Sinhgad Road Traffic
Sinhgad Road TrafficTendernama

Sinhgad Road वरील 'त्या' उड्डाणपुलावरच का होतेय कोंडी?

Dhayari Phat Flyover: धायरी फाटा उड्डाणपुलावर का लागतात वाहनांच्या लांबच लांब रांगा?
Published on

पुणे (Pune) : सिंहगड रस्त्यावरील (Sinhagad Road) धायरी फाटा उड्डाणपुलावर (Dhayari Phat Flyover) कालव्याच्या रस्त्यावरून होणारी अवजड वाहतूक, आरएमसी प्लांटवरून येणारे डंपर यांच्या वाहतुकीमुळे रस्त्यांवर खड्डेच खड्डे पडले आहेत.

मोठ्या प्रमाणात रस्त्यांची चाळण झाल्याचे दिसते. या खड्ड्यांत पावसाचे पाणी साचल्याने वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. तसेच, सिमेंट काँक्रिटच्या मिक्सरमधून रस्त्यावर सिमेंट काँक्रिट आणि खडी पसरल्याने संपूर्ण रस्त्यावर चिखल झाला आहे. यामुळे स्थानिक नागरिक, वाहनचालक त्रस्त झाले आहेत.

Sinhgad Road Traffic
तगादा : लोहगावकडे जाणाऱ्या 'त्या' रस्त्यावरील कोंडी कधी फुटणार?

खड्ड्यांमुळे काही काळ वाहतूक कोंडी होते. सिंहगड रस्त्यावर आरएमसी प्लांटवरून सिमेंट काँक्रीटची वाहतूक करणारे डंपर आणि मिक्सर मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. अनेकदा तर पाऊस पडला की, रस्त्यावर खड्डे पडतात. खड्ड्यांबाबत वारंवार तक्रार करूनही खड्डे भरले जात नाहीत.

रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, काही ठिकाणी डबके तयार झाले आहे. रस्त्यावर केलेल्या डांबराची मलमपट्टी निघून गेल्याने लाखो रुपयाचा खर्च पाण्यात जाऊन नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी केल्याचे चित्र आहे. खड्ड्यांमुळे नेमका रस्ता कुठे आहे, असा प्रश्न वाहनचालकांना पडत आहे.

Sinhgad Road Traffic
स्टार एअरवेजला ग्रीन सिग्नल! सोलापुरातून देशातील 'त्या' मोठ्या शहरासाठी सुरू होणार विमानसेवा

विद्यार्थी, वृद्ध, गर्भवती महिलांना येथून चालणे धोक्याचे झाले आहे. या समस्यांकडे प्रशासन लक्ष देत नसल्याने नागरिक संतप्त आहेत. त्यामुळे रस्त्यांची दुर्दशा होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या संबंधित अधिकारी आणि आरएमसी प्लांट मालक आणि डंपरवाले यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी वाहनचालकांनी केली.

अवजड वाहतुकीमुळे रस्त्यांची चाळण झाली असून, अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे वाहनचालकांना त्रास होत आहे. तसेच, अपघातांचा धोका वाढला आहे. पावसामुळे आणि आरएमसी प्लांटच्या अवजड वाहतुकीमुळे रस्त्यांची अवस्था खराब झाली आहे. या समस्येवर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे.
- गणेश शिंदे, वाहनचालक

आरएमसी प्लांट सुरू करण्यासाठी बांधकाम विभागाची मंजुरी घेतली नसल्याने वडगाव येथील दोन आरएमसी प्लांटवरती कारवाई करण्यात आली आहे. तसेच, धायरी येथील प्लांटवर देखील पुढील काही दिवसांत कारवाई करण्यात येईल.
- विलास नवाळी, कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग, पुणे महापालिका

Tendernama
www.tendernama.com