पुणे महापालिकेतील 'त्या' वसुली बहाद्दरांना दणका

PMC Tender: दर वर्षी किमान १४० कोटी रुपये खर्चूनही पुणे शहरात अस्वच्छता कायम
पुणे महापालिका टेंडर स्कॅम
Action, PMCTendernama
Published on

पुणे (Pune): पुणे महापालिकेत (PMC) झाडणकामासाठी कंत्राटी कामगार म्हणून नोकरी लावून देण्याच्या आमिषाने गरजवंतांकडून हजारो रुपये उकळणाऱ्या महापालिकेच्या सेवेत कायम नोकरी बिगारी काम करणाऱ्या महिलेला अखेर निलंबित करून तिची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. तर रकमेत अपहार केल्याच्या संशयातून आरोग्य निरीक्षकाचीही विभागीय चौकशी होणार आहे.

हा प्रकार समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती. अखेर या प्रकरणी कारवाई झाल्याने शहरातील सर्व आरोग्य निरीक्षक व ‘वसुली’चे काम करणाऱ्या बिगाऱ्यांनाही चांगला दणका बसणार आहे.

पुणे महापालिका टेंडर स्कॅम
पुरंदर विमानतळ प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत काय झाला निर्णय?

पुणे शहराचा विस्तार वाढत असून रोज किमान दोन कोटी चौरस मीटर इतके क्षेत्र झाडणकाम करावे लागते. यामध्ये रस्ते, सार्वजनिक जागा, महापालिकेच्या इमारती, वस्त्यांचा समावेश आहे. महापालिकेकडे कायम कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने कंत्राटी सेवक नियुक्त करून त्यांच्यामार्फत झाडणकाम करून घेतले जाते. यासाठी दर वर्षी किमान १४० कोटी रुपये खर्च होतो. एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करूनही शहरात अस्वच्छता कायम असते.

रस्त्यावर कचरा, माती, दगड, पालापाचोळा पडून राहत असून झाडणकाम करणारे कर्मचारी गायब आहेत. पण त्यांची हजेरी रोज लागत असून, नियमित पूर्ण पगार काढला जात आहे. कर्मचाऱ्यांची उपस्थिती दाखवली जात असतानाही शहर घाण का दिसत आहे? असा प्रश्‍न उपस्थित करत क्षेत्रीय कार्यालय स्तरावरील सहाय्यक आयुक्त, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक, मुकादम, बिगारी आणि ठेकेदार यांच्या संगनमताने होणारा हा गैरव्यवहार समोर आला होता.

पुणे महापालिका टेंडर स्कॅम
Fake GR Scam: घोटाळ्याची चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करा; कोणी केली मागणी?

असा उघडकीस आला प्रकार

- सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत बिगारी काम करणाऱ्या महिलेने झाडणकामाची नोकरी लावून देण्याच्या आमिषाने महिलेकडून एक लाख ३८ हजार रुपये घेतले. पैसे घेऊनही नोकरी दिली नसल्याने पीडित महिलेने चौकशी केली असता तिला शिवीगाळ सुरू केली

- महिलेने या विरोधात सहाय्यक आयुक्तांकडे, तसेच अतिरिक्त आयुक्तांकडेही तक्रार केली होती. त्यास दरम्यान पैसे वसुली करणाऱ्या महिलेने एका पुरुष प्रभारी मुकादमाच्या विरोधात तो तिचा विनयभंग करत असल्याची तक्रार पोलिसांकडे केली

- पोलिसांनी केलेल्या चौकशीत या प्रभारी मुकादमाने चुकीचे वर्तन केले नसल्याने स्पष्ट

- तक्रारदार महिलेने अनेक महिलांना कामाला लावून देते म्हणून पैसे घेतल्याचेही आले समोर

- एवढा गंभीर प्रकार घडत असूनही महापालिका प्रशासनाने या महिलेवर व तिला पाठीशी घालणाऱ्या आरोग्य निरीक्षकांवर कारवाई केली नाही

- अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांच्याकडून या प्रकरणाची चौकशी करण्याचा आदेश

- सहाय्यक आयुक्त प्रज्ञा पवार यांनी चौकशी केली असता त्यात कामाला लावण्यासाठी सुमारे १८ जणांकडून पैसे घेतल्याचे स्पष्ट

- त्यानुसार परिमंडळ तीनचे उपायुक्त विजयकुमार थोरात यांच्याकडून निलंबनाचा आदेश

पुणे महापालिका टेंडर स्कॅम
Sangamner Bus Stand: एसटी बसस्थानक उरले फक्त नावालाच 'हायटेक'

टेंडरसाठी सादरीकरण

शहरातील रस्ते, गल्लीबोळ झाडण्यासाठी प्रशासनाने १४७ कोटी रुपयांच्या टेंडर काढल्या होत्या. पण यात ठरावीक ठेकेदारांचाच फायदा झाला पाहिजे असा नियम व अटी ठेवल्या होत्या. या टेंडरमध्ये रिंग झाल्याचे समोर आले होते. अतिरिक्त आयुक्तांनी केलेल्या चौकशीतही यात तथ्य आढळले होते.

अतिरिक्त आयुक्तांच्या अहवालानुसार आयुक्त नवल किशोर राम यांनी ही टेंडर रद्द करत जुन्या पद्धतीने टेंडर काढण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार नव्याने झाडणकामाच्या टेंडरची प्रक्रिया सुरू झाली आहे. यात सहभागी होणाऱ्या ठेकेदारांना सादरीकरण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत महिला मुकादमाने कंत्राटी काम लावून देण्याच्या आमिषाने पैसे घेतले व नोकरी दिली नाही अशी तक्रार आली होती. त्याची चौकशी केली असता सुमारे १८ जणांनी अशा प्रकारच्या तक्रार केल्या होत्या. चौकशी अहवाल उपायुक्तांकडे सादर केल्यानंतर त्यांनी संबंधित महिलेला निलंबित केले आहे. तसेच आरोग्य निरीक्षकांकडे असलेल्या पावती पुस्तकातील रकमांबाबतही अनियमितता दिसून आली आहे. त्यामुळे त्यांचीही विभागीय चौकशी करण्यात येईल.

- प्रज्ञा पवार, सहाय्यक आयुक्त, सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालय

पुणे महापालिका टेंडर स्कॅम
Pune: जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार वाढले; कारण काय?

क्षेत्रीय कार्यालय व झाडणकाम करणाऱ्या कंत्राटी कामगारांची संख्या

हडपसर मुंढवा - ७०३

औंध बाणेर - ४१९

कसबा विश्रामबाग - ५६

कोंढवा येवलेवाडी - ३१५

वारजे कर्वेनगर - ३४६

सिंहगड रस्ता - ४८६

धनकवडी सहकारनगर - ३९७

नगर रस्ता वडगाव शेरी - ७४३

येरवडा कळस धानोरी - ३१५

कोथरूड बावधन - २८१

ढोले पाटील - २१६

शिवाजीनगर घोले रस्ता - १२५

बिबवेवाडी - २२२

वानवडी रामटेकडी - ३०१

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com