मुंबईतील ६ हजार कोटींच्या रस्त्यांसाठी टेंडरमध्ये 'ही' प्रमुख अट

BMC
BMCTendernama

मुंबई (Mumbai) : मुंबईतील रस्त्याची कामे पुढील किमान 10 वर्षे टिकतील आणि रस्त्याचा दर्जा राखला जाईल यासाठी मुंबई महापालिकेने (Mumbai Municipal Corporation) रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणाच्या ६ हजार कोटींच्या टेंडरमध्ये 'मेकॅनाईज्ड स्लीप फॉर्म पेवर' (Mechanized Slip Form Paver) या अत्याधुनिक यंत्राचा वापर करून कमीत कमी कालावधीत सर्वोत्कृष्ट दर्जाची रस्ते बांधणी करण्याची प्रमुख अट घातली आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण करुन स्त्याच्या कामाचे कार्यादेश पुढील पंधरा दिवसात जारी केले जाणार आहेत.

BMC
दोन वर्षात मुंबई खड्डेमुक्त; सुशोभीकरणाच्या ५०० कामांचे भूमिपूजन

मुंबईतील सुमारे 400 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात येणार असून त्यासाठी एकूण पाच टेंडर निमंत्रित करण्यात आली आहेत. या पाच टेंडरमध्ये समाविष्ट असलेल्या कामांसाठी सुमारे ६ हजार कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील महामार्ग बांधणीचा अनुभव असलेल्या नामांकित कंपन्यांकडून मुंबईतील रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण केले जाणार आहे. मुंबईतील छोट्या-मोठ्या ठेकेदारांना या रस्त्यांच्या कामातून वगळले आहे. 6000 कोटींच्या रस्त्यांच्या कामांमध्ये 1200 कोटी रुपयांच्या पाच पॅकेजमध्ये विभागणी करण्यात आली आहे.

BMC
महाराष्ट्राच्या 'समृद्धी'ची भाग्यरेषा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

एकेका कंपनीला 1200 कोटी रुपयांचे पॅकेज दिले जाईल. याआधी एकाच मोठ्या रस्त्याच्या कामासाठी अनेक कॉन्ट्रॅक्टर मुंबईत काम करत असल्याने रस्त्याचा दर्जा राखला जात नव्हता. त्यामुळे या टेंडर प्रक्रियेमध्ये संयुक्त भागीदारीस परवानगी नाकारण्यात आली आहे. आता राष्ट्रीय स्तरावरील महामार्ग बांधण्याचा अनुभव असलेल्या कंपन्यांना बाराशे कोटी रुपयांची टेंडर दिली जाणार आहेत. या कंपन्या अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि मशिनरीचा वापर करून मुंबईतील रस्त्यांचे काँक्रिटीकरण करतील. पुढील किमान 10 वर्ष ही रस्त्याची काम टिकतील आणि रस्त्याचा दर्जा राखला जाईल याचा पूर्ण प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे पुढील पंधरा दिवसात कार्यादेश देऊन रस्त्यांची कामे लवकरच सुरू केली जातील. वेगवेगळ्या रस्ते कामांची टेंडर एकत्रित स्वरूपात मागवल्याने राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील महामार्ग बांधणीचा अनुभव असलेल्या नामांकित व मोठ्या कंपन्या या प्रक्रियेत सहभागी होणार आहेत.

BMC
मुंबई-गोवा मार्ग मिशन मोडवर पूर्ण करा; मंत्री चव्हाणांचे निर्देश

दरम्यान, मुंबईतल्या रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरण करण्यासाठी मुंबई महापालिकेने 6 हजार कोटींची 5 टेंडर एकत्रित निमंत्रित केली आहेत. रस्त्याच्या कामाचे कार्यादेश पुढील पंधरा दिवसात जारी केले जातील, अशी माहिती मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिली.

सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांसाठी होणारा खर्च-
शहर विभाग -1233 कोटी
पूर्व उपनगर – 846 कोटी
पश्चिम उपनगर
– झोन : 3 – 1223 कोटी
– झोन : 4 – 1631 कोटी
– झोन : 7 – 1145 कोटी

किती किलोमीटर रस्त्यांची होणार कामे
-
पश्चिम उपनगर – 253.65 किमी
- पूर्व उपनगर – 70 किमी
- शहर विभाग – 72 किमी 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com