Pune Ring Road : 4 तालुक्यांत हवेलीने मारली बाजी; 'या' शेतकऱ्यांना 205 कोटींचे वाटप

Ring Road
Ring RoadTendernama

पुणे (Pune) : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) हाती घेतलेल्या रिंगरोडच्या (Pune Ring Road) पश्‍चिम भागातील हवेली तालुक्यातील भूसंपादनाचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे. त्यामुळे चार तालुक्यांमध्ये हवेली तालुक्याने भूसंपादनात आघाडी मारली आहे.

अवघ्या तीन महिन्यांत हवेली तालुक्यातील २१० हेक्टर क्षेत्रापैकी संमती करारनाम्याने जवळपास ९४.५० हेक्टर क्षेत्र संपादित करण्यात आले आहे. तर उर्वरित भूसंपादनासाठी सक्तीने भूसंपादन करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

Ring Road
Nashik : छगन भुजबळांच्या प्रयत्नांना यश; 'या' प्रकल्पाच्या 252 कोटींच्या टेंडरला मान्यता

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रस्ते महामंडळाने १७२ किलोमीटर लांबी आणि ११० मीटर रुंदीच्या रिंगरोडचे काम हाती घेतले आहे. पूर्व आणि पश्चिम अशा दोन टप्प्यात या रिंगरोडचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी पूर्व भागातील मावळातील ११, खेडमधील १२, हवेलीतील १५, पुरंदरमधील पाच आणि भोरमधील तीन गावांतून रिंगरोड जाणार आहे.

तर पश्चिम भागातील भोरमधील पाच, हवेलीतील ११, मुळशीतील १५ आणि मावळातील सहा गावांतून हा रस्ता प्रस्तावित करण्यात आला आहे. या रस्त्यासाठी ४४ गावांतील सुमारे साडेसातशे हेक्टर जागेचे भूसंपादन करावे लागणार आहे.

Ring Road
Nitin Gadkari : घोषणा जोमात पण पुणे - छत्रपती संभाजीनगर द्रुतगती मार्ग कोमात!

पाच जुलैपासून पश्चिम मार्गावरील भूसंपादनाची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाकडून सुरू करण्यात आली. त्यासाठी बाधितांना नोटिसा देऊन ३० जुलैपर्यंत संमतिपत्रे सादर करण्याची मुदत देण्यात आली. परंतु पंतप्रधान मोदी यांचा पुणे दौरा आणि अन्य कारणांमुळे ही मुदत २१ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली होती. त्यानुसार या मुदतीत १४ गावातील पश्‍चिम भागातील रिंगरोडसाठी दहा गावांतील क्षेत्राचे भूसंपादन करण्यात आले आहे.

या १० गावांतील २१० हेक्टर क्षेत्रापैकी ९४.५० हेक्टर क्षेत्र संपादित करण्यात आले आहे. त्याच्या मोबदल्यापोटी २०५ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आल्याची माहिती हवेलीचे प्रांत संजय आसवले यांनी दिली.

Ring Road
Thane : झेडपीच्या प्रशासकीय इमारतीसाठी लवकरच टेंडर; 73 कोटींचे बजेट

या गावांत भूसंपादन...

पूर्व भागातील गावांची नावे : कोरेगाव मूळ, गावडेवाडी, भिवरी, वाडेबोल्हाई

पश्‍चिम भागातील गावांची नावे : कल्याण, खामगाव मावळ,भगतवाडी, रहाटवडे, वडदरे, सांगरूण, बहुली, मोरदरवाडी, थोपटेवाडी, मांडवी बुद्रुक

Ring Road
Nashik ZP : कार्यकारी अभियंत्यांच्या कपाटात 24 फायली सहा महिन्यांपासून पडून

रिंगरोडचे दोन टप्पे करण्यात आले आहेत. त्यापैकी पश्‍चिम भागातील रिंगरोडच्या भूसंपादनाचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे. जिल्हाधिकारी राजेश देखमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शेतकऱ्यांनी केलेल्या सहकार्यामुळे हे शक्य झाले आहे.

- संजय आसवले, प्रांत, हवेली तालुका

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com