'या' बाह्यवळण मार्गामुळे जमिनीला सोन्याचे भाव! लवकरच मोजणी सुरू

Chakan
ChakanTendernama

पुणे (Pune) : रासे फाटा, कडाचीवाडी, मेदनकरवाडी, बंगला वस्ती असा चाकण बाह्यवळण (Chakan Bypass Road) मार्ग प्रस्तावित आहे. चाकण व परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पीएमआरडीएकडून या बाह्यवळ मार्गाचे काम करण्यात येणार आहे. मागील अनेक वर्षे प्रस्तावित असलेल्या या मार्गाच्या हद्द निश्चितीचे, तसेच मोजणीचे काम पुढील आठवड्यात सुरू होण्याची शक्यता असल्याची माहिती पीएमआरडीएचे (PMRDA) क्षेत्रीय अभियंता जितेंद्र पगार यांनी दिली. (Traffic Jam Problem In Chakan)

Chakan
'समृद्धी'मार्ग ४ टप्प्यात खुला होणार; संपूर्ण मार्गासाठी प्रतीक्षा

चाकण (ता. खेड) येथील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी विशेषत: चाकण -शिक्रापूर तसेच चाकण-तळेगाव मार्गावरील व पुणे -नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पीएमआरडीएचा रासे फाटा कडाचीवाडी, मेदनकरवाडी हा प्रस्तावित ३६ मीटर रुंदीचा बाह्यवळण मार्ग महत्त्वाचा आहे. या मार्गाची हद्द निश्चिती तसेच मोजणीचे काम पूर्ण झाल्यानंतर या मार्गाच्या जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू होणार आहे. बाह्यवळणासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित होणार आहेत. त्या शेतकऱ्यांना पीएमआरडीएच्या वतीने एफएसआय देण्यात येणार आहे. तसे हमीपत्रही दिले जाणार आहे. शेतकऱ्यांकडून हमीपत्र लिहून घेण्यात येणार आहे. पीएमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल यांनी चाकणचा वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यासाठी बाह्यवळण मार्ग महत्त्वाचा आहे. हा बाह्यवळण मार्ग लवकरच करणार असल्याचे सांगितले आहे. पुणे-नाशिक महामार्ग समृद्धी गॅस ते कुरुळी गावच्या हद्दीतील सॅनी इंडिया कंपनीपर्यंत १५ मीटर रुंदीच्या रस्त्याची मोजणी पीएमआरडीएकडून झालेली आहे. त्याच्या हद्दीनिश्चिती करण्यात आल्या आहेत.

Chakan
मुंबईतील ६ हजार कोटींच्या रस्त्यांसाठी टेंडरमध्ये 'ही' प्रमुख अट

प्रस्तावित बाह्यवळण मार्गाचे काम सुरू झाल्यानंतर या परिसरातील जमिनीचे भाव तिप्पट, चौपटीने वाढणार आहेत. त्यामुळे हा बाह्यवळण मार्ग लवकर व्हावा अशी मागणी बहुतांश शेतकऱ्यांची आहे. रासे फाटा, कडाचीवाडी, मेदनकरवाडी हा एक वेगळा पिंपरी चिंचवड परिसरातील स्पाईन रोड सारखा स्पाईन रोड होणार आहे. त्यामुळे या परिसराचा विकास झपाट्याने होणार आहे.

Chakan
पुणे: कर्वे रस्त्यावरील वाहतूक कोंडी फुटण्याच्यादृष्टीने मोठे पाऊल

चाकण- शिक्रापूर, चाकण-तळेगाव, पुणे-नाशिक महामार्गावरील औद्योगिक वसाहतीतील कंपनीची वाहने व इतर वाहने या बाह्यवळण मार्गाने ये-जा करणार असल्याने या बाह्यवळण मार्गावरून दररोज पंचवीस हजाराच्या पुढे वाहने धावणार आहेत. या बाह्यवळण मार्गामुळे चाकण येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com