Nashik : राज्यातील  रोजगार हमी मजुरांचे थकलेले 480 कोटी रुपये अखेर केंद्र सरकारकडून जमा

Mnerga
MnergaTendernam

नाशिक (Nashik) : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या जिल्ह्यातील कुशल कामे, अर्धकुशल व अकुशल मजुरांचे ११ जानेवारी २०२४ पासून थकलेली १५ कोटींची रक्कम अखेर मजुरांच्या खात्यात जमा झाली आहे. केंद्र सरकारने २४ एप्रिलला ही रक्कम मंजूर केली असून टप्प्याटप्प्याने सर्व मजुरांना ही रक्कम मिळाली आहे. राज्यभरातील रोजगार हमीवरील अकुशल, कुशल व अर्धकुशल कामांचे थकलेले ४८० कोटी रुपये रक्कम केंद्र सरकारने संबंधितांच्या बँक खात्यात जमा केल्याने मजुरांची प्रतीक्षा संपली असून यापुढे प्रत्येक आठवड्याला मजुरांच्या खात्यात रक्कम जमा व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Mnerga
Nashik : टँकरद्वारे पाणी पुरवठादारांचे 15 कोटी रुपये थकले? जिल्हा प्रशासनाकडून सरकारकडे...

ग्रामीण भागातील अकुशल मजुरांना वर्षभरात किमान १०० दिवस रोजगाराची हमी देण्यासाठी केंद्र सरकारने महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना कायदा केलेला असून त्यात मजुरांची ऑनलाईन हजेरी घेऊन दर आठवड्याला त्यांच्या कामाची रक्कम बॅक खात्यात जमा केली जाते. ही मजुरीची रक्कम केंद्र सरकार थेट जमा करीत असते. रोजगार हमी योजनेतून मजुरांना मजुरी देण्याबाबत एक वेळापत्रक निश्चित केलेले असून त्यात एक दिवस उशीर झाला, तरी संबंधिताविरोधात दंडात्मक कारवाई करण्याचे कायद्यात प्रावधान आहे. मात्र, २०२३--२४  या आर्थिक वर्षात तीनवेळा मजुरांचे वेतन थकवण्याचा प्रकार घडला. केंद्र सरकारकडून निधी न आल्याने रोजगार हमीच्या कामांवरील मजुरांना दोन-दोन महिने वाट बघावी लागली. मागील वर्षात सप्टेंबर व ऑक्टोबर या दोन महिन्यांचे रोजगार हमी मजुरांचे पैसे केंद्र सरकारने नोव्हेंबरमध्ये दिले. त्यानंतर दोन नोव्हेंबरपासून पुन्हा थकवण्यात आलेले वेतन जानेवारी २०२४ मध्ये दिले. त्यानंतर थकवण्यात आलेला रोजगार हमीचा निधी अखेर २४ एप्रिलला देण्यात आला.

Mnerga
Mumbai : नालेसफाईतील निष्काळजीपणा भोवला; ठेकेदारांना 31 लाखांचा दंड

महाराष्ट्रात २०२३-२४ या आर्थिक वर्षात ४४७६ कोटी रुपयांची कामे रोजगार हमी योजनेतून करण्यात आली. त्यातील ४८० कोटी रुपये आर्थिक वर्ष संपल्यानंतरही केंद्र सरकारने वितरित केलेले नव्हते. अखेरीस सरकारने ही रक्कम जमा केल्यामुळे आता मागील आर्थिक वर्षात रोजगार हमी योजनेतील कामांवरील अकुशल मजूर, अर्धकुशल मजूर व कुशल कामांची रक्कम पूर्णपणे मिळाली आहेत. या थकलेल्या रकमेत कुशल व अकुशल कामांचे अनुक्रमे १८० व ३०० कोटी रुपये थकले होते. राज्याप्रमाणेच नाशिक जिल्हयातील रोजगार हमी मजुरांचे ३१ मार्चपर्यंत ११ कोटी रुपये व २४ एप्रिलपर्यंत सुमारे चार कोटी रुपये असे १५ कोटी रुपये थकले होते. सरकारने या मजुरांच्या तसेच पुरवठादारांच्या खात्यात रक्कम जमा केली आहे. रोजगार हमीच्या कामांची मजुरी वेळेत मिळत नसल्यामुळे रोजगार हमी योजनेतून सार्वजनिक योजनांच्या कामांवरील मजुरांची संख्या रोडावल असून केवळ घरकूल, गोठे, शोषखड्डे, शेततळे आदी वैयक्तिक लाभाच्या योजनांमधील कामे सुरू असून त्या कामांवरील मजुरांमुळे रोजगार हमी योजनेत अकुशल मजुरांची संख्या दिसत आहे. वैयक्तिक लाभाच्या कामांवर साधारणपणे ठेकेदाराकडून करून घेतली जातात. तसेच त्या योजनेचे लाभार्थी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचीच जॉबकार्ड काढून ते स्वता काम करीत असल्याचे कागदोपत्री दाखवत असतात. त्यामुळे रोजगार हमी योजनेच्या कामांवर मजूर असल्याचे दिसत आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com