Pune : ...आता तरी शहरात अस्वच्छता करणाऱ्यांवर वचक बसणार का?

मध्य प्रदेशातील इंदूर शहराच्या पार्श्वभूमीवर, पुणे महापालिकेने शहरात अस्वच्छता करणाऱ्यांवर वचक बसावा, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करता यावी, यासाठी भरारी पथक तयार केले.
PMC Pune
PMC PuneTendernama
Published on

पुणे (Pune) : महापालिकेच्या (PMC) घनकचरा विभागाच्या भरारी पथकाच्या कारवाईमध्ये वाढ होण्यासाठी आणखी दहा गाड्या महापालिका प्रशासनाने उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे भरारी पथकाकडील गाड्यांची संख्या १८ झाली आहे. त्यामुळे आता शहरात अस्वच्छता करणाऱ्यांवरील कारवाईला वेग देण्यास उपयोग होणार आहे.

PMC Pune
Pune : पुणे रेल्वे स्थानकाला वगळून 'असा' होणार नवा रेल्वे मार्ग

मध्य प्रदेशातील इंदूर शहराच्या पार्श्वभूमीवर, पुणे महापालिकेने शहरात अस्वच्छता करणाऱ्यांवर वचक बसावा, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करता यावी, यासाठी भरारी पथक तयार केले. या पथकाला शहरात कारवाई करणे सोईस्कर व्हावे, यासाठी महापालिका प्रशासनाने अद्ययावत वाहने उपलब्ध करून दिली होती.

PMC Pune
Pune : दररोज 13 लाख प्रवाशांवर PMP ठेवणार लक्ष; काय आहे प्लॅन?

नुकत्याच दहा नवीन गाड्या भरारी पथकाच्या ताफ्यात दाखल झाल्या. या गाड्यांचे लोकार्पण महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्या हस्ते झाले. यावेळी अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी., घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संदीप कदम, परिमंडळ एकचे उपायुक्त राजू नंदकर, प्रसाद जगताप व मुकुंद बर्वे आदी उपस्थित होते.

PMC Pune
Pune Airport : मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली Good News! आता सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे...

घनकचरा विभागाकडून अस्वच्छता करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईवर भर दिला जातो. सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणे, बंदी असलेल्या प्लॅस्टिकचा वापर करणे, राडारोडा टाकणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, कचरा जाळणे, अशा प्रकारांसाठी संबंधित कारवाई केली जाते.

ऑक्‍टोबर २०२३ ते २४ डिसेंबरपर्यंत ७२ हजार ७७८ प्रकरणांमध्ये चार कोटी तीन लाख ७१ हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. सहा हजार २६८ किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com