Nagar Road
Nagar RoadTendernama

Pune: पालिकेचा दावा खरा की खोटा? नगर रोड अतिक्रमणमुक्त झालाय का?

Published on

पुणे (Pune) : नगर रस्त्यावरील (Nagar Road Traffic) वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरलेली बहुतांश अतिक्रमणे हटवून महापालिकेने नगर रस्ता अतिक्रमणमुक्त व स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला आहे. याच पद्धतीने शहरातील आणखी १४ प्रमुख रस्त्यांसह अन्य महत्त्वाच्या रस्त्यांवरील अतिक्रमणे काढण्यावर महापालिका भर देणार आहे.

Nagar Road
Nashik : किकवी धरणाचा 14 वर्षांचा वनवास संपला; प्रतीक्षा सुप्रमाची

शहरात ‘जी-२०’ परिषदेच्या विविध कार्यगटाच्या आतापर्यंत दोन बैठका झाल्या. पुण्यात सोमवारपासून शिक्षण विषयासंबंधी कार्यगटाची बैठक आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडीची समस्या असलेल्या नगर रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्यास सुरुवात केली होती. त्यानुसार एक लाख ६० हजार चौरस फूट इतके अतिक्रमण मागील काही दिवसांमध्ये काढून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला आहे. तसेच रस्त्यावरील स्वच्छतेलाही प्राधान्य दिले आहे.

...हे रस्ते होणार अतिक्रमणमुक्त
सातारा रस्ता, सिंहगड, सोलापूर, मगरपट्टा, वाघोली, बाणेर, पाषाण, गणेशखिंड, कर्वे या प्रमुख रस्त्यांसह अन्य काही महत्त्वाच्या रस्त्यांवरील अतिक्रमणे काढण्यावर महापालिका देणार आहे.

पदपथ बनवणार...
आता नगर रस्त्यावरील अतिक्रमणे काढली आहेत. भविष्यात ज्या रस्त्यांवरील अतिक्रमणे काढले जाईल, तेथे तत्काळ पदपथ बांधणी करणे किंवा अन्य पर्यायी सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न महापालिका करणार आहे. त्यामुळे संबंधित रस्त्यांवर भविष्यात अतिक्रमण होण्याची शक्‍यता कमी होईल, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Nagar Road
Mumbai : 'SP सिंगला कन्स्ट्रक्शन'ला अभय कुणाचे? राजांचे गंभीर आरोप

‘‘नगर रस्त्यावरील सुमारे पावणे दोन लाख चौरस फूट अतिक्रमणे काढली आहेत. ‘जी-२०’च्या पार्श्‍वभूमीवर शहरातील १४ प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमणे याच पद्धतीने काढले जातील. तसेच पुन्हा अतिक्रमण होणार नाही, यासाठीही उपाययोजना केल्या जातील.’’
- विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त

फायदे काय?
- रस्त्यांवरील कोंडीची समस्या कमी होऊ शकते
- अपघाताच्या घटना कमी होण्याची शक्‍यता
- पादचाऱ्यांसाठी पदपथ निर्माण करता येणार

Tendernama
www.tendernama.com