Pune : मोदींच्या मंत्र्यांने सांगितली तारीख? पुण्यातील विस्तारित विमानतळाच्या उद्घाटनाचा मुहूर्त ठरला?

Pune Airport
Pune AirportTendernama

पुणे (Pune) : पुण्यातील विस्तारित विमानतळाचे उद्‌घाटन लोकसभा निवडणुकीपूर्वी होईल. आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी विमानतळाच्या धावपट्टीचा विस्तार केला जाईल. त्या दृष्टीने सरकारचा ‘रोड मॅप’ तयार आहे,’ अशी माहिती केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Pune Airport
Nashik : जिल्हा परिषदेतील सहा गटविकास अधिकाऱ्यांना मिळणार नवीन वाहने

रूबी हॉल क्लिनिकतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी विविध मुद्द्यांवर संवाद साधला. रूबी हॉल क्लिनिकचे प्रमुख डॉ. परवेझ ग्रँट, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे सल्लागार अली दारूवाला, बेहराम खोडाईजी या प्रसंगी उपस्थित होते.

नाईक यांनी सांगितले की, ‘विमानतळाचा विस्तार आणि विकास करून ‘मेडिकल टुरिझम’ पुढे नेले जाईल. ‘आयुष’ मंत्रालयाच्या माध्यमातून पारंपरिक उपचारांना चालना मिळत आहे. प्रसार माध्यमांतही त्याबाबत सकारात्मकता आहे. वैद्यकीय सेवेतून श्रीमंत होणे हा उद्देश नसतो, सेवा हाच उद्देश असतो. रूबी हॉलचे प्रयत्न त्यादृष्टीने महत्त्वाचे आहेत. कमी खर्चात चांगली सेवा देऊन देशाचे नाव मोठे करण्यासाठी या क्षेत्रातील सर्व संस्थांनी आपला वाटा उचलावा.’

Pune Airport
Nashik : डीपीसीच्या 2024-25 च्या आराखड्यास सरकारने का लावली 92 कोटींची कात्री?

डॉ. ग्रँट म्हणाले, पुण्यात ‘मेडिकल टुरिझम’ पुढे जाण्यासाठी विमानतळासारख्या पायाभूत सुविधा उत्तम दर्जाच्या असणे आवश्यक आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्राप्रमाणे विस्तार होण्याची क्षमता या क्षेत्रात आहे. त्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा. एप्रिलपर्यंत रूबी हॉलमध्ये अत्याधुनिक यंत्रणा बसविली जाईल.

Pune Airport
Sambhajinagar : शिवाजीनगर रेल्वे फाटकावर भुयारी मार्ग; सातारा, देवळाईकरांचा प्रवास वेगवान करण्याचा प्रयत्न

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात चांगल्या पायाभूत सुविधा निर्माण होत आहेत. त्यामुळे आपला देश पुढे जाऊन ‘मेडिकल हब’ बनेल. त्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध होतील.

- श्रीपाद नाईक, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com