रखडलेल्या किकवी धरणासाठी अखेर भूसंपादनाला सुरवात; मालमत्ता मोजणीसाठी ७७ लाखांचे टेंडर

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील १० गावांतील ८४९ गटांचे अधिग्रहण प्रस्तावित; १२ महिन्यांत सीमांकन, मोजणी आणि मूल्यांकन करण्याची अट
गंगापूर धरणातील चर खोदण्याच्या कामाला अखेर मुहूर्त
gangapur damTendernama
Published on

नाशिक (Nashik): नाशिक शहराच्या भविष्यातील पिण्याच्या पाण्याची गरज भागवण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील किकवी धरणाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या दिशेने आता आणखी एक पाऊल पुढे पडले आहे. यावर्षी एप्रिलमध्ये या धरणाच्या पायाभरणीसाठी ५२ हेक्टर भूसंपादन करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतल्यानंतर या प्रकल्पासाठी आवश्यक जमिनीच्या भूसंपादन प्रक्रियेला सुरुवात करण्यासाठी जलसंपदा विभागाने मालमत्ता सीमांकन, मोजणी व मूल्यांकनाचे काम करण्यासाठी संस्था नेमण्यासाठीचे टेंडर प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या किकवी प्रकल्पासाठी आता जमीन संपादनाच्या प्रत्यक्ष प्रक्रियेला गती मिळण्याची शक्यता आहे.
 

गंगापूर धरणातील चर खोदण्याच्या कामाला अखेर मुहूर्त
द्वारका ते नाशिकरोड 10 पदरी रस्त्याचे काय झाले? 6 महिन्यांपासून टेंडर-टेंडरचा खेळ

नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरणात गाळ साचल्याने त्याचा साठा कमी झाला आहे. यामुळे हा साठा पुनर्स्थापित करण्यासाठी या धरणाच्या उर्ध्व बाजूस किकवी नदीवर २.४ टीएमसी नवीन धरण बांधण्यासाठी २६ ऑगस्ट २००९ रोजी २८३.५४ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता दिली होती. या प्रकल्पासाठी  १७२.४  हेक्टर वनजमीन व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील १० गावातील ७३४.५ हेक्टर खाजगी जमिनीची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने १७२.४ हेक्टर वनजमीन हस्तांतरण प्रस्तावास भारत सरकार पर्यावरण आणि वन विभागाकडून २०१४ मध्ये तत्वतः मान्यता मिळालेली आहे. तसेच केंद्र शासनाकडून या प्रकल्पाच्या पर्यावरण प्रस्तावासही त्यानंतर मान्यता मिळालेली आहे.

या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्यार खाजगी जमिनीच्या भूसंपादनासाठी संयुक्त पाहणी पूर्ण झालेली आहे. त्यानंंतर नांदूर मध्यमेश्वर प्रकल्प विभागामार्फत टेंडर काढण्यात आले असून त्यात प्रकल्पासाठी संपादित करावयाच्या जमिनीवरील मालमत्तांचे सीमांकन करणे, त्यांची मोजणी व मूल्यांकन करणे, आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देणे तसेच संबंधित कामाचे व्हिडिओ चित्रीकरण करणे, अशी कामे नियुक्त करण्यात येणाऱ्या संस्थेला करावी लागणार आहेत. या कामासाठी ७७.३९ लाख रुपयांचे टेंडर असून, कामाची मुदत १२ महिने ठेवण्यात आली आहे.

गंगापूर धरणातील चर खोदण्याच्या कामाला अखेर मुहूर्त
Nashik: सिंहस्थातील ३ रस्त्यांच्या गुणवत्तेवर आयआयटी मुंबईची मोहोर; महापालिकेला दहापैकी दहा गुण

या प्रक्रियेमुळे केवळ जमीन संपादनासाठी आवश्यक असलेल्या कागदोपत्री कार्यवाहीऐवजी प्रत्यक्ष जमिनीची मोजणी, मालमत्तांचे मूल्यांकन आणि सीमांकन करण्याचे काम सुरू होणार आहे. त्यामुळे पुढील टप्प्यात संबंधित जमीनधारकांची माहिती निश्चित करून भूसंपादनाची प्रक्रिया पुढे नेण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.


या गावात होणार भूसंपादन
तळवाडे, ब्राह्मणवाडे, पिंप्री, घुमोडी, शिरसगाव, काचुर्ली, सापगाव, पिंपळद, तळेगाव, अंबोली.

किकवी धरण
- धरण साठवण क्षमता २.४ टीएमसी
- किकवीसाठी ९०२.२०५ हेक्टर संपादन
- दहा गावांतील ८४९ गटांचे अधिग्रहण करावे लागणार
- १३१ जागामालकांची संपादनास पूर्वलेखी संमती
- नाशिक शहराची २०५५ पर्यंतची पाण्याची गरज भागणार
- गोदावरी नदीचे पूरनियंत्रण करणे शक्य

Tendernama
www.tendernama.com