
मुंबई (Mumbai) : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सरकारमधील वादग्रस्त माजी अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांचा नवा कारनामा समोर आला आहे. सत्तार यांनी मंत्रिपदाचा दुरुपयोग करीत सिल्लोड व फर्दापूर तालुक्यातील (जि. छत्रपती संभाजीनगर) स्वतःच्याच शिक्षण संस्थांवर लाखो रुपयांची शासकीय निधीची खैरात केली आहे. नियम वाकवून सरकारी तिजोरीची लूट केल्याचे दिसून येते.
अल्पसंख्याक विकास विभागाकडून धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी अनुदानित/विनाअनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका / नगरपरिषद शाळा व अपंग शाळांमध्ये पायाभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना राबविण्यात येते.
योजनेंतर्गत धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांचे बाहुल्य असलेल्या राज्यातील शासनमान्य शैक्षणिक संस्थाना पायाभूत सोयी-सुविधा निर्माण करण्यासाठी शासनाकडून वार्षिक कमाल २ लाख रुपयांपर्यंत अनुदान उपलब्ध करून देण्यात येत होते. मात्र, सत्तार यांच्यासाठी ४ ऑक्टोबर २०२४ रोजी मंत्रिमंडळाच्या विशेष मान्यतेने अनुदानाची रक्कम २ लाखांवरुन १० लाख रुपये इतकी वाढवण्यात आली.
वाढीव अनुदानाच्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ताबडतोब ९ ऑक्टोबर, २०२४ च्या पत्रान्वये या योजनेसाठी सत्तार यांच्याशी संबंधित १६ शिक्षण संस्थांसाठी अनुदानाचा प्रस्ताव शासनास सादर केला. विशेष म्हणजे, दुसऱ्याच दिवशी तातडीने या सर्वच्या सर्व १६ शिक्षण संस्थांना प्रत्येकी १० लाख रुपयांप्रमाणे एकूण तब्बल १ कोटी ६० लाख रुपये अनुदान मंजूर करुन वितरीत करण्यात आले. अल्पसंख्याक विकास विभागाने १० ऑक्टोबर २०२४ रोजी याबाबतचा शासन निर्णय सुद्धा प्रसिद्ध केला.
एरवी इतर संस्थांना हे अनुदान द्यायचे झाल्यास प्रशासनाकडून कायद्याचा काथ्याकूट केला जातो. नियम, कायद्याकडे बोट दाखवून महिनोंमहिने अनुदान दिले जात नाही. अब्दुल सत्तार यांच्यासाठी मात्र विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याआधी अवघ्या आठवडाभरात यंत्रणांनी अक्षरश: वायूवेगाने हालचाली करीत सरकारी तिजोरी मोकळी केल्याचे दिसून येते.
२०१९ ते २४ मध्ये महसूल राज्यमंत्री, कृषी मंत्री आणि पणन व अल्पसंख्याक मंत्री म्हणून अब्दुल सत्तार यांची कारकीर्द अत्यंत वादळी होती. वादग्रस्त कारभारामुळे सत्तार यांचे कृषी खातेही काढून घेण्यात आले. याच वादग्रस्त पार्श्वभूमीमुळे देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये सत्तार यांचा मंत्रिपदाचा पत्ता कापण्यात आला अशी चर्चा आहे.
शासकीय अनुदानाची खैरात केलेल्या संस्थांची नावे पुढीलप्रमाणे आहेत...
संस्थेचे नाव .... शाळेचे नाव
१. प्रगती शिक्षण संस्था सिल्लोड ता. सिल्लोड जि. छत्रपती संभाजीनगर
प्रगती उर्दू प्राथमिक शाळा उंडणगाव ता. सिल्लोड जि. छत्रपती संभाजीनगर
२. आदर्श एज्युकेशन सोसायटी अंभई ता. सिल्लोड जि. छत्रपती संभाजीनगर
उर्दू प्राथमिक शाळा जंनाळा ता. सिल्लोड जि. छत्रपती संभाजीनगर
३. आदर्श एज्युकेशन सोसायटी अंभई ता. सिल्लोड जि. छत्रपती संभाजीनगर
उर्दू प्राथमिक शाळा नानेगाव ता. सिल्लोड जि. छत्रपत्ती संभाजीनगर
४. इंदिरा शिक्षण प्रसारक मंडळ फर्दापूर ता. सोयगाव जि. छत्रपती संभाजीनगर
उर्दू प्राथमिक शाळा बोरगाव सारवाणी ता. सिल्लोड जि. छत्रपती संभाजीनगर
५. नॅशनल एज्युकेशन सोसायटी सिल्लोड ता. सिल्लोड जि. छत्रपती संभाजीनगर
नॅशनल उर्दू प्राथमिक शाळा अंधारी ता. सिल्लोड जि. छत्रपती संभाजीनगर
६. नॅशनल एज्युकेशन सोसायटी सिल्लोड ता-सिल्लोड जि. छत्रपती संभाजीनगर
नॅशनल उर्दू प्राथमिक शाळा भराडी ता. सिल्लोड जि. छत्रपती संभाजीनगर
७. नॅशनल एज्युकेशन सोसायटी सिल्लोड ता सिल्लोड जि. छत्रपती संभाजीनगर
नॅशनल उर्दू प्राथमिका शाळा केऱ्हाळी ता. सिल्लोड जि. छत्रपती संभाजीनगर
८. इंदिरा शिक्षण प्रसारक मंडळ फर्दापूर ता. सोयगाव जि. छत्रपती संभाजीनगर
उर्दू प्राथमिक शाळा चारनेर ता. सिल्लोड जि. छत्रपती संभाजीनगर
९. नॅशनल एज्युकेशन सोसायटी सिल्लोड ता सिल्लोड जि. छत्रपती संभाजीनगर
नॅशनल उर्दू प्राथमिक शाळा पिंपळदरी त्ता. सिल्लोड जि. छत्रपती संभाजीनगर
१०. नॅशनल एज्युकेशन सोसायटी सिल्लोड ता-सिल्लोड जि. छत्रपती संभाजीनगर
नॅशनल उर्दू प्राथमिक शाळा इदगाह परिसर सिल्लोड ता. सिल्लोड जि. छत्रपती संभाजीनगर
११. नॅशनल एज्युकेशन सोसायटी सिल्लोड ता सिल्लोड जि. छत्रपती संभाजीनगर
हिंदूस्तान उर्दू प्राथमिक शाळा अंधारी ता. सिल्लोड जि. छत्रपती संभाजीनगर
१२. नॅशनल एज्युकेशन सोसायटी सिल्लोड ता. सिल्लोड जि. छत्रपती संभाजीनगर
नॅशनल उर्दू कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय जमालशा कॉलनी, सिल्लोड ता. सिल्लोड जि.छत्रपती संभाजीनगर
१३. नॅशनल एज्युकेशन सोसायटी सिल्लोड ता. सिल्लोड जि. छत्रपती संभाजीनगर
नॅशनल मराठी हायस्कूल डोंगरगाव ता. सिल्लोड जि. छत्रपती संभाजीनगर
१४. नॅशनल एज्युकेशन सोसायटी सिल्लोड ता. सिल्लोड जि. छत्रपती संभाजीनगर
हिंदूस्तान उर्दू हायस्कूल अंधारी ता. सिल्लोड जि. छत्रपती संभाजीनगर
१५. नॅशनल एज्युकेशन सोसायटी सिल्लोड ता. सिल्लोड जि. छत्रपती संभाजीनगर
नॅशनल उर्दू हायस्कूल अजिंठा ता. सिल्लोड जि. छत्रपती संभाजीनगर
१६. नॅशनल एज्युकेशन सोसायटी सिल्लोड ता. सिल्लोड जि. छत्रपती संभाजीनगर
दयानंद विद्यालय, घटांनी ता. सिल्लोड जि. छत्रपती संभाजीनगर