तगादा : लोहगावकडे जाणाऱ्या 'त्या' रस्त्यावरील कोंडी कधी फुटणार?

traffic
trafficTendernama
Published on

पुणे (Pune) : लोहगाव येथून शहराकडे जाणाऱ्या वायुसेना हद्दीतील रस्त्यावर वाहतूक कोंडी (Traffic Jam) ही नित्याचीच झाली आहे. (Lohegaon Airport News)

traffic
स्टार एअरवेजला ग्रीन सिग्नल! सोलापुरातून देशातील 'त्या' मोठ्या शहरासाठी सुरू होणार विमानसेवा

शहराकडे जाणारा हा सोपा आणि जवळचा मार्ग असल्याने लोहगाव, वडगाव शिंदे, गोलेगाव, पिंपळगाव या गावांतील नागरिक या रस्त्याचा वापर करतात. मुळातच अरुंद असलेला हा रस्ता सकाळी आणि सायंकाळच्या वेळी वाहनांनी भरलेला असतो. कोंडी सोडविण्यासाठी प्रशासनाने योग्य त्या उपायांची अंमलबजावणी करून वाहनचालकांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.

traffic
रांजणगावात कोट्यवधीचा जमीन घोटाळा; देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षाच वादाच्या भोवऱ्यात

सायंकाळी या रस्त्यावर भाजी व फळ विक्रेते आपली दुकाने थाटत असल्याने वाहतूक कोंडीत आणखीनच भर पडत आहे. वायुसेना अधिकाऱ्यांकडून अनेकदा कारवाई करूनही व्यावसायिक माल विक्री करण्यासाठी येथे येत असतात. याच रस्त्यावर कलवड वस्ती, तसेच खेसे पार्ककडे जाण्यासाठी मार्ग आहेत. येथील अंतर्गत रस्त्यावरून मुख्य रस्त्यावर येणाऱ्या वाहनांमुळे अनेकदा याठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण होते.

पाऊस झाल्यास रस्त्यावर पाणी साचून येथील वाहतूक पूर्णपणे मंदावते. काल झालेल्या पावसाने या रस्त्यावर केंद्रीय विद्यालय ते बर्माशेल अशा तीन किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

traffic
Navi Mumbai: खारघर-नेरूळ कोस्टल रोड आता नवी मुंबई विमानतळाला जोडणार

हा रस्ता वायुसेनेच्या मालकीचा आहे. मात्र, त्याची देखभाल दुरुस्ती पुणे महापालिका पाहते. केवळ रस्त्यांची दुरुस्ती करणे आणि त्याचे पुनर्निर्माण करणे इतकेच काम महापालिकेकडे असून, तो वाढविणे किंवा त्यात बदल करण्याचे कोणतेही अधिकार महापालिकेकडे नाहीत.

वायुसेनेकडून याबाबत कोणतेही सहकार्य मिळत नसल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले. त्यामुळे याबाबत पर्याय म्हणून याठिकाणी सकाळी आणि सायंकाळच्या वेळी वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी, अशी मागणी येथील रहिवासी करत आहेत.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com