'समृद्धी'मार्ग ४ टप्प्यात खुला होणार; संपूर्ण मार्गासाठी प्रतीक्षा

Samruddhi Mahamarg
Samruddhi MahamargTendernama

मुंबई (Mumbai) : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचे (Mumbai-Nagpur Samruddhi Mahamarg) उद्या, रविवारी (११ डिसेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. पहिल्या टप्प्यात नागपूर ते शिर्डी-५२० किमी महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) एकूण चार टप्प्यात हा महामार्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला असून हा संपूर्ण ७०१ किमीचा महामार्ग डिसेंबर २०२३ अखेर पूर्ण करण्याची डेडलाईन एमएसआरडीसीने निश्चित केली आहे.

Samruddhi Mahamarg
मुंबईतील ६ हजार कोटींच्या रस्त्यांसाठी टेंडरमध्ये 'ही' प्रमुख अट

दरम्यान, इगतपुरीच्या पुढच्या टप्प्यात खर्डी येथे दोन किमीचा अत्यंत आव्हानात्मक पूल उभारला जाणार आहे. या पूलाचे खांब तब्बल ७४ मीटर उंच आणि एक टप्पा १४० मीटरचा राहणार आहे. मुंबई ते नागपूर ७०१ किमीच्या समृद्धी महामार्गाच्या कामाला २०१९ ला सुरुवात झाली. हे काम २०२१ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मधल्या काळात कोविडचे संकट आणि इतर कारणाने काम रखडले. २०२१ चा मुहूर्त चुकल्यानंतर मात्र एमएसआरडीसीने कामाला वेग दिला आहे. या महामार्गावरील ७०१ किमीचा टप्पा पूर्ण होण्यासाठी मोठा कालावधी लागणार असल्याने टप्प्याटप्प्यात महामार्ग सुरू करण्याचा निर्णय एमएसआरडीसीने घेतला. त्यानुसार मे २०२२ मध्ये नागपूर ते सेलू बाजार असा २१० किमीचा मार्ग सुरू करण्यात येणार होता. मात्र पूल दुर्घटनेमुळे लोकार्पण सोहळा रद्द करण्यात आला. आता मात्र नागपूर ते शिर्डी अशा ५२० किमीचे काम पूर्ण झाल्याने या टप्प्याचे ११ डिसेंबरला लोकार्पण होणार आहे. लोकार्पणानंतर सर्वसामान्यांसाठी हा महामार्ग खुला होईल आणि केवळ पाच तासात नागपूर ते शिर्डी अंतर पार करता येईल. सध्या हेच अंतर पार करण्यासाठी किमान दहा तास लागतात.

Samruddhi Mahamarg
महाराष्ट्राच्या 'समृद्धी'ची भाग्यरेषा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नागपूर ते शिर्डी टप्पा पूर्ण झाल्यानंतर नागपूर ते सिन्नर असा ५६५ किमीचा महामार्ग फेब्रुवारीअखेरीस तर नागपूर ते भरवीर जंक्शन (सिन्नर-घोटी रस्ता) असा ६०० किमीचा टप्पा मार्चअखेरीस पूर्ण होईल. तसेच नागपूर ते इगतपुरी असा ६२३ किमीचा टप्पा मे अखेरीस पूर्ण करून वाहतूक सेवेत दाखल करण्यात येणार आहे. इगतपुरीपर्यंतचा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर उर्वरित ७८ किमीचा टप्पा पूर्ण होण्यासाठी मात्र मे पासून पुढे सहा महिने लागणार आहेत. या टप्प्यात खर्डी येथे दोन किमीचा एक पूल असून तो अत्यंत आव्हानात्मक आहे. या पूलाचे खांब तब्बल ७४ मीटर उंच असणार असून एक टप्पा १४० मीटरचा आहे. हे काम पूर्ण करण्यास जास्त कालावधी लागणार आहे. त्यामुळे नागपूर ते ठाणे (मुंबई) असा ७०१ किमीचा टप्पा डिसेंबर २०२३ अखेरीस पूर्ण होईल. नागपूर येथून सुरू झालेला हा महामार्ग ठाण्यातील आमाणे गावात (शांगरीला रिसॉर्टपासून सहा किमी दूर) संपणार आहे. त्यानंतर या महामार्गावरुन प्रवाशांना डिसेंबर २०२३ पासून ताशी १२० किमी वेगाने आठ तासात प्रवास करता येणार आहे.

Samruddhi Mahamarg
मुंबई-गोवा मार्ग मिशन मोडवर पूर्ण करा; मंत्री चव्हाणांचे निर्देश

लोकार्पणाचे चार टप्पे असे
टप्पा अंतर (किमी) लोकार्पण कधी
नागपूर ते शिर्डी ५२० किमी ११ डिसेंबर २०२२
नागपूर ते सिन्नर ५६५ किमी फेब्रुवारी २०२३
नागपूर ते भरवीर जंक्शन ६००किमी मार्च २०२३
नागपूर ते ठाणे (मुंबई) ७०१ किमी डिसेंबर २०२३ 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com