Omprakash Bakoria PMP
Omprakash Bakoria PMPTendernama

पुणेकरांनो PMPकात टाकतेय! बकोरियांच्या दणक्यानंतर ठेकेदार ताळ्यावर

पुणे (Pune) : ओमप्रकाश बकोरिया (Omprakash Bakoria) यांनी पीएमपीचे (PMP) ‘स्टेरिंग’ हाती घेतल्यानंतर आता पीएमपीचा ‘प्रवास’ आश्वासक होताना दिसत आहे. अवघ्या दोन महिन्यांत १२६ बस निलंबित केल्यावर ठेकेदारांच्या बसच्या ब्रेकडाऊन होण्याच्या प्रमाणात घट होत आहे. दर महिन्याला हजारहून अधिक बस ब्रेकडाऊन होत होते. ती संख्या आता कमी होत आहे. त्यामुळे निलंबनाची मात्रा ठेकेदारांच्या बसला लागू पडली असेच दिसते.

Omprakash Bakoria PMP
नाशिककरांनो सावधान; आणखी २८ ठिकाणी होणार गतिरोधक

गेल्या काही दिवसांत पीएमपीच्या बसचे ब्रेकडाऊनचे प्रमाण खूप वाढल्याने प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असे. अनेकदा तक्रारी करून देखील ब्रेकडाऊनचे प्रमाण घटले नव्हते. मात्र, पीएमपीचे अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांनी ठेकेदारांच्या बस निलंबित करण्यास सुरुवात केल्यावर हळूहळू चित्र बदलायला सुरुवात झाली. जी बस महिन्यात तीन वेळा ब्रेकडाऊन झाली, त्या बसला रस्त्यांवर धावण्यास अपात्र ठरवून निलंबित केले गेले. त्यामुळे ठेकेदारांचे आर्थिक नुकसान होऊ लागले. ठेकेदारांना मोठा आर्थिक फटका बसत असल्याने बसच्या देखभाल व दुरुस्तीकडे गांभीर्यपूर्वक पाहण्यात येऊ लागले. परिणामी बसच्या ब्रेकडाऊनच्या होण्याच्या प्रमाणात घट झाली.

Omprakash Bakoria PMP
सर्व सरकारी अधिकारी आता उडणार भूर्रर.. विमान प्रवास सवलतीचे गिफ्ट

‘ब्रेकडाऊन’ चे काय आहे निकष
‘सीआयआरटी’च्या निकषानुसार एक बस दहा हजार किमीचा प्रवास केल्यावर ब्रेकडाऊन झाली तर वाहनाची स्थिती योग्य असल्याचे समजावे. मात्र, ठेकेदारांच्या बस अवघ्या दोन ते तीन हजार किमीचा प्रवास केला तर ब्रेकडाऊन होतात. त्यामुळे त्याबसची देखभाल व दुरुस्ती योग्य नसल्याचे आपसूकच अधोरेखित होते.

Omprakash Bakoria PMP
अतिक्रमणांतील १३ हजार प्रकरणांबाबत नाशिक जिल्हा प्रशासनासमोर पेच

सीएनजी बसचे प्रमाण अधिक
पीएमपी प्रशासनाने ज्या बस निलंबित केल्या आहेत, त्यापैकी सर्वांत जास्त या सीएनजीवर धावणाऱ्या आहेत. सप्टेंबर महिन्यांत ६३ बस निलंबित केल्या. पैकी १८ बस इलेक्ट्रिक तर ४५ बस या सीएनजी वर धावणाऱ्या आहेत. हीच परिस्थिती ऑक्टोबर महिन्यातील आहे. ऑक्टोबर महिन्यांत ६३ बस निलंबित केल्या त्यापैकी १६ इलेक्ट्रिक तर सीएनजी वर धावणाऱ्या ४७ बस आहेत.

Omprakash Bakoria PMP
पुणे विमानतळाच्या 'विंटर शेड्यूल'कडे विमान कंपन्यांनी का केली पाठ?

प्रवाशांच्या ब्रेकडाऊन विषयी खूप तक्रारी वाढल्या होत्या. त्यामुळे त्या बस निलंबित करण्याचा निर्णय घेतला. आता ब्रेकडाऊनचे प्रमाण कमी होत आहे.
- ओमप्रकाश बकोरिया, अध्यक्ष, पीएमपीएमएल, पुणे

Omprakash Bakoria PMP
5 हजार कोटींचे राष्ट्रीय महामार्ग बांधले पण उपयोग शून्य; कारण...

ब्रेकडाऊनचे प्रमाण :
सप्टेंबर : १०६७
ऑक्टोबर : ११२२
नोव्हेंबर : ८४४
१५ डिसेंबर पर्यत : ३७६

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com