पुणे-लोणावळा तिसऱ्या आणि चौथ्या लाईनचा प्रस्ताव चार वर्षांनंतरही सरकार दरबारी विचारधीनच

Railway
RailwayTendernama

पुणे (Pune) : पुणे-लोणावळादरम्यान तिसऱ्या व चौथ्या मार्गिकेचा पहिला सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) सादर करून चार वर्षे लोटली, तर सुधारित अहवालास तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटला. यानंतरही राज्य सरकारच्या दफ्तरी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प अद्याप विचाराधीनच आहे. या प्रकल्पाचा अपेक्षित खर्च चार वर्षांपूर्वी चार हजार ८८४ कोटी रुपये इतका होता. तो आता पाच हजार १०० कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे. चार वर्षांत प्रकल्पाची किंमत २१६ कोटी रुपयांनी वाढली. दिरंगाई झाल्यास प्रकल्पाचा खर्च आणखी वाढेल. प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यास पुणे-मुंबईदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. मेल, एक्स्प्रेस वेळेत तर धावतीलच शिवाय लोकलच्या फेऱ्यादेखील वाढतील.

Railway
मुंबईतील सफाई कामगारांच्या वसाहतींचा कायापालट करणार; CM Eknath Shinde

राज्य सरकारच्या सूचनेनंतर 'एमआरव्हीसी'ने (मुंबई रेल विकास कॉर्पोरेशन) सुधारित डीपीआर चार जुलैला सादर केला. यात ५१०० कोटींचा खर्च अपेक्षित असल्याचे नमूद करण्यात आले. राज्य सरकारने मात्र अद्याप मंजुरी दिलेली नाही. राज्य सरकारच्या मंजुरीनंतरच रेल्वे मंत्रालय मंजुरी देणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प मंजुरीसाठी प्रतीक्षेच्या ट्रॅकवरच अडकून पडला आहे.

Railway
Pune : रिंगरोडसाठी 14 गावांतील सुमारे 200 एकरहून अधिक जागा ताब्यात

प्रवाशांना फटका

पुणे-लोणावळादरम्यानच्या तिसऱ्या व चौथ्या मार्गिकेचा प्रकल्प रखडल्याने त्याचा थेट फटका प्रवाशांना बसतो. पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या रेल्वे गाड्यांची व मालगाड्यांची संख्या जास्त आहे. याशिवाय लोणावळा ते कर्जत हा घाट विभाग असल्याने गाड्यांचा वेग कमी असतो. याचा परिणाम एकूणच रेल्वे वाहतुकीवर होतो. त्यामुळे पुणे ते लोणावळादरम्यान तिसरी व चौथी मार्गिका असणे फार आवश्यक आहे.

Railway
Navi Mumbai एअरपोर्टला मिळणार रेल्वे कनेक्टिव्हिटी; रेल्वे, विमान वाहतूक मंत्रालयाचा उपक्रम

नवी मार्गिका मेल एक्स्प्रेससाठी?

पुणे-लोणावळादरम्यान सध्या अस्तित्वात असलेल्या मार्गिकांचा वापर लोकलसाठी करण्याचे नियोजन आहे. जेव्हा तिसरी व चौथी मार्गिका तयार होईल तेव्हा त्यावरून मेल, एक्स्प्रेस, मालगाड्या धावतील. या बाबतचा अंतिम निर्णय रेल्वेच्या परिचालन विभाग घेईल.

तीन वर्षांत पूर्तता अवघड

'एमआरव्हीसी'ने हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी किमान तीन वर्षांचा कालावधी लागेल असे सांगितले आहे. मात्र मार्गातील १७ स्थानके नव्या मार्गिकांना जोडण्याचे काम अवघड आहे. तांत्रिकदृष्ट्या क्लिष्ट असलेल्या या कामांसाठी यार्ड रिमॉडेलिंग करावे लागणार आहे. यात सिग्नलचे खांब बदलावे लागतील. तसेच रुळांचेही काम करावे लागणार आहे. हे काम रेल्वेशिवाय अन्य संस्थांना दिले जाणे अवघड आहे. बालासोरच्या रेल्वे अपघातनंतर रेल्वे प्रशासन सिग्नल व ब्लॉकच्या बाबतीत खूपच संवेदनशील झाले आहे. त्यामुळे या कामाची पूर्तता तीन वर्षांत होणे शक्य नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

७९ - पुणे - मुंबई धावणाऱ्या रेल्वे

४२ - पुणे - लोणावळा लोकल

२ लाखांहून अधिक प्रवासीसंख्या (दैनंदिन)

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com