Pune : दररोज 13 लाख प्रवाशांवर PMP ठेवणार लक्ष; काय आहे प्लॅन?

PMP Bus : स्वारगेटहून वाकडेवाडीकडे जाणाऱ्या बसमध्ये पुरुषाने महिला प्रवाशाला छेडल्याने चोप दिल्याची घटना नुकतीच घडली.
PMP
PMPTendernama
Published on

पुणे (Pune) : प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पीएमपी (PMP) प्रशासनाने पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला आहे.

PMP
Pune : पुणे रेल्वे स्थानकाला वगळून 'असा' होणार नवा रेल्वे मार्ग

पहिल्या टप्प्यात पीएमपीच्या मालकीच्या सुमारे १००६ बसेसमध्ये प्रत्येकी तीन कॅमेरे बसविले जाणार आहेत. याच्या टेंडर प्रक्रियेचे काम सुरू असून, येत्या दोन महिन्यांत प्रत्येक बसमध्ये कॅमेरे बसविले जाणार आहेत. गेल्या काही वर्षांत पीएमपी बसमध्ये चोरीसह महिलांच्या छेडछाडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

स्वारगेटहून वाकडेवाडीकडे जाणाऱ्या बसमध्ये पुरुषाने महिला प्रवाशाला छेडल्याने चोप दिल्याची घटना नुकतीच घडली. या सर्व पार्श्वभूमीवर पीएमपी प्रशासनाने मालकीच्या सर्व बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला आहे. हे कॅमेरे चांगल्या दर्जाचे असल्याने बसमधील प्रवाशांवर लक्ष ठेवणे सोपे होणार आहे.

PMP
Pune : कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरणाचा खर्च वाढता वाढे; तब्बल 400 कोटींनी वाढला खर्च

नऊ लाख प्रवाशांवर लक्ष

पीएमपीच्या ताफ्यात २१०० बस असल्या तरीही प्रत्यक्षात रस्त्यावर १६५० बस धावत आहेत. पैकी १००६ बस पीएमपीच्या मालकीच्या आहेत. उर्वरित बस भाडेतत्त्वावरील आहेत. पीएमपी प्रशासन पहिल्यांदाच मालकीच्या बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवीत आहेत.

पीएमपी बसमधून दररोज सुमारे १३ लाख प्रवासी प्रवास करतात. पैकी १००६ बसमध्ये टप्प्याटप्प्याने कॅमेरे बसविले जाणार असल्याने किमान नऊ लाख प्रवासी प्रशासनाच्या नजरेत राहणार आहेत.

काय फायदा होणार

१) महिलांचा प्रवास सुरळीत होणार

२) चोरी व छेडछाडीच्या घटनांना आळा बसणार

३) वाहकांसोबत होणारे वाद टळणार

४) महिला प्रवाशांची संख्या वाढणार

५) प्रवाशांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे सोपे होणार

PMP
Chandrapur : 'समृद्धी'साठी 73 गावांत जमिनीचे होणार भूसंपादन; आल्या नोटीस

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पीएमपी बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. टेंडर प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. दोन महिन्यांत सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जातील.

- नितीन नार्वेकर, सह व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल, पुणे

बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय अगदी योग्य आहे. यामुळे महिला सुरक्षितरीत्या प्रवास करू शकतील. चोरीच्या अथवा छेडछाडीच्या घटना रोखण्यास मदत होईल. परिणामी, महिला प्रवाशांची संख्या वाढण्यास मदत होईल.

- रतिका मोहिते, प्रवासी

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com