Railway : पुण्यातून सुटणाऱ्या 'या' 2 रेल्वे गाड्यांच्या फेऱ्या वाढल्या

Railway Station
Railway StationTendernama
Published on

पुणे (Pune) : प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने हडपसर-हिसार व दौंड-अजमेर या रेल्वेच्या फेऱ्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

Railway Station
Pune : नगर रस्त्यावरील कोंडी फोडण्यासाठी महापालिकेचा 'असा' आहे प्लॅन

हडपसर-हिसार साप्ताहिक विशेष रेल्वे (०४७२४) ही रेल्वे १६ डिसेंबरपर्यंत धावणार होती, आता सेवेत वाढ झाली असून, आता २३ व ३० डिसेंबरला हडपसरहून धावणार आहे.

तसेच हिसार-हडपसर साप्ताहिक विशेष रेल्वे (०४७२३ ) ही पूर्वी १५ डिसेंबरपर्यंत धावणार, आता सेवेत वाढ करण्यात आली असून, आता २२ व २९ डिसेंबरला धावणार आहे.

Railway Station
Mumbai : खारघर-तुर्भे जोड मार्गाच्या कामाला सुरुवात; 2100 कोटींचे बजेट

दौंड-अजमेर साप्ताहिक विशेष रेल्वे (०९६२६) ही रेल्वे पूर्वी १३ डिसेंबरपर्यंत धावणार होती, आता २० व २७ डिसेंबरला धावणार आहे. तसेच अजमेर-दौंड साप्ताहिक विशेष रेल्वे (०९६२५) ही रेल्वे पूर्वी १२ डिसेंबरपर्यंत धावणार होती, आता १९ व २६ डिसेंबर रोजीदेखील धावणार आहे. रेल्वेच्या थांब्यात व वेळेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com