Nashik : मालमत्ता कर बुडवल्याने 'समृद्धी'च्या ठेकेदाराला ग्रामपंचायतीची नोटीस

Contractor
ContractorTendernama

नाशिक (Nashik) : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित ठेकेदार कंपन्यांनी खराब झालेले रस्ते, शेतांमधील वहिवाटीचे रस्ते याबाबत हात वर करण्याची भूमिका घेण्याबरोबरच ग्रामपंचायतींच्या हद्दीत केलेल्या व्यापारी वापराबाबतचा मालमत्ता कर थकवण्याचे प्रकारही उघडकीस आले आहेत. समृद्धी महामार्गाचे काम करणार्या कंपन्या मोठ्या असल्यामुळे त्या ग्रामसेवक, सरपंच यांना जुमानत नसल्याचे दिसत आहे. यामुळे सिन्नर तालुक्यातील दातली ग्रामपंचायतीने दिलीप बिल्डकॉन या ठेकेदार कंपनी, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ व संबंधित भूसंपादन उपजिल्हाधिकारी यांना मालमत्ता कराचा भरणा करण्यासाठी नोटीस बजावली आहे. या कंपनीने दातली ग्रामपंचायत हद्दीत सार्वजनिक रस्ते, खासगी जागांच्या सुमारे सहा वर्षे खोदकामासह वाणिज्यिक वापर केला आहे. त्यापोटीची ग्रामपंचायतीचा १९ लाख रुपये मालमत्ता कर थकवला आहे. दिलीप बिल्डकॉन कंपनीने ग्रामपंचायतीकडे थकीत घरपट्टी न भरल्यास न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा या नोटीशीत देण्यात आला आहे.

Contractor
Mumbai-Goa Highwayच्या जलदगती कामासाठी आता 'या' नव्या तंत्रज्ञानाचा वापर

समृद्धी महामार्गासाठी मोठा भराव उभारण्यात आला. यासाठी मोठ्याप्रमाणावर दगड आणि मुरूम लागणार असल्याने ठेकेदार कंपन्यांनी त्या त्या ग्रामपंचायत हद्दींमध्ये ग्रामपंचायतींचे ना हरकत दाखले घेऊन उत्खनन केले. तसेच ग्रामीण रस्त्यांचा वापर केला. तसेच इतरही वाणिज्य वापर केला. याच पद्धतीने दिलीप बिल्डकॉन या ठेकेदार कंपनीने सिन्नर तालुक्यातील दातली ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील गट क्रमांक ३९८ मध्ये २.९८ हेक्टर व गट क्रमांक ६०६ मध्ये २.५१ हेक्टरवर उत्खनन करण्यासाठी नोव्हेंबर व डिसेंबर १०१८  मध्ये ग्रामसभांमध्ये खोदकामासाठी ना हरकत दाखले मिळवले.

Contractor
Shinde, Fadnavis, Pawar : राज्य सरकारचे आता 'रस्ते विस्तार मिशन'; तब्बल 5 हजार कोटींतून...

त्यानुसार दिलीप बिल्डकॉनने समृद्धी महामार्गासाठी गौण खनिज मिळवताना ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील जागांच्या वापर, तसेच सुमारे सहा वर्षे अवजड वाहनांतून मुरूम, दगड, माती वाहून नेण्यासाठी रस्त्यांचा वापर केला. याबद्दल दातली ग्रामपंचायतीने मे २०२२ मध्ये कंपनीला घरपट्टी (मालमत्ता) कराचे १९ लाख २० हजार ६०१ रुपयांचे देयक पाठवले होते. मात्र, त्याकडे कंपनीने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. यामुळे ग्रामपंचायतीने कंपनीला सप्टेंबर २०२२ मध्ये जप्तीची नोटीस पाठवली. तरीही कंपनीने कुठलाही कर भरला नाही. दिलीप बिल्डकॉनकडून चालढकल होत असल्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने थकीत घरपट्टी वसुलीसाठी न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान समृद्धी महामार्गाच्या कामासाठी शासनाने रॉयल्टी माफ केल्याचे सांगत ग्रामपंचायतींना कर आकारणी करण्याचा अधिकार नाही, असे कारण दिलीप बिल्डकॉनच्या व्यवस्थापनाकडून देणत कर भरण्यास नकार दिला आहे.

Contractor
Nashik : 20 कोटींची गुंतवणूक, 300 महिलांना रोजगार; नाशकात 'सह्याद्री'चं पुढचं पाऊल!

घोरवड ग्रामपंचायतीला मिळाला कर
सिन्नर तालुक्यातीलच घोरवड ग्रामपंचायतच्या हद्दीत समृद्धीमहामार्गाचे टप्पा क्रमांक १३ मध्ये बांधकाम करणाऱ्या बीएससीपीएल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीने घोरवड ग्रामपंचायतला कर मागणीची बिले अदा केली आहेत. दिलीप बिल्डकॉनने दातली ग्रामपंचायतच्या कार्यक्षेत्रातील मिळकतींमध्ये खोदकाम करण्यासाठी ग्रामसभेचे ना हरकत प्रमाणपत्र मिळवले. प्रत्यक्षात नियमाप्रमाणे त्याठिकाणी सहा मीटर खोलीपर्यंत खोदकाम करणे बंधनकारक असताना, अधिकच्या क्षेत्रात आणि १६ ते २० मीटर खोलीपर्यंत खोलीकरण केले. ही बाब चुकीची आणि बेकायदेशीर आहे. संबंधित शासकीय यंत्रणांनी याची खातरजमा जमा करावी, असेही ग्रामपंचायतीच्या नोटिसीत नमूद केले आहे.

Contractor
Nagpur : धरणासाठी जमिनी दिलेल्या शेतकऱ्यांनाच मिळेना पाणी

ग्रामपंचायतीचे म्हणणे
समृद्धी महामार्गाच्या ५०० किलोमीटरच्या अंतरात स्थानिक ग्रामपंचायतीकडे त्या-त्या पॅकेजमधील ठेकेदारांनी मालमत्ता कर भरणा केला आहे. केवळ  दिलीप बिल्डकॉनने ग्रामपंचायतींना कर भरणा केला नाही. वावी, दातली, गोंदे या तीन ग्रामपंचायतींची ही परिस्थिती आहे. दातली ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात ग्रामसभेच्या ठरावाव्यतिरिक्त बेकायदेशीर उत्खनन केले. ग्रामपंचायत कर मागणी पत्रानुसार देयक अदा करावे. तसेच सरकारने या बेकायदेशीर उत्खननाची चौकशी करावी, असे ग्रामपंचायतीचे म्हणणे आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com