पावसाळा तोंडावर अन् पुणे महापालिकेकडून नालेसफाईची कामे अवघी...

PMC
PMCTendernama

पुणे (Pune) : पावसाळ्यात शहरातील नाल्यांमध्ये पाणी तुंबू नये, रस्त्यावरचे पाणी लगेच वाहून जावे, यासाठी महापालिकेने नालेसफाई आणि पावसाळी गटारांची सफाई सुरू केली आहे. आतापर्यंत नाल्यांची आणि पावसाळी गटारांची अवघी आठ टक्के स्वच्छता झाली आहे.

PMC
'मिठी'चा ओव्हरफ्लो रोखण्यासाठी १६०० कोटींचा ऍक्शन प्लान

पावसाळ्यापूर्वीची तयारी महापालिकेने सुरू केली आहे. यंदा नाले सफाईसाठी लवकर टेंडर मागविण्यात आले होते. दोन आठवड्यांपूर्वी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत एक नाले सफाई आणि पावसाळी गटारांची स्वच्छता, असे दोन टेंडर मंजूर केले आहेत. त्यानुसार काम सुरू झाले आहे. महापालिकेच्या पाचही परिमंडळाच्या हद्दीत हे काम सुरू झाले आहे. त्याचा दैनंदिन आढावा घेतला जात आहे.

PMC
बिल आल्यावर अधिकाऱ्यांना जाग; टेंडर न काढताच दिले काम...

पावसाळी गटारांचे एकूण काम ८.२३ टक्के, तर चेंबर्स स्वच्छतेचे काम ११.५० टक्के इतके झाले आहे. शहरात २२ हजार १५१ मीटर लांबीचे नाले आहेत. त्यापैकी एक हजार ७१९ मीटर नाल्यांची स्वच्छता झाली आहे. नाल्यांची स्वच्छता ७.७६ टक्के इतकी झाली आहे. पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व नाले स्वच्छ होतील.
- डॉ. कुणाल खेमणार, अतिरिक्त आयुक्त

PMC
पुणे महापालिकेच्या विकास आराखड्याचे आज ठरणार भवितव्य, कारण...

शहरातील नाल्यांची स्थिती...
पावसाळी गटारांची एकूण लांबी ः ३,२५,२६२ मीटर
नाल्यांमध्ये धोकादायक ठिकाणे ः ७६
कल्व्हर्ट ः ३७३
चेंबर ः ५५,३००

स्वच्छता झालेले...
पावसाळी गटार ः २६,७६८ मीटर
नाल्यांमध्ये धोकादायक ठिकाणे ः १४
कल्व्हर्ट ः ४७
चेंबर ः ६,३६१

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com