
मुंबई (Mumbai) : मुंबई, ठाणे आणि कल्याणला जोडणाऱ्या कंळबोळी जंक्शनवर नेहमी वाहतूक कोंडीत होते. ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी याठिकाणी डबलडेकर इंटरचेज बांधण्यात येणार आहे. या कामावर सुमारे ७५५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
कंळबोली जंक्शनला पनवेल-शीव रस्ता जोडला जातो. तोच रस्त मुंबई पुणे एक्सप्रेस वेला जोडतो. तर दुसरा मुंबई पुणे जुना रस्ता पुण्याकडे जातो. पनवेलमार्गे गोव्याच्या दिशेनेदेखील राष्ट्रीय महामार्ग याच जंक्शनवरुन जातो. यामुळे कंळबोली येथील वाहतूक कोंडीमध्ये प्रवाशांना खूप त्रास होतो. यामुळेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, एनएचआयने डबलडेकर पुलाचे काम हाती घेतले आहे.
डबलडेकर इंटरचेंजमध्ये जमिनीवरील वाहतूक सुरु राहिल. त्यानंतर वरुन एक पूल असेल आणि त्यावरदेखील एक पूल तयार करण्यात येणार आहे. याशिवाय शीळफाटा आणि कल्याणकडून नवी मुंबईत जाण्यासाठी भूमिगत रस्ता तयार केला जात आहे. याच्या बाहेर मुंबई-पुणे जुना महामार्गदेखील आहे. यामध्ये पहिल्या मजल्यावरुन मुंबईकडून गोव्याकडे जाणारी वाहतूक असेल. ज्यांना मुंबई पुणे जुन्या महागामार्गाचे प्रवास करायचा आहे त्यांनाही पहिल्या मजल्यावरुन जाता येईल. तर शीळफाटा- कल्याण ते गोवा, शीळफाटा-कल्याण- मुंबई पुणे एक्सप्रेस वेसाठी जाणाऱ्या वाहनांना दुसऱ्या मजल्याचा वापर करावा लागेल. कंळबोळी जंक्शनमुळे मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होणार आहे. हा प्रकल्प १५.५३२ किमीचा असणार आहे. भूमिगत रस्त्याची लांबी ८७१ मीटर असणार आहे. यासाठी प्रत्यक्ष बांधकाम खर्च हा ६९७.२२ कोटी रुपये आहे. देखभाल, आप्तकालीन खर्च पकडून ७५५.७१ कोटी रुपये होऊ शकतो.