Pune News: दस्तनोंदणी, 7/12, प्रॉपर्टी कार्ड अशा 66 सेवा ऑनलाइन

Maharashtra: देशात सर्वाधिक ऑनलाइन सेवा देण्यास महाराष्ट्र आघाडीवर
Online E Gov
Online E GovTendernama

पुणे (Pune) : महसूल (Revenue), भूमी अभिलेख (Land Records) आणि नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून देण्यात येणाऱ्या ६६ ऑनलाइन (Online) सुविधा आता एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला आहे. त्यामुळे नागरीकांना आता एकाच संकेतस्थळाला (Web Portal) भेट देऊन या तिन्ही विभागांच्या सुविधांचा लाभ घेणे सोईचे जाणार आहे.

Online E Gov
Davos: नाशकात 'ही' कंपनी करणार मोठी गुंतवणूक; तब्बल 2 हजार रोजगार

प्रत्येक जिल्हानिहाय जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांनादेखील या सुविधा दिल्या जात आहे की नाही, यावर देखरेख ठेवणे शक्य होणार आहे. येत्या दोन ते तीन महिन्यांत एकाच संकेतस्थळावर तिन्ही विभागांकडून कोणकोणत्या सुविधा ऑनलाइन दिल्या जाणार आहेत. त्यांची माहिती एकाच पेजवर उपलब्ध होईल, असे भूमी अभिलेख विभागाच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि ई-फेरफार प्रकल्पाच्या राज्य समन्वयक सरिता नरके यांनी सांगितले.

Online E Gov
Nashik: 10 हजार कोटींतून साकारणार 60 किमीचा बाह्यरिंगरोड प्रकल्प

गुजरातच्या धर्तीवर निर्णय
महसूल विभागाच्या अंतर्गत हे तिन्ही विभाग येतात. परंतु प्रत्येक विभागाकडून स्वतंत्रपणे ऑनलाइन सुविधा दिल्या जातात. त्यामुळे ज्या विभागाकडे काम आहे, त्या विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन सेवा घ्यावी लागते. प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येते. प्रत्येक विभागाच्या स्वतंत्र ऑनलाइन सुविधा असल्यामुळे जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांनादेखील त्यावर देखरेख ठेवणे अशक्य होते.

देशात सर्वाधिक ऑनलाइन सेवा देण्यास महाराष्ट्र आघाडीवर असूनही त्याचा फायदा फारसा नागरिकांना मिळत नाही. उलट गुजरातमध्ये अशा पद्धतीने ३३ सुविधा एकाच डॅशबोर्डवर उपलब्ध करून दिल्या जातात. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही महसूल विभागाच्या सर्व सुविधा एकाच डॅशबोर्डवर उपलब्ध करून देण्याचा निर्णय महसूल खात्याने घेतला आहे.

Online E Gov
High Court:बीडबायपास पुलाच्या अभियंत्यांना कोणता पुरस्कार द्यायचा?

अशा मिळणार सुविधा
- भूमी अभिलेख विभागाच्या सुविधा ः ९
- नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या सुविधा ः ११
- महसूल विभागाच्या सुविधा ः १७
- आपले सरकार पोर्टलवरील सुविधा ः ३३

Online E Gov
Pune: बकोरियांच्या दणक्याने PMPचा 'टॉप गियर'; उत्पन्नचा नवा विक्रम

प्रॉपर्टी कार्डवर वारसाची नोंद घालण्यासाठी भूमी अभिलेख विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा लागतो. याउलट एकाच संकेतस्थळावर ही सुविधा मिळाल्यास नागरिकांना अत्यंत सोईचे होईल. महसूल विभागाने हाती घेतलेला हा उपक्रम अत्यंत स्वागतार्ह आहे.
- सुधीर कुलकर्णी, बाणेर, पुणे

Online E Gov
Aurangabad : बीडबायपास राष्ट्रीय महामार्ग अजून किती बळी घेणार?

महसूल विभागासह अन्य दोन विभागांच्या एकूण ६६ सुविधा ऑनलाइन देण्यात येतात, याची माहिती नव्हती. परंतु त्या आता एकाच संकेतस्थळावर उपलब्ध करून दिल्यास नागरिकांचा चांगला फायदा होऊ शकतो. मी जिथे नोकरी करतो, त्यांच्या कामासाठी मला सारखे सरकारी कार्यालयात जावे लागते. ते काम आता सोपे होईल.
- शेखर देशपांडे, कोथरूड, पुणे

Online E Gov
Aurangabad : बीड बायपासवरील 'त्या' सदोष पुलाची पाहणी;उद्या सुनावणी

ऑनलाइन मिळणाऱ्या सुविधा
- दस्तनोंदणी
- फेरफार नोंद
- सातबारा उतारा नोंदणी
- प्रॉपर्टी कार्ड नोंदणी
- स्टॅम्प ड्युटी परतावा
- इंडेक्स-२ प्रमाणित प्रत
- जुन्या मिळकतींचा शोध

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com