Pune : 'त्या' Mobile App वर पुणेकर का झाले फिदा?

pune city
pune cityTendernama
Published on

पुणे (Pune) : 'आपली पीएमपीएमएल' मोबाईल अॅपला (Apli PMPML Mobile App) चांगला प्रतिसाद मिळत असून, गेल्या सहा महिन्यांत तब्बल नऊ लाख ८० हजार प्रवाशांनी अॅप डाऊनलोड केले आहे. तसेच या अॅपद्वारे २० लाख १९ हजार ४२१ रुपये एवढे विक्रमी उत्पन्न पीएमपीच्या तिजोरीत एका दिवसात जमा झाले आहे.

pune city
Pune : पुण्याची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महामेट्रोने काय केली तयारी?

हे अॅप आतापर्यंत अॅन्ड्रॉईड मोबाईलमध्येच डाऊनलोड करता येत होते. त्यामुळे प्रवाशांच्या मागणीमुळे आणि पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपा मुधोळ-मुंडे यांच्या संकल्पनेतून ७६व्या प्रजासत्ताकदिनानिमित्त ‘आपली पीएमपीएमएल’ मोबाईल अॅपचे ‘आय.ओ.एस. व्हर्जन’ सुरू करण्यात आले आहे. या अॅपचा जास्तीत जास्त प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पीएमपीएमएलकडून करण्यात आले आहे.

pune city
Pune : पुणे-पिंपरी चिंचवडमधील घरे महागणार? जमिनींच्या किमती आकाशाला भिडणार; काय आहे कारण?

ॲपची वैशिष्ट्ये

- सर्व बसमार्गांची माहिती मिळते

- बसचे लाइव्ह ट्रॅकिंग होते

- ऑनलाइन तिकीट काढता येते

- दैनंदिन पास देखील काढता येतो

- तक्रार नोंदविता येते

- अॅपवरून मेट्रोचे तिकीट काढता येते

pune city
Pune : महापालिकेने 'त्या' ठेकेदाराला का टाकले काळ्या यादीत?

ॲपद्वारे मिळालेले उत्पन्न आणि प्रवासी

उत्पन्नाचा कालावधी : १५ ऑगस्ट २०२४ ते २७ जानेवारी २०२५

एकूण प्रवासी संख्या : एक कोटी, १७ लाख, ८९ हजार ९५५

एकूण उत्पन्न : २० कोटी ८५ लाख २८ हजार ९६६

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com