प्रेस महामंडळ गुजरातमधील गिफ्टसिटीमध्ये उभारणार सोन्यांची नाण्यांची टाकसाळ

Smart City
Smart CityTendernama

नाशिक (Nashik) : केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या सिक्युरिटी प्रेस ऍण्ड मिंट महामंडळाने (एसपीएससीएल) गुजरातमधील गिफ्टसिटी येथे सोन्याची नाणे तयार करण्यासाठी टाकसाळ उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी अनुभवी संस्थांकडून देकार मागवण्यासाठी टेंडर प्रसिद्ध केले आहे. संबंधित संस्था १६ ऑक्टोबरपर्यंत यात सहभाग घेता येणार आहे. या प्रकल्पात सोने शुद्ध करून त्यापासून नाणी तयार करण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पाची क्षमता वर्षाला ५०० टन सोन्यापासून नाणे तयार करण्याची असणार आहे.

Smart City
मुंबईतील सफाई कामगारांच्या वसाहतींचा कायापालट करणार; CM Eknath Shinde

प्रेस टाकसाळ महामंडळ अर्थात सिक्युरिटी प्रेस अॅण्ड मिंट महामंडळ हे मिनी रत्न श्रेणीतील केंद्रीय अर्थ  मंत्रालयाचे स्वायत्त महामंडळ आहे. सध्या देशात नाशिक, देवास, कोलकत्ता, हैदराबाद, मुंबई येथे महामंडळाचे नोट छपाईचे मुद्रणालय, टाकसाळी आणि कागद कारखाने आहेत. त्यात, नोटा, नाणे, 'नॉन ज्युडिशियल स्टॅम्प', पासपोर्ट, टपालाचे साहित्यासह लष्कर, उत्पादन शुल्कासह विविध अद्ययावत सुरक्षा विषयक साहित्याची छपाई होते. भारत सरकार भविष्यात डिजीटल करन्सीच्या दिशेने वाटचाल करीत असल्यामुळे नोटा छपाईच्या भविष्याबाबत कामगार संघटनांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. यामुळे नाशिक येथील नोट छपाईच्या मुद्रणालयाने नेपाळमधील नोटा छपाईचे कंत्राट मिळवले आहे. एकीकडे भारतातील चलन व प्रतिभूती मुद्रणालय जागतिक स्तरावरील टेंडरमध्ये सहभागी होऊन कामे मिळवण्याचे नियोजन करीत असतानाच केंद्रीय अर्थमंत्रालयाने देशात पारंपारिक मुद्रणालय व टाकसाळींबरोबरच आता शुद्ध सोन्याच्या नाण्याची छपाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

Smart City
Nashik : आयआयटी रुरकीच्या पथकाने केली मलनिस्सारण पथकाची पाहणी

गुजरातमधील गांधीनगर जवळील ८८६ एकरात साकारणारा 'गिफ्ट सिटी' हा केंद्र सरकारचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकारला जात आहे. अर्थ-तंत्रज्ञान क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय स्तरावरील शहराची उभारणी या गिफ्टसिटीच्या माध्यमातून होत आहे. यामुळे प्रेस टाकसाळ महामंडळातर्फे केंद्रीय मध्यवर्ती आर्थिक जिल्हा म्हणून नावारूपाला येणाऱ्या 'गिफ्ट सिटी'मध्ये सोन्याचे मेल्टिंग, रिफायनिंग आणि मिंटींग म्हणजे सोने वितळविणे, शुद्धीकरण करणे व त्यापासून शुद्ध सोन्याची नाणी तयार करण्याचा प्रकल्प उभारला जाणार आहे.  सोने शुद्धीकरणातील एक महत्त्वाचा सार्वजनिक उद्योग म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रेस महामंडळ नावारुपाला येण्यासाठी तयारी करीत आहे. या माध्यमातून केंद्र सरकारचे महामंडळ सोन्या-चांदीच्या शुद्धीकरण क्षेत्रात उतरणार आहे. या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी अनुभवी संस्थांकडून देकार मागवले आहेत.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com