Pune : कात्रज-कोंढवा रस्त्यातील 'या' ग्रेड सेपरेटरच्या कामात कोणी घातला खोडा?

Pune
PuneTendernama

पुणे (Pune) : कात्रज-कोंढवा रस्त्याचे (Katraj Kondhva Road) रुंदीकरण करताना कान्हा हॉटेल चौकात समतल विगलक (ग्रेड सेपरेटर) करताना जलवाहिनी स्थलांतरित करणे आवश्‍यक आहे. पण त्याचा आराखडा सल्लागाराकडून सादर होत नसल्याने येथील काम ठप्प झाले आहे. दीड महिन्यापासून सल्लागार अधिकाऱ्यांना दाद देत नसल्याने अखेर त्यास काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे.

Pune
Sambhajinagar : 'टेंडरनामा'च्या वृत्तानंतर अधिकाऱ्यांना साक्षात्कार; 'ते' धोकादायक खांब...

दक्षिण पुण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महापालिकेने २०१८ ला कात्रज-कोंढवा रस्त्याचे रुंदीकरण करण्याचे काम सुरु केले. पण भूसंपादनाअभावी हा रस्ता रखडला आहे. गेल्या सहा वर्षांत ५० टक्के देखील या रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. गेल्या वर्षभरापासून प्रशासनाने जागा ताब्यात येण्यासाठी जागा मालकांसोबत अनेकदा बैठका घेतल्या, प्रत्यक्ष जागेची पाहणी केली.

सरकारला २०० कोटी रुपयांचा निधी मागितला. यामुळे कान्हा हॉटेल ते खडी मशिन चौक या दरम्यानची बरीच जागा ताब्यात आल्याने या भागात नवीन रस्त्याने वाहतूक सुरु करता आली आहे. मात्र, कान्हा हॉटेल चौक ते राजस सोसायटी चौकादरम्यान भूसंपादनाच्या कामाला गती आलेली नाही.

Pune
Sambhajinagar : संभाजीनगरकरांना रेल्वेने दिली Good News! पुढील 30 महिन्यांत...

महापालिका प्रशासनाने कान्हा हॉटेल चौकातील ग्रेड सेपरेटरचे काम तीन महिन्यांत पूर्ण करून त्यातून वाहतूक सुरु करण्याचे नियोजन केले होते. पण या चौकात ६०० एमएम व्यासाची जलवाहिनी आहे. ती स्थलांतरित करण्यासाठी सल्लागाराला आराखडा सादर करण्याचा आदेश दिला होता.

गेल्या गेल्या दीड महिन्यांपासून अधिकारी याचा पाठपुरावा करत असले तरी सल्लागाराने अद्याप महापालिकेला आराखडा दिलेला नसल्याने चौकातील कामही रखडले आहे. त्यामुळे कामाचे नियोजन बिघडले आहे.

Pune
Pune : पुण्यात 'तो' नियम मोडणाऱ्यांना महापालिका देणार दणका!

कात्रज-कोंढवा रस्त्याचे काम वेगात मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. यासाठीच कान्हा हॉटेल चौकातील जलवाहिनी स्थलांतरित करण्याचे काम आवश्‍यक असल्याने सल्लागारास आराखडा मागितला आहे. पण तो देण्यास विलंब करत असल्याने त्याला काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया सुरु करण्याचा आदेश पथ विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला आहे.

- विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com