वर्षानुवर्षे तहानलेल्या मनमाडचा पाणीप्रश्न सुटणार;३०० कोटीचे टेंडर

Water
WaterTendernama
Published on

नाशिक (Nashik) : वर्षानुवर्षे पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या मनमाड शहरातील नागरिकांना रोज पाणीपुरवठा करण्यासाठी करंजवण धरणातून मंजूर करण्यात आलेल्या ३०५ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे टेंडर मंजूर झाले आहे. यामुळे पुढच्या दोन वर्षांमध्ये दिंडोरी तालुक्यातील करंजवण धरणातून रोज पाणीपुरवठा होऊ शकणार आहे. या पाणीपुरवठा योजनेचे काम उल्हासनगर येथील ईगल कंपनीला देण्यात आले आहे. या पाणी पुरवठा योजनेला हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आले आहे. आमदार सुहास कांदे यांनी प्रतिष्ठेची केलेली ही योजना राज्यात सत्तांतर होताच मार्गी लागली आहे.

Water
मुंबईत २२०० कोटींच्या रस्त्यांच्या कामावर 'व्हिजिलन्स'ची करडी नजर

सध्या पालखेड धरणातील पाणी मनमाडजवळीला वागदर्डी धरणात प्रवाही पद्धतीने आणून साठवले जाते व त्यातून मनमाडच्या नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो. यामुळे पालखेडमधून सोडण्यात येणारे आवर्तन व वागदर्डी धरणातील साठा यांचा समन्वय साधण्यासाठी कधीकधी मनमाड येथे पंधरा ते वीस दिवसांनी व टंचार्सच्या काळात अगदी महिन्याने नळाला पाणी येते. यामुळे मनमाडची पाणीटंचाई हा चर्चेचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी २००९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचे पुत्र पंकज भुजबळ यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसची उमेदवारी मिळवली व निवडणूक प्रचारात मनमाडचा पाणीप्रश्‍न सोडवण्याचे आश्‍वासन दिले होते. पंकज भुजबळ दोनदा निवडून गेल्यानंतरही मनमाडचा पाणीप्रश्‍न जैसे थे होता. सुहास कांदे यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मनमाडकरांना पुन्हा पाणीप्रश्‍न सोडवण्याचे आश्‍वासन दिले. आमदार कांदे विजयी झाल्यानंतर त्यांनी हा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले. राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर कांदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ दिली. यामुळे सत्तांतर होताच, मनमाडची पाणी योजना मार्गी लागली. मागील दोन महिन्यांमध्ये या पाणीपुरवठा योजनेची टेंडरप्रक्रिया पूर्ण झाली असून ईगल कंपनीची निवड झाली आहे. या कंपनीला पुढील आठवड्यात कार्यारंभ आदेश दिले जाणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या योजनेचे भूमीपूजन होणार असल्याची माहिती आमदार सुहास कांदे यांच्या कार्यालयातून देण्यात आली.

Water
पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेला ब्रेक! मार्गात होणार बदल; कारण...

अशी आहे योजना
दिंडोरी तालुक्यातील करंजवण धरणातून मनमाड शहरासाठी पिण्यासाठी पाणी आरक्षित करण्यात आले आहे. करंजवण धरण ते वागदर्डी धरण अशी ७२ किलोमीटची ३६ इंची व्यासाची जलवाहिणी टाकण्यात येणार आहे. जलवाहिणी, जलशुध्दीकरण केंद्र, पंपिंग स्टेशन मिळून अंदाजपत्रकीय रक्कम २७३.४१ कोटी रुपये असून जीएसटीसह ही रक्कम ३०० कोटींच्यावर आहे. या प्रकल्पाला लोकवर्गणीपोटी नगरपरिषदेकडून १५ टक्के रक्कम भरावी लागणार होती, मात्र अमृत २ योजनेत मनमाडचा समावेश झाल्यामुळे आता या प्रकल्पाच्या खर्चाच्या १५ ऐवजी १० टक्के लोकवर्गणीची रक्कम पालिकेला भरावी लागणार आहे. लोकवर्गणीची दहा टक्के अट शिथील करण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com