Tender : राजकीय हस्तक्षेपामुळे पुण्यातील रस्त्यांची चाळण झालीय का?

PMC Pune
PMC PuneTendernama

पुणे (Pune) : पुणे शहरातील रस्त्यांची दुरवस्था झालेली असताना कोट्यवधी रुपये खर्च करून नव्याने डांबरीकरण आणि काँक्रिटीकरण करण्यासाठी टेंडर काढले जात आहेत. पण यात होणारा राजकीय हस्तक्षेप, ठेकेदारांकडून (Contractor) दिली जाणारी खोटी कागदपत्रे आणि त्यातून होणाऱ्या वादामुळे टेंडर रद्द करण्याची नामुष्की प्रशासनावर येत आहे.

PMC Pune
Aurangabad: 'या' रस्त्याने का घातली औरंगाबादकरांना भुरळ?

रस्ते दुरुस्तीची यापूर्वी चार क्रमांकाची ६३ कोटींचे टेंडर रद्द केल्यानंतर आता पाच क्रमांकाची ५८ कोटींचे टेंडरही रद्द झाले आहे. त्याचा फटका कोथरूड, बावधन, कोंढवा परिसरातील रस्त्यांच्या कामांना बसला असून, ही कामे ठप्प झाली आहेत.

गेल्या दोन वर्षांत शहराच्या सर्वच भागात पाणी पुरवठा, मलःनिसारण, विद्युत, दूरसंचार कंपन्या, गॅस कंपन्यांच्या कामासाठी छोटे, मोठे रस्ते खोदण्यात आले. त्यामुळे रस्त्यांची चाळण झाली, अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले. मेट्रोच्या कामामुळेही रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे.

याचा नागरिकांना, वाहनचालकांना प्रचंड त्रास होत असल्याने महापालिका प्रशासनावर टीकेची झोड उठली. पावसाळा संपल्यानंतर शहरातील सर्व रस्त्यांचे डांबरीकरण केले जाईल, त्यामुळे खड्ड्यांची समस्या सुटेल असा दावा करण्यात आला होता.

PMC Pune
Mumbai : 'डिजिटल की' चोरीमुळे हाफकीनच्या टेंडर प्रक्रियेला ब्रेक

काय आहे स्थिती
- शहरातील रस्ते चांगले करण्यासाठी प्रशासनाने पाच टप्प्यामध्ये रस्त्यांची विभागणी करून प्रत्येक टप्प्याची स्वतंत्र टेंडर काढण्यात आली आहे.
- यामध्ये टप्पा क्रमांक एक ते तीन या सुमारे ५० ते ५५ कोटी रुपयांच्या टेंडर मान्य होऊन त्यांची कामे सुरू झाली आहेत.
- टप्पा क्रमांक चारमध्ये ठरावीक ठेकेदारालाच काम मिळाले पाहिजे यासाठी शहरातील आमदार, माजी नगरसेवक, त्यांचे कार्यकर्ते यांच्यात जोरदार वादावादी झाली.
- प्रत्येकाने आपल्याच कंपनीला काम मिळाले पाहिजे यासाठी लॉबींग सुरू केले.
- अखेर प्रशासनाने तांत्रिक अडचणींचे कारण सांगत ही ६३ कोटी रुपयांची टेंडर रद्द करून पुन्हा एकदा प्रक्रिया सुरू केली.
- यामध्ये बहुतांश रस्ते हे पेठांमधले आहेत. तेथे पोट विधानसभेची पोट निवडणूक जाहीर झाल्याने आचारसंहितेमुळे ही प्रक्रिया ठप्प झाली आहे.

PMC Pune
Nagpur : ऑरेंज सिटीतील वाहतूक पोलिसही होणार 'स्मार्ट'; कारण...

कोथरूड, बाणेरमधील कामाला फटका
कोथरूड, बाणेर, औंध, शिवाजीनगर, बावधनमधील भागाचा टप्पा क्रमांक पाचमध्ये समावेश आहे. या ५८ कोटी रुपयांच्या टेंडरसाठी तीन ठेकेदारांनी प्रस्ताव दिले होते. यामध्ये एका ठेकेदाराने प्लांटबद्दल एका कंपनीचे बनावट पत्र दिले आहे, अशी तक्रार केली. ज्याने तक्रार केली त्याच्याही कागदपत्रावर आक्षेप घेण्यात आले.

प्रशासनाने त्यासंदर्भात संबंधित कंपनीकडे पत्रव्यवहार सुरू केलेला असताना आपल्या मर्जीतील ठेकेदार अपात्र होऊ नये यासाठी एका आमदार व त्यांच्या निकटवर्तीयाने, माजी नगरसेवकांनी दबाव आणण्यास सुरवात केली. त्यामुळे प्रशासनाने टेंडर रद्द करून पुन्हा एकदा प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे किमान एक ते दीड महिना रस्त्याचे डांबरीकरणाचे काम पुढे गेले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

PMC Pune
Aurangabad : हायकोर्टासमोर G-20चे ब्रँडिंग अन् होर्डींग पाठीमागे..

रस्त्याच्या पाच क्रमांकाच्या टेंडरमध्ये कोथरूड व इतर भागाचा समावेश होता. तांत्रिक कारणाने हे टेंडर रद्द करून, पुन्हा टेंडर मागविण्यात आले आहे.
- व्ही. जी. कुलकर्णी, प्रमुख, पथ विभाग

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com