Dada Bhuse : 'समृद्धी'च्या टोलनाक्यांवर स्थानिकांना मिळणार Good News! काय म्हणाले दादा भुसे?

dada bhuse
dada bhusetendernama

नाशिक (Nashik) : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर उभारण्यात येणारे टोलनाके तसेच इतर १८ ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पांमध्ये स्थानिक नागरिकांना रोजगारासाठी प्राधान्य दिले जाईल, अशी घोषणा सार्वजनिक बांधकाममंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी केली आहे.

dada bhuse
Nashik : नाशिक जिल्ह्यातील 2 हजार शाळा, ग्रामपंचायत कार्यालयांचे वीजबील शून्यावर येणार; काय आहे कारण?

समृद्धी महामार्गाच्या भरवीर ते इगतपुरी या तिसऱ्या टप्प्याचे लोकार्पण अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण तथा जनजातीय कार्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री भुसे यांच्या हस्ते इगतपुरी पथकर प्लाझा, नांदगाव सदो येथे करण्यात आले. यावेळी मंत्री भुसे यांनी समृद्धी महामार्गाच्या अनुषंगाने स्थानिक शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यात येतील, असेही आश्वासन दिले.

समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्राची भाग्यरेषा ठरणार आहे. मुंबई ते नागपूर दरम्यान असणारा हा समृद्धी महामार्ग शेतमालाची वाहतूक करण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे, असा विश्वास अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.

dada bhuse
Nashik : नाशिककरांसाठी Good News! 2018 नंतरची घरपट्टीतील वाढ रद्द होणार; काय म्हणाले मुख्यमंत्री?

मंत्री भुसे म्हणाले, मुंबई ते नागपूर दरम्यान असणाऱ्या ७०१ किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गाचे ६२५ किलोमीटर रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित नांदगाव सदो ते आमने हे २५ किलोमीटरचे काम लवकरच पूर्ण होणार होणार आहे. समृद्धीवरील अपघातांना आळा घालण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचे यावेळी भाषण झाले. यावेळी आमदार हिरामण खोसकर, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. अनिलकुमार गायकवाड, समृद्धी महामार्गाचे सहव्यवस्थापक कैलास जाधव, मुख्य अभियंता एस. के. सुरवसे, उपजिल्हाधिकारी तथा उप व्यवस्थापक विठ्ठल सोनावणे, तहसीलदार तथा व्यवस्थापिका रचना पवार आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com