Pune : बेकायदा होर्डींग प्रकरणी महापालिका एखाद्या घटनेची वाट पाहतेय का?

hoarding
hoardingTendernama
Published on

पुणे (Pune) : शहराच्या वेगवेगळ्या भागांत अनधिकृत होर्डिंग्जचे पेव फुटले असताना महापालिकेकडे केवळ वीसच बेकायदा होर्डिंग्जची नोंद आहे. शहरातील केवळ ४ क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत बेकायदा होर्डिंग्ज आहेत, उर्वरित ११ कार्यालयांच्या हद्दीत एकही बेकायदा होर्डिंग्ज नसल्याचा दावा महापालिकेने केला आहे. बरे, त्या २० बेकायदा होर्डिंग्जवरही कारवाई करण्यासाठी महापालिकेला अजून वेळ मिळालेला नाही. त्यामुळे महापालिका एखादी गंभीर घटना घडण्याची वाट पाहतेय का? असा प्रश्‍न आता उपस्थित होऊ लागला आहे.

hoarding
Devendra Fadnavis : धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या मास्टर प्लॅनला मंजुरी

शहरात मंगळवारी (ता. २०) झालेल्या मुसळधार पावसानंतर धानोरीत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना घडली होती. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. यापूर्वी पुणे व पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरांत होर्डिंग्ज कोसळून झालेल्या दुर्घटनांमध्ये नागरिकांचे बळी गेले होते. होर्डिंग्ज कोसळल्यानंतर महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाकडून तात्पुरती तोंडदेखली कारवाई केली जाते. त्यानंतर परिस्थिती पुन्हा ‘जैसे थे’च. जून महिन्यात जोरदार वारे व मुसळधार पावसामुळे होर्डिंग्ज कोसळण्याच्या घटना घडतात. अशा घटना घडू नयेत, यासाठी आकाशचिन्ह व परवाना विभागाकडून होर्डिंग्ज व्यावसायिकांची बैठक घेऊन त्यांना आवश्‍यक त्या उपाययोजना करण्यासाठी सूचना दिल्या जातात. मात्र बेकायदा होर्डिंग्जवर कारवाई करण्यासाठी महापालिकेला अद्यापही मुहूर्त मिळालेला नाही.

hoarding
Pune : महापालिकेतील सुरक्षारक्षक नेमणूक प्रकरणी जुन्या ठेकेदारांनाच मुदतवाढ

या प्रश्नांची उत्तरे द्या....!

१. अधिकारी चिरीमिरी करून आपल्या स्तरावर परवानगी देतात का?

१. होर्डिंग्ज व्यावसायिकांनी पुरविलेल्या माहितीऐवजी अभियंत्यांकडून स्वतः होर्डिंग्जची पाहणी केली जाते का?

२. पाहणी केल्याचा सविस्तर अहवाल वरिष्ठांकडे सादर केला जातो का?

३. बेकायदा होर्डिंगच्या कारवाईमध्ये सातत्य का नाही ?

४. अधिकाऱ्यांनी होर्डिंग व्यावसायिकांशी मिलीभगत आहे का?

दाव्यात किती तथ्य?

शहरात प्रवेश करताना सोलापूर रस्ता, सासवड रस्ता, सातारा रस्ता, नगर रस्ता, आळंदी रस्ता या प्रमुख रस्त्यांसह अनेक ठिकाणी बेकायदा होर्डिंग्ज उभारल्याचे चित्र आहे. असे असताना केवळ ४ क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत २० बेकायदा होर्डिंग्ज असून, उर्वरित ११ कार्यालयांच्या हद्दीत एकही बेकायदा होर्डिंग्ज नसल्याचा दावा महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाने केला आहे.

यापूर्वी झालेली कारवाई

- नगर रस्ता - ५

- येरवडा, कळस, धानोरी - ३

- औंध-बाणेर - १

- घोले रस्ता - १

- वारजे - १

- हडपसर-मुंढवा - ९

- कोंढवा - येवलेवाडी- ८

- रामटेकडी- १८

(१ जानेवारी ते २४ मे २०२५)- एकूण - ४६

क्षेत्रीय कार्यालये-बेकायदा होर्डिंग्ज-अधिकृत होर्डिंग्ज

- नगर रस्ता, वडगाव शेरी-०-४९१

- येरवडा, कळस, धानोरी-६-१००

- ढोले पाटील रस्ता-०-११२

- औंध, बाणेर-०-३४१

- घोले रस्ता, शिवाजीनगर-०-२७८

- कोथरूड, बावधन-०-१६९

- वारजे, कर्वेनगर-०-१३५

- सिंहगड रस्ता-०-१३७

- धनकवडी, सहकारनगर-०-८६

- हडपसर, मुंढवा-२-३१२

- वानवडी, रामटेकडी-९-८

- कोंढवा येवलेवाडी-३-१०८

- भवानी पेठ-०-२५

- बिबवेवाडी-०-१०४

- कसबा, विश्रामबाग-०-१६०

एकूण -२०-२६३८

शहरात बेकायदा होर्डिंग्जची संख्या २० आहे. त्यामुळे पुन्हा एकदा प्रत्येक अधिकाऱ्याला अशा होर्डिंग्जची माहिती घेऊन त्यावर तत्काळ कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. यात हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांनाही नोटिसा दिल्या जातील.

- प्रशांत ठोंबरे, प्रमुख, आकाशचिन्ह व परवाना विभाग, महापालिका

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com