Pune : कात्रज-कोंढवा रस्त्याच्या कामातील तो अडथळा तब्बल 28 वर्षांनंतर दूर?

Katraj Kondhva Road : या रस्त्याच्या भूसंपादनाअभावी झालेल्या वाहतूक कोंडी व अपघातात अनेकांना जीव गमवावा लागल्याने ‘देर आये दुरुस्त आये’ अशीही भावना काही नागरिकांतून व्यक्त होत आहे.
Katraj Kondhwa Road
Katraj Kondhwa RoadTendcernama
Published on

पुणे (Pune) : तब्बल २८ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर कात्रज चौकातील बहुचर्चित जागेचे भूसंपादन झाले. जागामालकांकडून एकूण ६२ गुंठे जागेपैकी ३९ गुंठे जागेचा ताबा राज्य सरकारकडे आणि सरकारतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून महापालिकेकडे देण्यात आला. त्यामुळे कात्रज चौक खऱ्या अर्थाने मोकळा श्वास घेणार आहे.

Katraj Kondhwa Road
तब्बल तीनशे एकरवर वसणार तिसरी मुंबई; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितला प्लॅन

याची रीतसर कार्यवाही चौकात अधिकाऱ्यांच्या समक्ष उपस्थित राहून करण्यात आली. या जागेसाठी महापालिकेकडून मिळकतीचा रोख मोबदला म्हणून २१ कोटी रुपयांची रक्कम अदा करण्यात आली. या कार्यवाहीमुळे मुख्य चौक व कोंढवा रस्त्याच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

वाहतुकीस अडथळा ठरत असलेल्या ६० मीटर डीपी रस्त्याचा प्रश्न मार्गी लागणार असून, रस्ता आता सरळ होईल. मात्र, या रस्त्याच्या भूसंपादनाअभावी झालेल्या वाहतूक कोंडी व अपघातात अनेकांना जीव गमवावा लागल्याने ‘देर आये दुरुस्त आये’ अशीही भावना काही नागरिकांतून व्यक्त होत आहे.

Katraj Kondhwa Road
Pune Nashik Highway : कारभाऱ्यांना वेळ मिळेणा, रुंदीकरण अन् एलिव्हेटेड मार्गाला मुहूर्त मिळेणा?

जागा हस्तांतरणासाठी रोख मोबदल्याच्या मागणीसाठी संजय रमेशलाल गुगळे, अंकित मदनराज साखरिया यांनी याबाबत न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, आता न्यायालयाच्या आदेशानुसार भूसंपादन प्रक्रियेद्वारे गुगळे यांनी जागेचा ताबा दिल्याने प्रश्न मार्गी लागला.

ही कार्यवाही महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांच्या मार्गदर्शनाखाली भूसंपादन व व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्त प्रतिभा पाटील यांनी केली. या वेळी माजी नगरसेवक प्रकाश कदम, वसंत मोरे, स्वराज बाबर, उपअभियंता दिलीप पांडकर, दिगंबर बांगर, शाखा अभियंता रूपाली ढगे, संतोष शिंदे, भूसंपादन अधिकारी हर्षद घुले, अजिंक्य पाटील आदी उपस्थित होते.

कार्यवाहीला सुरुवात

चौकातील जागेसाठी लोकप्रतिनिधी, स्थानिक नागरिक यांच्यासह विविध संस्था स्तरावर सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. मात्र, जागा ताब्यात घेण्यासाठी तत्कालीन अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी कार्यवाहीला सुरुवात करत जागेसाठी २१ कोटी रुपयांच्या रोख मोबदल्यासाठी मंजुरी दिली होती.

Katraj Kondhwa Road
Pune : अवघ्या 200 मीटर जागेसाठी रखडला पुणे-पिंपरीला जोडणारा 'हा' पूल

अनेक दिवसांपासून हा प्रश्न रखडला होता. आता सामंजस्यातून लोकहित लक्षात घेऊन आम्ही जागेचा ताबा दिला. मात्र, प्रत्यक्ष बाजारभावाप्रमाणे आम्हाला मोबदला मिळाला नसल्याची खंत आहे. यात काही अडचणींमुळे अनेक वर्षे स्थानिकांसह नागरिकांना त्रास सहन करावा लागला होता. मात्र, आता ३९ गुंठे जागेचा ताबा दिला असल्याने महापालिकेला रस्ता सुरु करण्यास कोणतीही अडचण नाही.

- संजय गुगळे, जागा मालक

ही जागा महत्त्वाच्या ठिकाणी असल्याने अडचणी येत होत्या. मात्र, आता जागा ताब्यात आल्याने तातडीने आम्ही कार्यवाही करणार आहे. रस्ता सुरू करणार असून, वाहतूक कोंडीतून दिलासा मिळेल.

- अनिरुद्ध पावसकर, अधीक्षक अभियंता, पथविभाग

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com