PMC Pune
PMC PuneTendernama

Pune : झाडांच्या संरक्षणासाठी महापालिका नेमणार कंत्राटदार; 36 लाखांची उधळपट्टी कशासाठी?

Published on

पुणे (Pune) : पुणे महापालिकेच्या (PMC) उद्यान विभागाकडे मोठी यंत्रणा असतानाही महापालिकेच्या जागेत लावलेल्या झाडांचे संगोपन, देखभाल करण्यासाठी ठेकेदाराची (Contractor) नियुक्त केली जात आहे. त्यावर ३६ लाख रुपयांची उधळपट्टी होणार आहे. उद्यान विभागाने सात महिने टेंडर प्रक्रिया राबवून आता संबंधित टेंडर मंजुरीसाठीचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे ठेवला आहे.

PMC Pune
Nashik : MSRDC करणार बाह्य रिंगरोडचे काम; महापालिकेचे सर्वेक्षण थांबवले

महापालिका प्रशासनाकडून विविध विभागांच्या सहकार्याने पावसाळ्यात वृक्षारोपण केले जाते. तसेच रस्ते व अन्य प्रकल्पांमधील झाडांचे पुनर्रोपण, देशी वृक्ष लावले जातात. या झाडांची निगा राखण्याचे काम महापालिकेच्या उद्यान विभागामार्फत केले जाते. उद्यान विभागाकडे त्यासाठी प्रशिक्षित अधिकारी, कर्मचारी, तज्ज्ञांची मोठी यंत्रणा आहे. तरीही महापालिकेच्या उद्यान विभागाने महापालिकेच्या जागेवरील रोपांचे संगोपन, संरक्षण व देखभालीच्या कामासाठी टेंडर प्रक्रिया राबविली आहे.

संबंधित कामे केल्याने हवेच्या गुणवत्तेमध्ये सुधार होण्याबरोबरच परिसरातील सौंदर्य वाढले जाणार असल्याचे त्यासंबंधीच्या प्रस्तावात नमूद केले आहे. या कामासाठी २८ फेब्रुवारी ते ९ मार्च दरम्यान टेंडर प्रक्रिया राबविण्यात आली. १० मार्चला या टेंडर उघडण्यात आल्या. त्यानंतर थेट सप्टेंबर महिन्यात टेंडर मंजुरीसाठीचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे ठेवण्यात आला आहे.

PMC Pune
Pune : पुणे रेल्वे स्टेशनवरील 'या' क्रमांकाच्या फलाटावरही थांबणार लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या

महापालिकेने कोठे वृक्षारोपण केले आहे किंवा केले जाणार आहे?, किती झाडे लावली आहेत?, ठेकेदाराकडून किती झाडांची देखभाल केली जाणार आहे? याबाबतचा उल्लेख प्रस्तावात केलेला नाही. महापालिकेची शहराच्या वेगवेगळ्या भागात २१५ उद्याने आहेत. त्यापैकी बहुतांश उद्यानांची देखभाल उद्यान विभागाकडून केली जाते.

PMC Pune
Nashik : नाशिक जिल्ह्यासाठी Good News! 'या' प्रकल्पाच्या जागेसाठी 108 कोटी जमा

याबाबत उद्यान विभागाचे अधिक्षक अशोक घोरपडे म्हणाले, उद्यान विभागाने यावेळी स्थायी समितीपुढे विविध प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवले आहेत. त्यामुळे कोणत्या टेंडर बाबतचा हा प्रस्ताव आहे, हे तत्काळ सांगता येणार नाही. त्यासंबंधीची माहिती घेऊन सांगता येईल.

Tendernama
www.tendernama.com