Pune बाजार समितीच्या नोटिशीला ठेकेदाराकडून चक्क केराची टोपली

market yard pune
market yard puneTendernama

पुणे (Pune) : पुणे बाजार समितीत (Market Yard Pune) गूळ-भुसार बाजारातील रस्त्याचा अनधिकृत ताबा घेऊन तिथेच आपले पार्किंग शुल्कातून पैसे कमाविण्याचे 'दुकान' थाटलेला ठेकेदार आता बाजार समितीसाठी 'नाकापेक्षा मोती जड' झाला आहे.

हा अनधिकृत प्रकार थांबविण्यासाठी समितीच्या सभापती, सचिवांना पाठविलेल्या नोटिशीला संबंधित ठेकेदाराने कचऱ्याची टोपली दाखवत आपला मनमानी कारभार सुरू ठेवला आहे. यावरून ठेकेदाराला समितीच्या सभापतींचा कुठलाही धाक वाटत नसल्याचे दिसते आहे.

market yard pune
Nashik:500 कोटी गुंतवणुकीच्या ड्रायपोर्टसाठी 116 एकर जमिनीची खरेदी

या ठेकेदाराचा मनमानी कारभार रोखण्याची ज्यांच्यावर जबाबदारी आहे त्यांच्याच नोटिशीला ठेकेदाराने जुमानले नाही. या ठेकेदाराला समितीच्या प्रशासनासह सभापतींचाही धाक वाट नसल्याचे चित्र दिसते आहे.

पुणे बाजार समितीच्या गूळ-भुसार बाजारात रस्त्याचा अनधिकृतपणे ताबा घेऊन ठेकेदाराकडून पार्किंग शुल्काची वसुली सुरू आहे. बाजार समितीच्या नवनियुक्त संचालक मंडळासह प्रशासन एका ठेकेदाराचे बेकायदा पद्धतीने सुरू असलेले काम थांबविण्यात अपयशी ठरले आहे. या प्रकरणी बजावण्यात आलेल्या नोटिशीकडे दुर्लक्ष करत ठेकेदाराने वसुली सुरच ठेवल्याने आता समिती काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

market yard pune
सरकारची कृपा अन् धारावी पुनर्विकासाची माळ अखेर अदानींच्याच गळ्यात

काय आहे प्रकरण?

ठेकेदार अवेरिया एंटरप्रायझेस यांना पुणे बाजार समितीने गूळ-भुसार बाजारातील भूखंड क्रमांक ५८०, ५८१ (बालाजी ट्रेडर्स ते रवि मसाले) यांच्या मागील सर्व्हिस लेनमध्ये पार्किंग केलेल्या वाहनांकडून शुल्क वसुलीचे कंत्राट दिले आहे. निश्चित करण्यात आलेल्या जागेत पार्किंग शुल्क वसूल करणे अपेक्षित असताना संबंधित ठेकेदाराने शेजारच्या रस्त्याचा अर्ध्याहून अधिक भाग ताब्यात घेऊन तेथेही पार्किंग शुल्काची वसुली सुरू केली आहे.

ठेकेदाराच्या या कृत्यामुळे या रस्त्याचा वापर करणाऱ्या वाहनांना कोंडीचा सामना करावा लागतो आहे. अर्धाहून जास्त रस्ता अडविल्यामुळे या परिसरात वाहतूक कोंडी होत असून, रस्त्यावरील पार्किंगमुळे लगतच्या दुकानांनाही अडचणीला सामोरे जावे लागत आहे.

market yard pune
शिंदेंचे मंत्री संकटात;1000 कोटी खर्चावरून सर्वपक्षीय आमदार घेरणार

कारवाईचा इशारा

बाजार समितीने काही दिवसांपूर्वी संबंधित ठेकेदाराला नोटीस बजाविली आहे. ठरवून दिलेल्या जागेमध्येच दुचाकी वाहने पार्किंग करावीत, इतरत्र ठिकाणच्या जागेचा त्यासाठी वापर करू नये अशा सूचना आपल्या कर्मचार्‍यांना द्याव्यात असे नोटिशीत म्हटले आहे.

पुन्हा असा प्रकार घडल्यास आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असा इशाराही नोटिशीत देण्यात आला आहे. या नोटिशीकडे डोळेझाक करत ठेकेदाराने आपला पैसे उकळण्याचा बेकायदेशीर उद्योग चालूच ठेवला आहे.

market yard pune
Nashik ZP : डीपीसीच्या पावणेपाच कोटींच्या निधीत परस्पर बदल

गूळ-भुसार बाजारातील प्रवीण मसालेसमोरील सर्व्हिस लेन व्यतिरिक्त रस्त्यावर पार्किंग शुल्क वसूल न करण्याबाबत संबंधित ठेकेदाराला नोटीस देण्यात आली आहे. तरीही रस्त्यावर पार्किंग शुल्क घेतले जात असल्यास ठेका देताना ठरविलेल्या नियम-अटीनुसार कारवाई केली जाईल.

- डॉ. राजाराम धोंडकर, सचिव, बाजार समिती, पुणे

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com