PMP: पुणेकरांचे स्वप्न 'रस्त्या'त उतरणार; बकोरियांनी करून दाखवले

Omprakash Bakoria
Omprakash BakoriaTendernama

पुणे (Pune) : हडपसर (Hadapsar), कात्रज (Katraj), कर्वे रस्ता (Karve road) परिसरातील प्रवाशांना पाच ते सहा महिन्यांत डबलडेकर बसमधून (Double Decker Bus) प्रवासाचा आनंद घेता येणार आहे.

Omprakash Bakoria
Thane Railway Station : रेल्वे स्टेशनचा पुनर्विकास; 800 कोटींचे...

पीएमपीएमएल (PMPML) प्रशासन शहरातील ४० मार्गांवर इलेक्ट्रिक डबलडेकर बस सुरू करणार असून मार्गांची निश्चिती झाली आहे. हे मार्ग निवडताना रस्त्यांची स्थिती तसेच प्रवाशांचा प्रतिसाद या बाबींचा प्रामुख्याने विचार केला आहे. पीएमपीच्या आगामी बैठकीत हा विषय चर्चिला जाईल. त्यांनतर डबलडेकर बसच्या खरेदीला गती येईल.

‘बीआरटी’वरून धावणार नाही
डबलडेकर बस बीआरटी मार्गावरून धावणार नाही. बसची उंची तसेच बसच्या रचनेत बदल केल्याने पीएमपी प्रशासनाने बीआरटी मार्गावर डबलडेकर सुरु न करण्याचा निर्णय घेतला. बसची उंची १४ फूट ४ इंच इतकी आहे. त्यामुळे ही बस मुख्य रस्त्यावरून धावेल.

Omprakash Bakoria
Nagpur- गडकरींनी उद्घाटन केले कामाचा खर्च 8 वरून गेला 22 कोटींवर

या मार्गांवर धावणार डबलडेकर
- हडपसर-पुणे महापालिका
- हडपसर-कात्रज
- भोसरी-आळंदी
- भोसरी-निगडी
- कात्रज-हिंजवडी
- पुणे महापालिका-बालेवाडी
- पुणे स्टेशन-कोथरूड

- हडपसर-कोथरूड
- हडपसर-वारजे, माळेवाडी

कशी असेल डबलडेकर बस
- नव्या बसला दोन जिने
- जुन्या बसला केवळ एकच जिना होता
- इलेक्ट्रिक व वातानुकूलित
- बसमध्ये उत्तम सस्पेन्शन
- प्रवास आरामदायक
- बसमध्ये डिजिटल तिकिटांची सोय
- लंडनमध्ये धावणाऱ्या बससारखा लुक

Omprakash Bakoria
Nagpur ZP : सदस्यांनीच लावली मर्जीतल्या ठेकेदारांसाठी 'फिल्डिंग'

असे असेल स्वरूप
- प्रवासी क्षमता : सीटिंग ७० पर्यंत, उभे राहून ४० प्रवासी
- एकाचवेळी किमान शंभरहून अधिक प्रवासी प्रवास करू शकतील
- पीएमपीला जास्त बसची अथवा फेऱ्यांची गरज भासणार नाही
- बसची किंमत २ कोटी रुपये
- बसची उंची १४ फूट ४ इंच
- नवीन बस इलेक्ट्रिक, त्यामुळे देखभालीचा खर्च कमी



Omprakash Bakoria
Pune: मोठी बातमी; रिंगरोडच्या कामात पुन्हा नवे विघ्न?

डबलडेकर बससाठी ४० मार्ग ठरविले आहेत. बसची खरेदी झाल्यावर या मार्गांवर डबलडेकर बस धावतील. मात्र, यासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. या बस इलेक्ट्रिक व वातानुकूलित असतील. त्यासाठी पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकांचे आर्थिक साह्याय्य घेतले जाईल.
- ओमप्रकाश बकोरिया, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल, पुणे

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com