Pune: 'त्या' पुणेकरांवर पालिका चक्क फुकट देणार फोर व्हिलर?

PMC Pune
PMC PuneTendernama

पुणे (Pune) : पुणे महापालिकेच्या (PMC) कर आकारणी व कर संकलन विभागाकडून थकबाकी असणाऱ्या बिगरनिवासी मिळकत धारकांवर कारवाईचा धडाका सुरू केला आहे. त्यानुसार, मागील महिन्यापासून आत्तापर्यंत सुमारे ४०० हून अधिक थकबाकीदारांच्या मिळकतींना टाळे ठोकण्याची कारवाईही महापालिकेने केली आहे.

नागरिकांनी ३१ जुलैपर्यंत मिळकत कर भरल्यास त्यांना सर्वसाधारण करावर सवलत मिळणार आहे, त्याचबरोबर वेळेत कर भरणाऱ्यांसाठी मोटार, दुचाकी, मोबाईल अशी खास बक्षिसेही मिळणार आहेत.

PMC Pune
Pune: पालिकेचा दावा खरा की खोटा? नगर रोड अतिक्रमणमुक्त झालाय का?

पुणे महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाकडून शहरातील मिळकतधारकांना २०२३-२४ या वर्षातील देयके पाठविण्यात आली आहेत. त्यानुसार, नागरिकांकडूनही मिळकत कर भरण्यास प्राधान्य देण्यात येत आहे.

निवासी, बिगरनिवासी, मोकळ्या जागा यांचा संपूर्ण मिळकत कर ३१ जुलैपर्यंत भरल्यास त्यांना सर्वसाधारण करामध्ये पाच किंवा १० टक्के सवलत महापालिकेकडून देण्यात येते. त्यामुळे या सवलतीचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कर आकारणी व कर संकलन विभागाचे प्रमुख अजित देशमुख यांनी केले आहे.

१५ मे ते ३१ जुलै या कालावधीत संपूर्ण मिळकत कर भरणाऱ्यांसाठी महापालिकेने एक कोटी रुपयांची बक्षिस योजना जाहीर केली आहे. त्यानुसार, पाट पेट्रोल कार, १५ ई बाईक, १५ मोबाईल फोन, १० लॅपटॉप अशी सुमारे ४५ प्रकारांमधील बक्षीसे ठेवण्यात आली आहेत.

PMC Pune
Nashik: वनविभागाच्या परवानगीशिवाय जलसंधारणाचा टेंडर-फेरटेंडरचा खेळ

या लॉटरी योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठल्याही प्रकारचा अर्ज करण्याची आवश्‍यकता नाही. केवळ आपला संपूर्ण मिळकत कर १५ मे ते ३१ जुलै या कालावधीत भरणे आवश्‍यक असल्याचे देशमुख यांनी सांगितले.

थकबाकीदारांवर कारवाईही
एकीकडे मिळकतकर वेळेत भरणाऱ्यांसाठी बक्षिस योजना जाहीर करतानाच, महापालिका प्रशासनाने थकबाकीदारांच्या बिगरनिवासी मिळकतींना टाळे ठोकण्याचेही काम सुरू केले आहे.

मे महिन्यापासून आत्तापर्यंत सुमारे ४०० थकबाकीदारांच्या बिगरनिवासी मिळकतींना महापालिकेने टाळे ठोकले आहे. यापुढेही थकबाकीदार बिगरनिवासी मिळकतींवर कारवाई केली जाणार असल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com