Pune : कात्रज चौकातील पुलासाठी आवश्यक 'त्या' जागेचे भूसंपादन करण्याचे आयुक्तांचे आदेश

Katraj Chowk Flyover
Katraj Chowk FlyoverTendernama
Published on

पुणे (Pune) : कात्रज चौकातील उड्डाणपुलाच्या कामासाठी मागील काही दिवसांपासून चौक बंद केला आहे, प्रत्यक्षात या पुलाच्या खांबाच्या उभारणीसाठी आवश्‍यक एक जागाच अद्याप महापालिकेच्या ताब्यात आली नसल्याची सद्यःस्थिती आहे. या पार्श्‍वभूमीवर, महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी संबंधित जागेचे तातडीने भूसंपादन करण्याचा आदेश पथ व भूसंपादन विभागाला दिला आहे.

Katraj Chowk Flyover
Pune : 'या' मार्गांवर का लागल्या वाहनांच्या लांबच लांब रांगा?

महापालिकेकडून कात्रज चौकामध्ये उड्डाण पूल उभारण्यात येत आहे. या कामासाठी महापालिकेकडून येथील चौक बंद केला आहे. परंतु, पुलासाठी आवश्‍यक खांब उभारण्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र त्यासाठी एक जागा महापालिकेच्या ताब्यात आलेली नाही. सोमवारी महापालिकेत कात्रज-कोंढवा रस्त्याच्या कामाचा आढावा घेण्यासाठी तसेच कोंढव्याच्या दिशेने उड्डाण पूल उतरण्यासाठी लागणाऱ्या जागेसाठी आयुक्त डॉ. भोसले यांनी सात जागा मालकांची महापालिकेत बैठक घेतली. त्यावेळी हा प्रकार पुढे आला.

Katraj Chowk Flyover
Mumbai : ‘त्या’ 25 इमारतींच्या पुनर्विकासासाठी दोन दिग्गज कंपन्यांमध्ये चुरस

डॉ. भोसले यांनी संबंधित जागा तातडीने ताब्यात घेण्याची प्रक्रीया सुरू करण्याचा आदेश पथ विभाग, भूसंपादन विभागाला दिला आहे. दरम्यान, हमीपत्र देण्याच्या अटीवर या जागा अगोदर ताब्यात देण्यास जागा मालकांनी सहमती दर्शविली, अशी माहिती पथ विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. अनेक वर्षांपासून कात्रज- कोंढवा रस्त्याच्या कामासाठी भूसंपादन करण्याची प्रक्रिया सुरू आहे, मात्र अजूनही ही प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्यामुळे या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामात अडथळे येत आहेत. तसेच नागरिकांना वाहतूक कोंडीच्या त्रासाला व अपघातांना दररोज सामोरे जावे लागत आहे. भूसंपादनासाठी वाढत जाणारा खर्च लक्षात घेऊन महापालिकेने हा रस्ता ८४ मीटरऐवजी ५० मीटर करण्याची भूमिका घेतली. त्यानंतर जागा ताब्यात आलेल्या ठिकाणी रुंदीकरणाचे काम सुरू झाले. दरम्यान, केंद्रीय रस्ते बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनीही या रस्त्याच्या कामाचा आढावा घेतला.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com