पुणे रिंगरोडबाबत एमएसआरडीसीने काय केली मागणी? आणखी 74 गावे...

पुण्याच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला गती मिळणार असल्याचा दावा
Pune Ring Road
Pune Ring RoadTendernama
Published on

मुंबई (Mumbai): पुणे जिल्ह्यातील पायाभूत सुविधा प्रकल्पांना नवी दिशा देत, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने पुणे रिंगरोड प्रकल्पाला व्यापक स्वरूप देण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

वाहतूक कोंडी कमी करण्याच्या आणि पुणे महानगराच्या नियोजनबद्ध विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या या महत्त्वाकांक्षी रिंगरोड प्रकल्पाच्या नियोजन आणि विकासासाठी एमएसआरडीसीने आता आपल्या कार्यक्षेत्रात आणखी ७४ गावांचा समावेश करण्याची मागणी केली आहे.

Pune Ring Road
Nashik ZP: कार्यकारी अभियंता परदेश वारीवर अन् जलयुक्तचे 16 कोटींचे टेंडर वाऱ्यावर

ऑक्टोबर २०२४ मध्ये नगर विकास विभागाने पुणे रिंगरोडजवळील ५ तालुक्यांमधील ११७ गावांचे नियोजन प्राधिकरण म्हणून एमएसआरडीसीला अधिकृत मान्यता दिली होती, ज्याचे क्षेत्रफळ सुमारे ६६८ चौरस किलोमीटर होते. या ११७ गावांच्या विकास आराखड्याचे काम प्रगतीपथावर असतानाच, एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी १८ सप्टेंबर २०२५ रोजी नगर विकास विभागाला पत्र लिहून आणखी ७४ गावे आपल्या अखत्यारीत घेण्याची मागणी केली आहे.

एमएसआरडीसीच्या म्हणण्यानुसार, रिंग रोडच्या संपूर्ण पट्ट्याचे नियोजन एकात्मिक आणि समन्वित पद्धतीने करणे आवश्यक आहे. पायाभूत सुविधांच्या योग्य अंमलबजावणीसाठी, विशेषत: कनेक्टिव्हिटी आणि भविष्यातील विस्ताराच्या दृष्टीने, या अतिरिक्त गावांचा समावेश करणे रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे. या मागणीमुळे एमएसआरडीसीच्या विशेष नियोजन क्षेत्राचा परिसर लक्षणीयरीत्या वाढून ६६८ चौरस किलोमीटरवरून १,०६२ चौरस किलोमीटर होईल.

Pune Ring Road
Nashik: ओझर विमानतळावरून आली गुड न्यूज! 6 महिन्यांत...

या विस्तारामागे पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि रिंग रोडच्या इंटरचेंज भागाचे समन्वित नियोजन हे मुख्य कारण सांगितले जात आहे. पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ रिंग रोडजवळ येत असल्याने आणि सोनोरी (पुरंदर) येथील रिंगरोड चौकातून विमानतळाची वाहतूक हाताळली जाणार असल्याने, या संपूर्ण परिसराचा विकास एकाच प्राधिकरणाखाली होणे अत्यंत गरजेचे आहे, असे एमएसआरडीसीचे म्हणणे आहे. यामुळे वाहतुकीचे सुरळीत व्यवस्थापन होईल आणि परिसरातील नागरी विकासाला एकसंधता मिळेल.

एमएसआरडीसीने हवेली, भोर, पुरंदर, मुळशी आणि वेल्हे (राजगड) या पाच तालुक्यांतील ७४ गावांचा समावेश करण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे, या भागातील स्थानिक ग्रामपंचायतींनीही त्यांच्या गावांचा या महत्त्वाकांक्षी विकास योजनेत समावेश करण्याची मागणी केली आहे, ज्यामुळे या प्रकल्पाचे महत्त्व अधोरेखित होते.

Pune Ring Road
Nashik Ring Road: नाशिक रिंगरोडबाबत फडणवीसांनी काय दिली मोठी अपडेट?

तालुकानिहाय प्रस्तावित गावे...

हवेली : कोंढाणपूर, सांगरुण, आर्वी, गौडदरा, कल्याण, तानाजीनगर, मोरदारवाडी, अवसरे, रहाटवडे, शिवपूर, खेड शिवापूर, रामनगर.

भोर : किकवी, ससेवाडी, शिंदेवाडी, कासुर्डी, शिवरे, वेळू, हरिश्चंद्री, कापूरहोळ, दिवळे, कामथडी, केळवडे, नसरापूर, नायगाव, वरवे बुद्रुक व वरवे खुर्द.

पुरंदर : दिवे, पवारवाडी, जाधववाडी, केतकवले, चिवेवाडी, देवरी, वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, काळेवाडी, सोनोरी, सिंगापूर, झेंडेवाडी, गुन्होली व आंबोडी.

मुळशी : अंबडवेत, भरे, कासार आंबोली, मुकाईवाडी, उरावडे, भुकूम, पिरंगुट, आंबेगाव व पौड.

वेल्हे (राजगड) : कोंडगाव, आंबवणे, चिंचोळे बुद्रुक, करंजवणे, आडवली, आस्करवाडी, केतकवणे, कोलवाडी, लाशीरगाव, मार्गासनी, खांबवाडी, मांगदरी, विंजर, वांगणी, दापोडे, चिंचाळे खुर्द, बोरावळे, निगडे बुद्रुक, माळगाव, रांजणगाव, कातगाव, रांजणगाव.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com