Pune : मिळकतकर थकबाकीसाठी महापालिकेची वसुली; आतापर्यंत 40 कोटी...

PMC
PMCTendernama
Published on

पुणे (Pune) : मिळकतकराची थकबाकी वसुली करण्यासाठी महापालिकेकडून मोहीम हाती घेण्यात आली आहे. गेल्या १८ दिवसांत ७५ मिळकतींना टाळे ठोकले आहेत. तर ३१७ मिळकतधारकांकडून ४० कोटी ६८ लाख रुपयांची थकबाकी वसूल केली आहे.

PMC
Pune : कात्रज-कोंढवा रस्त्याच्या भूसंपादनासाठी महापालिकेची सरकारकडे 'एवढ्या' कोटींची मागणी

महापालिकेच्या अर्थसंकल्पात मिळकतकर विभागाला २७२७ कोटी रुपयांच्या उत्पन्नाचे उद्दिष्ट दिले आहे. आत्तापर्यंत १८४१ कोटी रुपयांचा कर वसूल करण्यात आला आहे. उर्वरित तीन महिन्यांत सुमारे ९०० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविण्याचे आव्हान मिळकतकर विभागापुढे आहे. थकबाकी वसुलीसाठी महापालिकेने १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत थकबाकीदारांच्या दारात बॅंड वाजविणे, मिळकतींना टाळे ठोकणे अशी कारवाई सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत गेल्या अठरा दिवसांत ७५ मिळकतींना टाळे ठोकून ताब्यात घेतल्या आहेत. ३१७ मिळकतधारकांकडून ४० कोटी ६८ लाख रुपयांची थकबाकी वसूल केली आहे, अशी माहिती मिळकतकर विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी दिली.

PMC
MHADA Mumbai : 'त्या’ वसाहतीच्या पुनर्विकासातून म्हाडा होणार मालामाल

शहरातील सुमारे १४ लाख ८० हजार मिळकतधारकांना चालू आर्थिक वर्षाचे बिले पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी आठ लाख ८४ हजार मिळकतधारकांनी आतपर्यंत १८४१ कोटी रुपयांचा कर भरला आहे. उर्वरित सहा लाख मिळकतधारकांनी अद्यापही कर भरलेला नाही. त्यामुळे ही कारवाई सुरू केली आहे. नागरिकांनी थकबाकीची रक्कम भरून महापालिकेला सहकार्य करावे व कारवाईची नामुष्की टाळावी, असे आवाहन जगताप यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com