नरच्या दक्षिण बाजूच्या सध्याच्या बाह्यवळण रस्त्याने जाण्याची गरज पडणार नाही. तसेच गुरेवाडीमार्गे लांबचा वळसा टाळता येणार आहे. त्याचबरोबर  सिन्नरच्या उत्तर भागातील लोकांना औद्योगिक वसाहतीत जाण्यासाठी अथवा नाशिक, शिर्डी रस्त्यावर येण्यासाठी सिन्नर शहरात येण्याची आवश्यकता भासणार नाही. राज्य सरकारने इंडियाबुल्स ‘सेझ’ प्रकल्पाची जमिनही ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे भविष्यात याठिकाणी नवीन औद्योगिक वसाहत उभी राहू शकते. त्यादृष्टीने या बाह्यवळण रस्त्याची सिन्नरकरांना नितांत आवश्यकता आहे. यामुळे आमदार माणिकराव कोकाटे यांनी एमआयडीसीकडे प्रस्ताव मांडल्यानंतर सात किलोमीटर रस्त्यासाठी प्रथमत: भूसंपादनाची नोटीस जारी केली आहे. त्यानुसार ३१ हेक्टर रस्त्यासाठी जमिनीची आवश्यकता लागेल. साधारणत: ४५ मीटर रुंद व सात किलोमीटर लांबीचे भूसंपादन केले जात आहे. भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रस्त्याच्या कामाला प्रारंभ होईल, असे एमआयडीसीच्या सूत्रांनी सांगितले.

Ring Road
Nashik : नियोजन समितीचा केवळ 32 टक्के खर्च; आठवड्यात प्रशासकीय मान्यता देण्याचे...

वाहतूक कोंडीतून मुक्तता

सिन्नर शहरातून जाणाऱ्या घोटी सिन्नर व नाशिक पुणे या दोन मार्गांमुळे गेले अनेक वर्षे वाहतूक कोंडीचा सिन्नरकरांनी सामना केला. त्यावर आता कुठे तोडगा निघाला असला तरी सिन्नरच्या उपनगरांमध्ये जाण्यासाठी व तेथून पुन्हा बाहेर पडण्यासाठी सिन्नर शहरातून जाण्याशिवाय पर्याय नाही. यामुळे सिन्नर शहराच्या अरुंद गल्ल्यांमध्ये कायम वाहतूक कोंडी असते. हा प्रस्तावित रिंगरोड झाल्यानंतर शहरांतर्गत वाहतूककोंडीतून स्थानिक रहिवाशांची मुक्तता होणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com