Pune : पाचही टेंडरसाठी एकच ठेकेदार पात्र; गौडबंगाल नक्की काय?

pune
puneTendernama
Published on

पुणे (Pune) : पुणे महापालिकेत (PMC) प्रशासकराज असताना अनेक माजी नगरसेवक प्रभागातील कामांसाठी प्रशासनाकडे निधीची मागणी करतात. त्यांना निधी नसल्याचे सांगण्यात येते. यानंतरही माजी स्वीकृत सदस्य असलेल्या एका ‘खास’ माननीयांना सुमारे अडीच कोटींचा निधी ‘खास’ मंजूर करण्यात आला. त्याहून ‘विशेष’ बाब म्हणजे पाचही टेंडरसाठी एकच ठेकेदार पात्र ठरला.

pune
Solapur : कागदावरच अडकला सोलापूरचा विकास; एक हजार 786 कोटींची कामे ठप्प

माजी स्वीकृत सदस्य कोणत्याही प्रभागाचा नाही. यानंतरही स्थायी समितीच्या बैठकीत त्या पदाच्या नावासाठी प्रभाग क्रमांक १६ मधील कामांसाठी पाच टेंडर मंजूर करण्यात आले. त्यासाठी एकूण दोन कोटी ४४ लाख ४६ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला.

पुणे महापालिकेत गेल्या काही महिन्यांत महायुतीच्या माजी नगरसेवकांच्या प्रभागांत कोट्यवधी रुपयांचा निधी वळविण्यात आला आहे. बाणेर, बालेवाडी, सूस या भागांसाठी तब्बल ३८ कोटी ५० लाख रुपयांचा निधी वर्गीकरणाद्वारे देण्यात आला आहे.

शहराच्या अनेक भागांत सांडपाणी वाहिनी, पाणीपुरवठा, खड्डे बुजविणे, आरोग्यविषयक सेवा पुरविणे यांसह अन्य कामांसाठी माजी नगरसेवक अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करीत आहेत. त्यासाठी ते क्षेत्रीय कार्यालयांत फेऱ्या मारत आहेत. त्यांना निधी उपलब्ध होत नाही अशी स्थिती आहे. ‘तुम्ही निधी मंजूर करून आणा, मग आपण कामे करू,’ असा सल्ला अधिकारी त्यांना देत आहेत. या पार्श्वभूमीवर ‘खास’ माननीयांसाठी प्रशासनाने झटपट निर्णय घेऊन ‘खास’ निधी मंजूर केला आहे.

pune
Navi Mumbai : कळंबोली जंक्शनवर डबलडेकर इंटरचेंज उभारणार; 755 कोटींचे बजेट

या कामांसाठी निधी

पुणे महापालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी माजी स्वीकृत सदस्याच्या मागणीनुसार खालील कामांसाठी निधी मंजूर केला.

निविदा ः निधी ः कामाचे स्वरूप

१ ः ४८ लाख ८९ हजार ३८८ ः प्रभाग क्रमांक १६ मधील रास्ता पेठेत विविध ठिकाणी मलवाहिनी टाकणे

२ ः ४८ लाख ८९ हजार ५०३ ः रियाझ हाइट्स ते आंबेडकर भवन येथे ६०० मिमी व्यासाची मलवाहिनी टाकणे

३ ः ४८ लाख ८८ हजार ५४० ः काळावाडा खड्डा गॅरेज येथे ६०० मिमी व्यासाची मलवाहिनी टाकणे

४ ः ४८ लाख ८९ हजार ३८८ ः सोमवार पेठेतील मुख्य मलवाहिनी बदलणे व दुरुस्त करणे

५ ः ४८ लाख ८५ हजार ५४० ः मंगळवार पेठेतील मुख्य मलवाहिनी बदलणे

(आकडे रुपयांत)

pune
Solapur : विठुरायाचे दर्शन आता आणखी होणार सुलभ; 'त्या' कामांसाठी 102 कोटींचे टेंडर

टेंडरचा दर जवळपास सारखा

या पाच कामांसाठी टेंडर प्रक्रिया राबविली असता केवळ दोन ठेकेदार पात्र ठरले. पाचही कामांसाठी मे. ख्वाजा गरीब नवाझ एंटरप्राइजेसने पूर्वगणनपत्रकाच्या २.२५ टक्के कमी दराने टेंडर भरली. दुसऱ्या क्रमांकावरील श्री भवानी कन्स्ट्रक्शनने तीन टेंडरसाठी ०.०० टक्के, तर दोन टेंडरसाठी एक टक्का कमी दराने टेंडर भरली. त्यामुळे पाचही टेंडरसाठी ख्वाजा गरीब नवाझ एंटरप्राइजेस पात्र ठरली. यातील पाचही टेंडरच्या दरात केवळ काही हजार रुपयांचा फरक आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com