टेंडरपूर्वीच भूमिपूजन? 'मविप्र'च्या कार्यकारिणीत मोठा निर्णय...

MSPS Nashik
MSPS NashikTendernama

नाशिक (Nashik) : नाशिक येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या नवीन कार्यकारिणीच्या बैठकीत संस्थेच्या निवडणुकीपूर्वी टेंडर (Tender) न काढताच शाळा इमारतीच्या (School Building) कामाचे भूमिपूजन कसे झाले, या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर न मिळाल्याने नवीन कार्यकारिणीने एक वगळता इतर सर्व शिक्षणाधिकारी नियुक्त्या रद्द करून नवीन नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. (Maratha Vidya Prasarak Samaj Sanstha Nashik)

MSPS Nashik
नाशिक जिल्ह्यातील 'ही' योजना मार्गी; मंत्रिमंडळाचे शिक्कामोर्तब

मराठा विद्या प्रसारक संस्थेची नुकतीच निवडणूक होऊन त्यात सत्ता परिवर्तन झाले आहे. संस्थेच्या कामकाजाच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेल्या सरचिटणीसपदी अॅड. नितीन ठाकरे विजयी झाले असून, त्यांच्या नेतृत्वाखालील नूतन कार्यकारिणीने कामकाज सुरू केले आहे. नुकतीच कार्यकरिणीची तिसरी बैठक झाली. यावेळी मविप्र निवडणुकीपूर्वी भूमिपूजन झालेल्या आहेरगाव शाळेच्या इमारतीचे भूमिपूजन टेंडर प्रसिद्ध होण्यापूर्वीच कसे झाले, असा सवाल उपसभापती डी. बी. मोगल यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना केला. त्यावर शिक्षणाधिकाऱ्यांनी यासंदर्भातील अधिकार कार्यकारिणीचे असल्याचे सांगितले. त्यांच्या उत्तरामुळे विद्यमान पदाधिकारी संतापले. परिणामी त्यांनी सर्व शिक्षणाधिकारी बदलण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सी. डी. शिंदे वगळता इतर सर्व शिक्षणाधिकारी बदलून नवीन शिक्षणाधिकारी नेमण्यात आले. 

MSPS Nashik
भुजबळांना दिलेला शब्द फडणवीसांनी खरा करून दाखवला!

मविप्र शिक्षण संस्थेची दरवर्षाची उलाढाल 700 ते 800 कोटींची असून निवडणुकीच्या प्रचारात अनेक वर्षे सत्तेत असलेल्या पवार कुटुंबावर याबाबत अनेक आरोप करण्यात आले होते. तसेच संस्थेत नियुक्त्या दिलेल्या शिक्षक व त्यांना दिले जाणारे वेतन हा मुद्दाही निवडणूक प्रचाराचा भाग झाला होता.

MSPS Nashik
'अदानी'च्या मुंबईतील ७ हजार कोटींच्या 'या' प्रकल्पाला ग्रीन सिग्नल

दरम्यान, माजी संचालक मंडळाने केलेल्या नवीन नियुक्त्या व विनाअनुदानित शिक्षकांची वेतनवाढ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केल्याचा आरोप करीत नवीन कार्यकारिणीने वेतनवाढीला स्थगिती दिली आहे. तसेच नवीन नियुक्त्यासंदर्भात चौकशी करून निर्णय घेण्यात येणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com