Pune Metro
Pune MetroTendernama

Pune : हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या कामाला का देण्यात आली 6 महिन्यांची मुदतवाढ?

Pune Metro : करारानुसार संबंधित कंपनीने वेळेत काम पूर्ण न केल्याने दंडाची टांगती तलवार या कंपनीवर असणार आहे.
Published on

पिंपरी (Pimpri) : माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो कामाला सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याची वेळ पुणे प्रादेशिक क्षेत्रीय विकास प्राधिकरण (पीएमआरडीए PMRDA) प्रशासनावर आली आहे. दिलेल्‍या मुदतीत काम पूर्ण होत नसल्‍याने ही मुदतवाढ दिली आहे. दरम्‍यान, ठरलेल्‍या करारानुसार वेळेत काम पूर्ण करून न दिल्‍याने ठेकेदार कंपनीवर दंडाची रक्‍कमदेखील आकारण्यात येणार आहे.

Pune Metro
Pune : 'त्या' ऐतिहासिक बोगद्याच्या सुरक्षेलाच प्रशासनाने दाखवलाय 'कात्रजचा घाट'

पीपीपी (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) या तत्त्वावर हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू आहे. या कामाला नोव्हेंबर २०२१ मध्ये सुरवात झाली. मार्च २०२५ पर्यंत प्रकल्‍प पूर्ण करण्याची अंतिम मुदत आहे. मात्र, या मुदतीत हा प्रकल्प पूर्ण होऊ शकणार नाही. त्‍यामुळे या प्रकल्पाला आणखी मुदतवाढ मिळणार आहे.

या मार्गावरील काही स्थानकाचे काम अपूर्ण असून, शिवाजीनगर (आरबीआय) आणि औंध या दोन ठिकाणी कामे संथगतीने असल्याने याचा मोठा अडथळा या मार्गाला बसला आहे. सध्या ७९ टक्के काम पूर्ण झालेले आहे. पिलर उभारण्याचे काम शंभर टक्के पूर्ण झाले आहे. २३ स्थानकांपैकी १३ स्थानकांची कामे पूर्ण झाली आहेत. इतर स्थानकांची कामे अपूर्ण आहेत.

Pune Metro
Tendernama Exclusive : माजी मंत्री अब्दुल सत्तार यांचा कारनामा उजेडात!

विविध ठिकाणी जिन्याचे आणि अकरा स्थानकांचे महत्त्वाचे काम बाकी आहे. विविध परवानगी आणि वाहतूक नियोजन दृष्टीने काही स्थानकाची कामे वेळेपेक्षा अधिक लांबली असल्याने मुदतवाढ देण्याची नामुष्की या प्रकल्पावर आली. यामध्ये प्रामुख्याने इंटर कनेक्ट काम असल्याने विद्यापीठ चौकामध्ये कामाची गती कमी आहे.

त्याचप्रमाणे रस्त्यावर असलेल्या एचटी लाईनमुळे देखील या कामांमध्ये मोठा अडथळा निर्माण झाले असल्याचे, पीएमआरडीए प्रशासनाने नमूद केले. करारानुसार संबंधित कंपनीने वेळेत काम पूर्ण न केल्याने दंडाची टांगती तलवार या कंपनीवर असणार आहे.

Pune Metro
Mumbai : फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! 'त्या' प्रकल्पासाठी 1594 कोटींची मान्यता

कामाची सद्यःस्थिती

- १३ स्‍थानकांचे काम पूर्ण

- दहा स्‍थानकांची कामे प्रगतिपथावर.

- सात स्‍थानकांच्‍या सिग्नलचे काम सुरू.

Pune Metro
Mumbai : राज्यातील 45 रोप-वे प्रकल्पांबाबत सरकारने काय घेतला निर्णय?

मार्च २०२५ पर्यंत कामाची मुदत आहे. मात्र, त्‍या मुदतीत काम होणार नाही. नुकतीच त्‍याबाबत एक बैठक झाली. त्‍यामध्ये संबंधित कंपनीने सहा महिन्‍यांची मुदत मागितली होती. त्‍यानुसार मुदत दिली आहे. दंड किती आकारायचा, हे करारानुसार ठरविले जाईल.

- रीनाज पठाण, मुख्य अभियंता, पीएमआरडीए

Tendernama
www.tendernama.com